बिस्किटांची अजब दुनिया

Image result for बिस्कीट चित्रेImage result for बिस्कीट चित्रे

बिस्कीट हा चहा बरोबर येणारा प्रकार. आणि हा मिलाफ म्हणजे तल्लफ आणि अल्प भूक यांचे शमन करणारा आहे. आमच्या लहानपणी बिस्कीट म्हणजे ग्लुकोज बिस्कीट असे समीकरण होते. ते आधी पार्ले चे होते आणि नंतर पार्ले जी झाले. विरार हून मुंबईला लोकल ने जाताना विलेपार्ले स्टेशन आले की त्या  बिस्किटांचा सुगंध आपले अस्तित्व दाखवून द्यायचा. काही वर्षांपूर्वी पार्ले स्टेशन वरून जाताना त्या कारखान्याच्या जवळून जाताना तो सुगंध आला नाही म्हणून पहिले तर गेटवर उद्योग जगतातला अपरिहार्य भाग म्हणजे लाल बावटा लागला होता.
ग्लुकोज बिस्किटा बरोबरच ओळख झाली ती बटन बिस्किटांची. ही अगदी छोटी छोटी बटण सारखी असायची म्हणून बटण बिस्कीटे . याची चव फारशी चांगली नसायची म्हणजे कमी गोड. याच चवीची पण वेगवेगळ्या प्राण्यांचे व पक्षांचे आकार असलेली चित्र बिस्कीटे. त्या चित्रांमुळे ती जास्त आवडायची. सोबत मग खारी बिल्कीते आली .अनेक पापुद्रे असलेली ही बिस्कीटे म्हणजे चवीला एकदम मस्त. मोठ्या पत्र्याच्या ट्रंका घेवून हे बिस्कीट वाले घरोघरी जावून बिस्कीटे विकतात. त्यांना सध्या बॉम्बे खारी असे म्हटले जाते. याचा एक उप प्रकार म्हणजे पिळाची खरी. ही अशी बिस्कीटे बनवण्याचा हेतू मला आजतागायत समजलेला नाही.
ग्लुकोज बरोबर ब्रिटानिया कंपनीची पण मारी बिस्कीटे होती. पण ती अगदीच बेचव. खाल्ली की तोंडात बेचव लगदा असल्याचा फील यायचा. मधुमेह व रक्तदाब असलेल्या व्यक्ती ही आवडीने खातात. नंतर ओळख झाले नाईस बिस्किटांची. त्याला बाहेरून लावलेली साखर हे विशेष आकर्षण. गुड डे या ब्रांड ने बिस्किटाच्या रुपात व चवीत क्रांती केली. गोल आकाराची व थोडी जाड अशी बिस्कीटे खायला छान वाटत होती. यातील एक श्रीमंत प्रकार म्हणजे क्रीम बिस्कीटे. दोन बिस्किटांमध्ये एक विविध चवींच्या क्रीम चा थर. आम्ही तर आधी त्यातील क्रीम चाटून खायचो व नंतर बिस्कीटे.
त्यात आता नान कटाई, कुकीज अशी उपनामे घटलेले वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यात चवींची विविधता खूप असते. अगदी तिखट बिस्कीटे पण असतात.रंग ,आकार,चवी यात विपुल विविधता आली आहे. मीटिंग मध्ये पण चहा बरोबर कुकीज ठेवल्या जातात.
चहात बुडवून बिस्कीट खाणे हा नैसर्गिक प्रकार झाला. पण सभ्यतेच्या व चालीरीतीच्या भ्रामक समजुती प्रमाणे बिस्कीट हे चार चौघात चहात बुडवून खाणे शिष्ट संमत मानले जात नाही. पण बरीच मंडळी हा संकेत सध्या पाळत नाहीत. पण अति खुसखुशीत व मवू बिस्कीटे घात करतात. म्हणजे चहात बुडवून बाहेर काढलेले बिस्कीट तोंडात जाई पर्यंत मधेच तुटून शर्ट वर पडू शकते. असंच एक किस्सा घडला होता. एकदा एक मोठे संपादक आमच्या कंपनीत भेटीला आले होते. त्यांची आमच्या साहेबांबरोबर भेट होती. बोलणे सुरु होते. चहा व बिस्कीटे आली. त्यानी चहा घेतला , त्यांना बिस्कीट घेण्याचा आग्रह झाला. त्यांनी एक बिस्कीट घेतले व ते तोंडात जाई पर्यंत तुटून त्यांच्या सफारी वर पडले. पण ते संपादक आपली हार न मानणारे होते. ते म्हणाले ही बिस्कीटे जास्तच मवू आहेत. म्हणजे दोष बिस्किटांचा.
असाच एक गमतीशीर प्रसंग आमच्या वाहिनीच्या बाबतीत घडला. युरोप ट्रीप मध्ये विदेशी विमान कंपनीच्या विमानातून प्रवास सुरु होता. कंपनीच्या धोरणाप्रमाणे वाईन ,बिअर,देण्यात येत होती. भोजन सामिष होते. वाहिनीने चहा घेतला व बिस्कीट प्लीज अशी विनंती काळी. त्या सेवकाने अतिशय सौजन्याने नो व्हिस्की असे सांगितले. मग कुणाच्या तरी हातातल्या बिस्किटाकडे बोट दाखवले तेव्हा तो म्हणाला ओ यु मीन
कुकीज .
चहाचा सरंजाम मांडल्यावर त्यात बिस्कीटे जशी शोभून दिसतात व त्यात एक शाही रुबाब दिसतो . पण कुठेतरी प्रवासात अगदी जेवणाच्या वेळी जेवण मिळायची शक्यता नसताना एखाद्या कळकट टपरीवर काचेच्या बरणी तील खरी आणि चहा ही पंच पकवाना पेक्षा महत्वाची वाटतात.

अनिल जोशी 
१८.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी 

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती