Posts

Showing posts from February, 2020

आक्रमक मुस्लीम समाज संदर्भात

गेले काही महिने शाहीन बाग आंदोलन किंवा दिल्लीत  नुकत्याच उसळेल्या दंगली यामुळे मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे अशी चर्चा सुरु आहे. शाहीन बागrदोलन हे शांततापूर्ण सी ए ए विरोधात होते असा प्रचार करण्यात आला. जरी हे आंदोलन रस्ते अडवून झाले तरी ते चिघळू दिले गेले नाही. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर त्यातील राजकीय हवा निघून गेली आणि  राजकीय नेत्यांनी तिथे जाणे बंद केले. इथे आंदोलकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि काहीच पदरात न पडता आंदोलन मागे घ्यावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण या आंदोलकांच्या पुरस्कर्त्यांना हा विषय संपवायचा नव्हता. संसदेने केलेला हा कायदा मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता. आणि हा कायदा हे निमित्त होते. याचे मूळ २०१९ साली नरेंद्र मोदी यांनी पुन्हा निर्विवाद सत्ता मिळवली याच्यात होते. सगळ्या विरोधकांना नैराश्याने ग्रासले होते. वास्तविक मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड , महाराष्ट्र येथील विधान सभांतून भाजपची सत्ता गेली  होती.तेथील निकालांचा व्यवस्थित अन्वयार्थ लावून कॉंग्रेस ला पुनरुज्जीवीत व्हायची संधी होती. पण त्यासाठी देश पातळीवर संघटनात्मक कम करून सू...

तृषार्त मन माझे

Image
तृषार्त मन माझे  कसली ही मृगतृष्णा  सदा धावे मृगजळामागे धाव ही संपेना तृषा काही शमेना असंच होत आपल्या मनाच. वेड मन अप्राप्य गोष्टींमागे धावत सुटत रक्त बंबाळ होईपर्यंत . थकल्यावर विसावत कुठेतरी , मग पुन्हा तीच जीवघेणी धाव. मनाला विसावा देणाऱ्या अनेक गोष्टी सभोवताली असताना सुद्धा तिकडे दुर्लक्ष करून हा प्रवास सुरूच राहतो. मनाचे हे अश्व चौखूर उधळले की त्यांचे लगाम हातात असले तरी त्यावर नियंत्रण राहत नाही. अनेक संतांनी पण या मनाच्या अवखळतेबद्दल लिहिले आहे, उपदेश केला आहे. रामदास स्वामी तर मनाच्या श्लोकांतून अवखळ मनाला वारंवार बजावत असतात. पण शांताबाई मात्र या मनाचे कौतुकच करतात. त्या आकाशातील मेघालाच बोलावतात आणि म्हणतात ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना ये रे घना, ये रे घना ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना ये रे घना, ये रे घना फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू नको-नको म्हणताना, नको-नको म्हणताना गंध गेला राना-वना ये रे घना, ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना ये रे घना, ये रे घना टाकुनिया घरदार नाचणार, नाचण...

खंडाळ्याचा घाट

Image
घाटाव मंदी घाट हा मोठा खंडाळा हा अवघड   असं एक गाणं आहे. मुंबई पुण्याच्या लोकांना हा घाट परिचित आहे. कारण मुंबईहून पुण्याला जायला हा घाट पार करायलाच लागतो. या घाटाचे वैशिष्ठ्य म्हणजे सुमारे २४ लहान मोठ्या बोगद्यांतून गाडी प्रवास करते. लहानपणी पुण्याला जातांना या बोगद्यांचे विलक्षण आकर्षण वाटायचे. आणि त्यावेळी जरी रस्ता असला तरी बरीच वाहतूक रेल्वेने व्हायची. या घाटाची चाहूल लागायची ती कर्जत ला मागे आणखी इंजिन लागायचे. आणि प्रत्येक वळणावर खिडकीतून ही दोन्ही इंजिने पाहता यायची. घाटाची चढण जाणवायची. सगळं अद्भुत होत.आणि गाडी लोणावळ्याहून सुटली की पुण्याच्या दिशेने सुसाट सुटायची. बोगदा आला की घाट सुरु हे समीकरण इतकं डोक्यात होत की एकदा मी गाडीत जागा असल्याने (पूर्वी गाडीने वेग घेतला की आमची विकेट पडायची )ठाण्यानंतर बोगदा आला तेव्हा आता इतर बोगदे कधी येणार याची वाट पाहत होतो. नंतर समजलं की हा पारसिक बोगदा आणि घाट यांचा काही संबंध नाही. मग नागपूरला जाताना कसारा घाट लागला. त्याला ६-७ बोगदेच होते त्या मुळे तो घाट काही खास नाही वाटला. पुढे कधी तरी पुण्याहून बसने मुंबईला गेलो तेव्हा बोग...

