आवडलेली कविता
आवडलेली कविता
गर्दीत तुझा हात सूटतांना,
धस्स झालेलं काळजात..
छे..! अासक्ती नाही रे कसलीच..
अाणि तुझ्याशिवाय जगण्याची काळजी?
ती तर मूळीच नाही..!
तुझे तत्त्वं,तुझे विचार,तुझे सारे सारे ऋतु रुजलेत पंचप्राणात माझ्या..
अाता तुझ्यानंतरही 'तुझ्यासहच' असेल जगणं माझं..
पण माझ्यानंतर स्पर्शेल का कोणी तुझ्या अथांग,पारदर्शी डोळ्यांपल्याडच्या अात्म्यास?..
समजेल तिला तुझी मौनाची भाषा..?
तुझ्या ह्रदयापर्यंत पोहोचणारी एक 'अरुंदशी पायवाटही',जी फक्त मलाच गवसली..
ती सापडेल कोणास?
तू तर माझ्या पावलांचे ठसेही पुसून टाकलेस त्या वाटेवरले..कोणी मागोवा घेत पुन्हा येऊ नये म्हणून..
अाणि वाचताही येणार नाहीत तुझ्या अाभाळभर पसरलेल्या मनावर कोरलेले गूढ शिलालेख कोणाला.. 'माझ्या डोळ्यांनी'..!
तुझ्या डोळ्यांतून क्वचित कधीतरी ओघळलेला अन् तोही माझ्या ओंजळीतून निसटू न दिलेला .. 'इमानदार अश्रु' अाता ओंजळ नसल्याने ओघळणारही नाही कदाचित..!
मग अजूनच गोठशील तू..
तुझं अस्तित्त्वं वितळवणारी, माझी मिठीही नसेल तिथे...
म्हणून सैलावत नव्हती पकड...
हात सूटतांना....!!!!!
-निवेदा फडणीस
आज सकाळी ही कविता वाचनात आली। वर वर एक प्रेम कविता वाटते पैन अतिशय आशयगर्भ। एक अतिशय आश्वासक अस अद्वैत. विरह, मिलान या पलीकडे पण जाणवणारी एकरूपता, तादात्म्यता। पैन अध्यात्माचा रुक्ष पणा न जाणवता त्यात प्रेमाची तरलता पण मोहवते. अवघ्या पंचविशीत इतक आत्मभान नाही दिसून येत.
आशा आहे तुम्हाला पण ही कविता आवडेल.
अनिल जोशी
२७. १२. २०१९
Khup chhan
ReplyDeleteफार पूर्वी सत्यकथेत वाचलेल्या कविता आठवल्या. अनिल, तू कवितेवर लिहिलेलं भाष्य एकदम सही आहे. कवयित्रीच्या भावनिक पातळीपर्यंत सहजगत्या पोहचून नेमका "तो" आशय भाषेच्या पातळीवर आणून गोठवणं हे अवघड काम तू छान केलस. मला तर कविता गूढ, अव्यक्त आणि आशयव्यक्त यांच्या सीमारेषेवर आंदोलतांना जाणवली. अस्वस्थ आणि बेचैन करणारी ...... अवी
ReplyDeleteधन्यवाद अवि
Delete