आज हा नवीन ब्लोग सुरु करत
आहे. आपल्या मनातील काहीतरी साहित्य, संगीत, प्रवास, राजकारण,अर्थकारण या विषयांवर
इथे लिहिण्याचा विचार आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि शुबेच्छा हव्यातच.
(देवरुख ची गायिका रसिका गानू ) देवरुख हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असलेले गाव. कोकण म्हणजे तसा डोंगराळ प्रदेश पण रत्नागिरी जिल्ह्यात दोन गावे अशी आहेत की ती पठारावर आहेत त्यामुळे ती विशेष मानली जातात. एक दापोली व दुसरे देवरुख. देवरुख हे दोन महामार्गांच्या मधोमध व उंचावर आहे. कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील साखरपा व मुंबई गोवा रस्त्यावरील संगमेश्वर या दोन्ही ठिकाणांहून सारख्या अंतरावर (१६ किमी) हे गाव वसलेले आहे. या गावाचा माझा संबंध हा १९८१ मध्ये माझ्या विवाहानंतर आला. येथील माणिक रामकृष्ण दिक्षित हिच्याशी पुण्यातच विवाह झाल्यानंतर खास जावई या विशेष नात्याने या गावी प्रथम गेलो. तसे हे दिक्षित यांचे मूळ गाव नव्हे. श्वशुर रा वा दिक्षित हे देवरुख येथे १९७० च्या सुमारास नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालाचे प्राचार्य म्हणून इथे आले होते. त्यांची अध्यापनाची सगळी कारकीर्द कर्नाटकात बेळगाव, गडद, निपाणी येथे घडली होती. अध्यापन व प्रशासन यातील हातोटी व काहीतरी साध्य करायचा ध्यास यामुळे ते इथे आले. त्यांचे मूळ गाव देवगड तालुक्यातील तिर्लोट. त्यामुळे या कोकण भूमीत...
आपल्या नाक, कान, त्वचा ,जीभ या इंद्रियां प्रमाणेच डोळे हे पण एक इंद्रिय आहे पण डोळ्यांवर सारे कवी आणि गीतकार डोळ्यांवर जास्त मेहेरबान आहेत. कधी लाडिक तक्रार करताना प्रेयसी म्हणते –डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका. कधी नजरेचा पाठलाग होतो- या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती, पाठलाग ही सदैव करतील असा कुठे ही जगती. कधी प्रियकर प्रेयसीला म्हणतो- डोळ्यात वाच माझ्या गीत भावनांचे. डोळे हे पारदर्शी असतात म्हणून प्रियकर सांगतो – डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी , त्या दूरच्या दिशांना सांगू नकोस कहाणी. तर कुणी म्हणत –मोठ मोठ डोळ तुझ कोळ्याच जाळ जणू , मोत्याची मासळी त्यात गावायची नाय. हीच गोष्ट हिंदी मध्ये पण आढळते. नैन लाड गायी रे तो मनवा ........ नैनसे नैन नाही मिलाओ मेरे नयना सावन भादो, फिरभी मेरा मन प्यासा जानेमन जानेमन तेरे दो नयन, चोरी चोरी लेके गये देखो मेरा मन मेरे दो नयन चोर नाही सजन , तुमसे ही खोया होगा कही तुम्हारा मन आंखो ही आखो मे इशारा हो गया बैठे बैठे जीनेका सहारा हो गया. आंखो की गुस्ताखीया माफ हो आखोमे बसे हो तुम नयनोंकी बात नयना जाने...
काल बसमधून घरी जाताना पंडित जसराज यांचा मधुवंती ऐकत होतो. थेट मैफलीमधील ध्वनिमुद्रण असल्याने त्यांनी तो छान रंगवला. त्यातील विरहार्त भावना मन व्याकुळ करीत होती पण त्यातील विलक्षण गोडी पण मजा आणत होती . अर्थात हा राग फार गायला जात नाही आणि मधुवंती म्हटलं की सुमन कल्याणपूर यांचं गाणं आठवत . मधुवंतीच्या सुरासुरातून आळविते मी नाम एकदा दर्शन दे घनश्याम नयनी माझ्या गोकुळ वसले यमुनेचे जळ गाली झरले राधेपरी मी सर्व वाहिले सुख शांतीचे धाम वसंतातले सरले कूजन तुझ्याविना हे उदास जीवन शोधीत तुजला फिरते वणवण, नाही जीवा विश्राम दासी मीरा ये दाराशी घे गिरिधारी तव हृदयाशी या पायाशी मथुरा -काशी, तीर्थापरी हे नाम एकदा दर्शन दे घनश्याम मधुवंती रागावर आधारित काही गाणी निरोप कसला माझा घेता झन झनन छेडिल्या तारा प्रेम सेवा शरण बहरला पारिजात दारी मधुवंतीच्या सुरासुरातूनी स्वप्नात रंगले मी सुमन कल्याणपूर यांचे हे अवीट गोडीचे भावगीत. त्यांचा गोड आवाज आणि जसे शब्द हेत त्याप्रमाणे सम्पूर्ण गाण्यात मधुवंतीचे मधाळ सूर सर्वत्र झिरपत असतात मधुवंती हा तोडी थाटाचा राग आहे .या मध्ये गांधार कोमल...
मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा
ReplyDeleteआपल्या निरनिराळ्या विषयावरील लेखांच्या प्रतिक्षेत
Abhinandan! Look forward to reading!
ReplyDeleteAll the best.
ReplyDeleteGreat beginning.. Keep it up...
ReplyDeleteअनिल, मस्तच idea. Liked it so much. आता नेहमीच काही तरी छान वाचायला मिळेल.
ReplyDeleteआबा मस्त छान उपक्रम
ReplyDeleteहार्दिक शुभेच्छा. छान लिहि्ताय लिहितं राहा
ReplyDelete