असा ही एक मेघ मल्हार

Image
भारतीय संगीताला थोर परंपरा आहे तसाच मोठा इतिहास पण आहे. आणि इतिहास म्हटला की त्यात आख्यायिका पण येतात. काही आख्यायिका इतक्या विलोभनीय असतात की लेखक त्यावर लिहायला उद्युक्त होतात. भारतीय संगीताचा इतिहास तानसेन हे नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. या संगीत नायका  भोवती अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातील एक आख्यायिका आज आठवली. या आख्यायिकेंतून प्रेरणा घेत सुमती क्षेत्रमाडे यांनी मेघमल्हार ही कादंबरी लिहिली. एकदा दरबारात ईर्षेला पेटून तानसेन दीप राग गातो. गायन संपते पण त्या रंगामुळे त्याच्या शरीरात दाह उत्पन्न होतो आणि तो काही केल्या शांत होत नाही. आणि मग तानसेन राजधानी सोडून बाहेर पडतो की जेणेकरून त्याच्या शरीराचा दाह कमी होईल .फिरत फिरत तो गुजरात प्रांतात येतो आणि त्याचे वास्तव्य एका धर्मशाळेत असते. त्या धर्मशाळेजवळच एक तळे असते. त्या तळ्यावर पाणी भरायला दोन मुली येतात. पाण्यात घागर बुडवताना बूड बूड असा आवाज येतो. त्या आवाजातून त्या स्वर काढत असतात. त्या अक्षरश: सुरांशी लडिवाळ पणे खेळत असतात.त्या वेगवेगळ्या सुरावटी काढत असतात व त्याचा आनंद घेत असतात. मग त्या मेघमल्हा...

यंत्र युगातील महाकाव्य

Image
सकाळी उठून आवरता आवरता जर काही गाणी सुरु असली तर मन प्रसन्न होते व नवीन दिवसाची सुरुवात करायला हुरूप येतो. रेडिओ सिटी वर सकाळी ५.३० पासून मराठी गाणी सुरु असतात. यामध्ये बरीच नवनवीन गाणी ऐकायला मिळतात तर काही जुनी गाणी पण ऐकायला मिळतात. बऱ्याच वेळा तीच तीच गाणी रिपीट होतात. फक्त विनासायास संगीत कानावर पडत असते पूर्वी आकाशवाणी वर गीत रामायण म्हटले की कुश लव रामायण गती,पराधीन आहे जागती, दशरथा घे हे पायस दान,स्वयंवर झाले सीतेचे  अशी ठराविक गाणी ऐकायला मिळायची. गेले काही दिवस रेडिओ सिटी वर मात्र - ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, नको रे जाऊ रामराया, चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला, अशी फारशी ऐकायला न मिळणारी गाणी पण लागतात. ही गाणी काही दिवस सतत कानावर पडत असल्याने त्यातील सौन्दर्य हळू हळू मनात झिरपत जाते. गीत रामायण हा तास सुगम संगीतातील चमत्कार आहे. एका गुढी पाडव्याला पुणे आकाशवाणी वर सुरुवात झाली व वर्षभर ५२ गाणी करायची असे ठरले . पण त्यावर्षी नेमका अधिक महिना आल्याने ४ गाण्यांची भर पडली व ५६ गाणी झाली. १९८० मध्ये गीत रामायणाला २५ वर्षे झाली म्हणून एक मोठा सोहळा ७ दिवसांचा न्...

डाव मांडून भांडून मोडू नको

Image
बऱ्याच दिवसांनी कुणी तरी भेटत आणि संवाद होतो आपण इतक्या दिवसात का भेटलो नाही? आपलं काही भांडण नाही. म्हणजे भांडण असेल तर संबंध दुरावतात. पण खरंच तसं असतं का? भांडण न होता पण संबंध दुरावलेले असू शकतात. या भांडणाच्या पण वेगवेगळ्या छटा आहेत. त्याचे एक स्वरूप म्हणजे मतभेद . आता मतभेद हे काही विषयांपुरतेच मर्यादित असल्याने तेवढे विषय वगळता संबंध ठीक राहू शकतात. भांडणाचीच अजून एक छटा म्हणजे ईर्षा किंवा द्वेष . या जरा गंभीर बाबी आहेत. या मुळे संबंध तुटतात व ते जोडणे अतिशय कठीण होते. याचीच पुढची पायरी म्हणजे वैर. हे तर महाभयंकर असते. इथे केवळ संबंध दुरावतात असे नाही तर बदला घेण्याची भावना निर्माण होते. आणि हे वैर पुढे कित्येक पिढ्यांपर्यंत चालू राहू शकते आणि पुढच्या काही पिढ्यांना हे वैर का आहे हे पण समजत नाही. याला खानदानी वैर म्हणतात. भांडण  या शब्दाची मराठीत फार साधी आणि सोपी व्याख्या केली आहे. भांडण म्हणजे भांड्याला भांडे लागणे त्यामुळे आवाज होतोच पण भांड्याला भांडे लागल्यानंतर जो ध्वनी निर्माण होतो तो कमी वेळात बंद पण होतो. भांडणाचे पण तसेच आहे. जसे सुरु होते तसेच ते शमते पण. भा...

