मन आनंद आनंद डोले-मुक्त चिंतन

man_karya

मन असल्यामुळेच माणसाला मनुष्य, मानव असे म्हटले जात असावे कारण यात म आणि न ही दोन्ही अक्षरे येतात. संस्कृतोत्भव सर्व भाषांमध्ये माणसाला मानव हे संबोधन प्राप्त आहे. पूर्वी मनुनावाचे एक हृषी होवून गेले व त्यांनी मानवाच्या आचार विचारावर बंधने घालणारा जो ग्रंथ लिहिला तो मनुस्मृती म्हणून ओळखला जातो व आता तो बराचसा कालबाह्य झाला आहे. पण हा जो मानवी समुदाय आहे त्याच्या आचार विचारावर काही निर्बंध, कायदे, हे समाज व्यवहार सुरळीत राहण्यासाठी आवश्यक आहेत त्यामुळे मनुस्मृतीची जागा पिनल कोड ने घेतली . हा आजचा विषय नाही पण मनु ऋषींचे नाव हे पण मन या अक्षरानीच बनले आहे. त्यामुळे मन आणि मनुष्य यांचे एक अतूट नाटे आहे अशा निष्कर्षाप्रत आपण येतो.

मानवी शरीर हे माणसाचे दृश्य स्वरूप. हे कुणालाही दिसते. तसेच ते एकाला दिसते तसेच दुसर्यालाही तसेच दिसते . मानवाचे निर्गुण निराकार रूप म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व. हे दैसात नाही पण अनुभवता येते आणि हा अनुभव हा व्यक्तीसापेक्ष असतो. शरीर शास्त्राचा अभ्यास केला तर त्यात कुठे ही मन आढळत नाही. पण मानवाच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर यात मनाचा थोडा ठाव लागू शकतो.
हे मन खूप शक्तिशाली असते. संपूर्ण शरीरावर व व्यक्तिमत्वावर त्याचे नियंत्रण असते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. भाव आणि भावना हे त्या मनाचे घटक आहेत. त्यामुळे माणसाच्या मनोव्यापारांवर भाव भावनांचे नियंत्रण असते. पण शरीरात मेंदू नावाचा एक अवयव आहे. तो शरीराचे सर्व व्यवहार नियंत्रित करतो. हे शास्त्रीय सत्य आहे. पण शरीर शत्राप्रमाणे जो मेंदू आहे तो  दृश्य स्वरूप असला तरी त्याचे पण एक निर्गुण निराकार रूप आहे ज्याला बुद्धी, प्रतिभा, प्रज्ञा म्हणतात. ही मेंदू बरोबर विकसित होत जाते.

डार्विन च्या सिद्धांतानुसार माणूस हे माकडाचे विकसित रूप आहे. हे जरी खरे मानले तरी ते पूर्ण सत्य वाटत नाही कारण तसे असते तर सगळी माकडे माणसे झाली असती व माकड नामशेष झाले असते. पण माकडे अजून अस्तित्वात आहेत. पण यातील काही तथ्य खरे मानले तरी असे म्हणतात की माणसाचा मेंदू हा माकडाच्या मेंदू सारखाच असतो फक्त त्यातील १/९ भाग हा माणसाच्या मेंदूचा  वेगळा असतो आणि तो भाग म्हणजे माणसाची बुद्धी, प्रतिभा, विचार करण्याची शक्ती.

(मेंदूला एकाच विषयावर केंद्रित करण्याकरिता डोळे व कान या मेंदूच्या व पर्यायान मनाच्या खिडक्या बंद कराव्या लागतील . बंद याचा अर्थ झोपेत डोळे व कान बंद असतात तसे नव्हे . तर या २ इंद्रियांना सर्वशक्तीनिशी त्या विषयावर केंद्रित केलं पाहिजे .अर्थात ५ हि ज्ञानेंद्रियांना एकाच विषयावर केंद्रित केले जाते . उदा : आवडता खेळ , डान्स , चित्रकला इ. आपल्याला काय व्हायचं ? लोखंड कि लोहचुंबक ? यशवान , किर्तीमान , ऐश्वर्यसंपन्न कि अपयशी , दरिद्री , दु:खी ? ते आपणच ठरवायचं . आपले मन जेथे रमते ते काम आपण नेहमी करावे.)

या मानवी मनाची उपद्रव शक्ती सर्वात प्रथम लक्षात आली ती समर्थ रामदास स्वामींच्या. बुद्धी आणि मन यांचा संघर्ष त्यांना जाणवला असावा त्या मुळे त्यांनी मनुष्याला जो काही उपदेश केला तो मनाला उद्देशून.
अचपळ मन माझे नावरे आवरिता
असे म्हणून समर्थ मनाला उपदेश करतात. ते पण सध्या सोप्या मनाच्या श्लोकांतून.
(प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये व तत्त्वज्ञानामध्ये मनाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.मन हे राजासारखे असावे पण मनावर नियंत्रण हवे. मनातील सर्व काही बोलण्यासाठी समोर माणूस असून उपयोगाचे नाही तर त्या माणसाला हि जागृत मन असावे)
मानवी मन हि या जगात सर्वात अनाकलनीय अशी गोष्ट आहे.
साधारण हीच तक्रार सर्व संतांची आहे. नामदेव महाराज तर म्हणतात
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा न घे 

आता या मनावर पण खूप ताण येतात, ते आजारी पडते व त्यावर उपचार करावे लागतात. सोप्या भाषेत म्हणजे बुद्धी आणि मन यांच्यात एक नैसर्गिक समतोल असतो तो बिघडला की सगळी घडी बिघडते. अनेक निर्णय बुद्धी सांगत असते पण मन ते मानत नाही मग आधुनिक भाषेत आपण म्हणतो mind set बदलणे आवश्यक आहे. बुद्धीला न पटणारे निर्णय जेव्हा मन घेते तेव्हा त्याची संगती लावणे अवघड होते.

समोरील व्यक्ती जोवर बुद्धीने निर्णय घेत असेल तेव्हा तिला समजून घेणे तसे सोपे असते पण जर ते निर्णय मनाच्या वर्चस्वाखाली घेतले जावू लागले की ती व्यक्ती अनाकलनीय होते.

माणसाच्या व्यक्तिमत्वाचा मन हा एक महत्वाचा घटक आहे आणि प्रत्येकाला आपल्या मनाकडे लक्ष द्यावेच लागते. पण बुद्धी आणि मन यांच्यातील समतोल पण महत्वाचा त्या मुळे मनाची जरा वेगळ्या प्रकारे मशागत करावी लागेल. यासाठी अध्यात्मात बरेच मार्ग आहेत पण ते साध्य करायला साधना करायला हवी व ते सामान्य माणसाला शक्य होत नाही .त्यासाठी दिवसातील अगदी थोडा वेळ आपल्या मनाशी संवाद जमला तर उत्तम पण ते ही शक्य न झाल्यास ललित कलांचा आस्वाद , त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे या मुळे पण मनावरचा ताण कमी होऊ शकेल.हे माझे मत आहे आणि मी एक सामान्य माणूसच आहे.

पण सतारीच्या झंकारणाऱ्या तर जर तुमच्या मनाच्या तर छेडू शकत असतील तर मन आनंद आनंद डोले हे सहज शक्य होईल.

अनिल जोशी 
२६.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी 



Comments

  1. Replies
    1. सहज आणि छान ..सुंदर
      धनश्री जोशी

      Delete
  2. Very true. The power of mind over matter!!

    ReplyDelete
  3. अभ्यासपूर्ण लेखन👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती