साहित्य(?) संमेलन
काल अखेर साहित्य संमेलनाचे सूप वाजले. ही संमेलने खरे तर साहित्यप्रेमींची पर्वणी असायला हवी पणती गाजतात साहित्यबाह्य विषयांमुळे. भाषणे , परिसंवाद या बाबी जास्त वेळ खातात त्यामुळे निखळ साहित्याचा आस्वाद हा कोपऱ्यात जातो . शिवाय बरेच परिचित भेटतात त्यामुळे भेटीगाठी ,गप्पाष्टके हे पण आलेच. यात चुकीचे काही नाही कारण सहभागी झालेला प्रत्येक जण आपल्याला पाहिजे तास आनंद घेणारच. पण सध्या या मंचाचा उपयोग चुकीचा होताना दिसतोय. संमेलन गाजायला सुरुवात अध्यक्षीय निवडीने होते. ही निवड काही अपवाद वगळता वाद निर्माण करते. या वर्षीच्या अध्यक्षांची निवड झाल्यावर ते ख्रिश्चन धर्मप्रसारक आहेत यावर वाद सुरु झाला. वास्तविक याचाविचार निवड समितीने करायला हवा होता. दिब्रेटो यांचे साहित्य बऱ्याच लोकांना आवडते . पण एक लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आपले साहित्य निर्मिती नाही तर त्यांच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठीचे साहित्य हे साधन आहे. त्यामुळे ते प्रचारकी व प्रबोधनकारी साहित्य आहे. साहित्य हे केवळ मनोरंजनापुरते नसावे तसेच ते प्रचारकी व प्रबोधनपर पण नसावे. या दोन्ही गोष्टी कलात्मकतेला मारक ठरतात. चांगले साहित्य म्हणजे जे वाचकांना कुठेतरी आपले वाटणारे , लेखकांच्ये अनुभूतीशी तादात्म्य पावणारे असावे.
दिब्रेटो हे ग्रंथ दिंडीत सहभागी झाले नाहीत म्हणून त्यंना खूप ट्रोल केले गेले . पण त्यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले आणि तेव्हा ते व्हील चेअर वर होते. म्हणजे त्यांचा ग्रंथ दिंडीतील सहभाग शारीरिक विकलते मुळे असणार असे मला वाटले. पण पुन्हा प्रश्न येतो की ते जर शारीरिक दृष्ट्या फिट नसतील तर संयोजकांनी त्यांना अध्यक्ष करण्याचा घाट कशाला घालावा? बरे हे आजारपण आताच उद्भवले असे वाटत नाही कारण उदघाटनसोहळ्याची दगाग त्यांना मानवली नाही व त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना संमेलन सोडून मुंबईला जावे लागले व रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
या संमेलनात साहित्यिकांची मुस्कटदाबी होत आहे , वातावरण दहशतीचे आहे असे बोलले गेले. हे पूर्ण राजकीय वक्तव्य होते.कारण माजी अध्यक्षांनी तसे काही होत नसल्याचे म्हटले आहे. सध्या गळचेपी होत आहे वगैरे म्हणण्याची फॅशन झाली आहे. जेव्हा खरोखर विचार स्वातंत्र्यावर , भाषण स्वातंत्र्यावर गदा आली होती तेव्हा हे सारे विचारवंत गप्प होते. १९७६ साली शिट्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत त्यांनी ते बोलून दाखवायचे धाडस केले आणि त्यांना लगेच तुरुंगात टाकण्यात आले आणि आपल्या भाषणाची किंमत त्यांनी विना तक्रार भोगली. असे किती विचारवंत आज वाटेल ते बोलले तरी तुरुंगात गेले आहेत किंबहुना आपल्याला कोणी काही करणार नाही म्हणून्चचे वाचाळवीर मुक्ताफळे उधळत आहेत. यात प्रामुख्याने डाव्या विचारसरणीचे विचारवंत आहेत.त्यांनी स्वतः:च्या मनाशी तपासून पाहावे त्यांना अभिप्रेत क्रांती विचार स्वातंत्र्याला किती महत्व देते .किंबहुना सर्वात जास्त विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी त्यांनीच केली कारण ते लोकशाही मनात नाहीत. त्यामुळे अशी वक्तव्ये व ज्यांना काही महत्व दिले जात जशी असे
ठराव हीच फल निष्पत्ती असलेली ही संमेलने म्हणजे गावच्या जत्रापेक्षा काही वेगळी नाहीत.
अनिल जोशी
१३.०१.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी)

अनिल, अतिशय सडेतोड आणि योग्य विचार. अध्यक्ष कुणाला निवडावे किंवा कोणत्या प्रकारच्या साहित्य निर्मिती करणाऱ्या कलावंताला अध्यक्ष म्हणून निवडावे या बद्दलचे तुझे मत मला जास्त भावले. अनेक वर्तमानपत्रांच्या 'वाचकांची पत्रे' मध्ये तरी किमान हा लेख प्रसिद्ध व्हावा असे मला वाटते. - अवी
ReplyDeleteधन्यवाद
Deleteग्रंथ दिंडी नंतर फ्रान्सिस टुणटुणीत होते असे ऐकले.
Deleteअशा लोकांच्या नाटकांची आणि सो कॉल्ड धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगीपणाची चीढ येते
हेमंत