अधांतरी

Image
आज जयवंत  दळवी यांच्या अधांतरी या कादंबरीची प्रकर्षाने आठवण झाली. याच नाटकावर त्यांचे सावित्री हे नाटक पण रंगमंचावर आले होते. तशा त्यांच्या साहित्यात अतृप्त ( विशेषत: सेक्स बाबतीत ) बर्याच व्यक्तीरेखा येतात. अगदी गुंतता ह्रदय हे पासून अनेक कलाकृतींमध्ये कधी ठळक पणे तर कधी अंधुक उल्लेखाने येतात. पण आज ज्या दोन व्यक्ती रेखा आठवतात त्यात अथांग मधील सुमी (या कादंबरीवर महासागर हे नाटक आले होते) व अधांतरी मधील सावू. या दोन्ही नायिकांमध्ये साम्य असे की या स्वत:चा संसार व्यवस्थित चालू असताना परक्या पुरुषाच्या मोहात आपले आयुष्य उधळून देतात. सुमीचा नवरा उद्योजक आहे तरी एका पार्टी मध्ये रेहमान नावाच्या पुरुषाचे तिला पिसे लागते. तर सावूचा म्हणजे सावित्रीचा नवरा शाम हा प्राध्यापक आहे तर ती केटी नामक पुरुषासाठी आपला संसार उधळून लावते. तेव्हा तिची आत्या जाताजाता सावूच्या आईचा संदर्भ देते. तिची आई तबलजी बरोबर संसार सोडून पळून गेली होती. त्यावर ती म्हणते की शेवटी वळणाचे पाणी वळणाला गेले. एखादी संसारी स्त्री तबलजी बरोबर पळून गेल्याच्या काही घटना ऐकल्या आहेत. अनुप जलोटा यांची पत्नी सोनाली ही सुद्ध...

मी लिहू का?

Image
साधारण पणे कॉलेज मध्ये गेल्यावर सुरवंटाचे फुलपाखरू व्हायला सुरुवात होते. मग हळूच कुणी मनातले व्यक्त करायला कविता लिहू लागतो तर कुणी आपला अनुभव दुसर्याचा म्हणून कथेतून मांडतो. ही लिखाणाची प्राथमिक अवस्था झाली. पुढे ते तसेच चालू राहिले तर प्रगल्भता येते. ही परिस्थिती कॉलेज मधील प्राध्यापकांना ठावूक असते आणि या विद्यार्थ्यांच्या लिखाणाल दिशा मिळावी म्हणून त्यांचा प्रयत्न पण  असतो. मी जेव्हा कॉलेज मध्ये आलो ते १९७१ साल आणि आमचे तत्कालीन एम ई एस कॉमर्स कॉलेज हे अशा उपक्रमांनी बहरले होते. वक्तृत्वाला उत्तेजन मिळावे म्हणून वाद सभा, नाट्य मंडळ,संगीताच्या साधकांना रसिक मंडळ तर साहित्यासाठी दोन मंच होते. एक निनाद हस्त लिखित जे दर पंधरा दिवसांनी नोटीस बोर्ड वर झळकायचे . यात लेखकांबरोबर चित्रकारांना पण आपली चित्रकला चित्रकला दाखवायची संधी असायची . तर दुसरे मध्यम म्हणजे साहित्य चर्चा मंडळ. यात विद्यार्थ्यांनी आपले साहित्य द्यायचे व त्यावर विद्यार्थीच सांगोपांग चर्चा करीत. या वेळी आमचे मराठीचे प्राध्यापक ग स शुक्ल आवर्जून उपस्थित असायचे . त्यांच्या बद्दल एक महत्वाची बाब म्हणजे गहन व्याकरण , कठी...

व पु एक भावलेला लेखक

Image
व पु काळे या नावातच एक प्रसन्नता आहे. करत ते व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न होते. आज पण वपु या नावाला ग्लॅमर आहे, आज त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नावाचे व्हाट्स अँप ग्रुप बनवलेले आहेत. मुळात कथाकार असलेल्या वपुंनी काही कादंबऱ्या पण लिहिल्या तर त्यांच्या पार्टनर चे नाट्य रूपांतर पण झाले होते. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांची यादी पहिली तरी त्यांच्या विपुल लेखन संपदेचा अंदाज येतो तर माझ्या सारख्यांना ही सगळी पुस्तके आपण वाचली आहेत हे आठवून एक सुखद धक्का बसतो. इण्टिमेट, एकमेक, ऐक सखे, कथाकथनाची कथा, कर्मचारी, का रे भुललासी, काही खरं काही खोटं, गुलमोहर, गोफ, गोष्ट हातातली होती !घर हरवलेली माणसं,चक्कर,चतुर्भुज,चिअर्स, जपून टाक पाऊल, झोपाळा, ठिकरी, तप्तपदी, तू भ्रमत आहासी वाया,दुनिया तुला सरेल!,दोस्त, नवरा म्हणावा आपला,  निमित्त, पाणपोई, पार्टनर, प्रेममयी, प्लेझर बॉक्स, प्लेझर बॉक्स – २, फॅंटसी एक प्रेयसी, बाई, बायको, कॅलेंडर, भुलभुलैय्या, महोत्सव, माझं माझ्यापाशी,माणसं, मायाबाजार,  मी माणूस शोधतोय,मोडेन पण वाकणार नाही,  रंग मनाचे, रंगपंचमी, वन फॉर द रोड, वपु ८५,  वपु...

राग मधुवंती

Image
काल बसमधून घरी जाताना पंडित जसराज यांचा मधुवंती ऐकत होतो. थेट मैफलीमधील ध्वनिमुद्रण असल्याने त्यांनी तो छान रंगवला. त्यातील विरहार्त भावना मन व्याकुळ करीत होती पण त्यातील विलक्षण गोडी पण मजा आणत  होती . अर्थात हा राग फार गायला जात नाही आणि मधुवंती म्हटलं की सुमन कल्याणपूर यांचं गाणं आठवत . मधुवंतीच्या सुरासुरातून आळविते मी नाम एकदा दर्शन दे घनश्याम नयनी माझ्या गोकुळ वसले यमुनेचे जळ गाली झरले राधेपरी मी सर्व वाहिले सुख शांतीचे धाम वसंतातले सरले कूजन तुझ्याविना हे उदास जीवन शोधीत तुजला फिरते वणवण, नाही जीवा विश्राम दासी मीरा ये दाराशी घे गिरिधारी तव हृदयाशी या पायाशी मथुरा -काशी, तीर्थापरी हे नाम एकदा दर्शन दे घनश्याम मधुवंती रागावर आधारित काही गाणी निरोप कसला माझा घेता झन झनन छेडिल्या तारा प्रेम सेवा शरण बहरला पारिजात दारी मधुवंतीच्या सुरासुरातूनी स्वप्नात रंगले मी सुमन कल्याणपूर यांचे हे अवीट गोडीचे भावगीत. त्यांचा गोड आवाज आणि जसे शब्द हेत त्याप्रमाणे सम्पूर्ण गाण्यात मधुवंतीचे मधाळ सूर सर्वत्र झिरपत असतात मधुवंती हा तोडी थाटाचा राग आहे .या मध्ये गांधार कोमल...

महाभारत

Image
  सहज मेलबॉक्स पाहत होतो तेव्हा मे महिन्यात केलेली एक कविता सापडली. महाराज या कुरूक्षेत्रावर उभी आहे मधोमध आपली यादवसेना दोन्ही बाजूला आहे विशाल कौरव सेना समोर आहे पांडवसेना आणि पार्थाच्या रथावर आपण साक्षात प्रभू कोणत्याही क्षणी रणभेरी वाजतील शंखध्वनी होईल आणि समोरासमोर असलेली सैन्यदले परस्परांना भिडतील पण तो क्षण अजून आलेला दिसत नाही विलक्षण ताण जाणवतोय सर्व सेना सज्ज आहे शस्त्रे परजलेली पण अजून म्यानात समोर पण तशीच तणावपूर्ण शांतता पार्थाने शस्त्रे ठेवली आपण त्याला काही सांगत आहात दिसतंय पण समजत काहीच नाही वातावरणात काहीतरी चैतन्य जाणवत होतं काही तरी आत  पोचत होतं मनातलं मळभ  दूर होत होतं अखेर तो क्षण आला रणदुंदुभी गर्जू लागल्या शंख ध्वनींनी सगळे आसमंत व्यापलेला पार्थाने धनुष्याची प्रत्यंचा ओढली बाण चढवला आणि गर्जना करत सेना परस्परांना  भिडल्या रणसंग्रामाला सुरुवात झाली एकच ईर्षा एकच ध्यास प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल भाऊ भावांवर गुरु शिष्यांवर सैनिक फक्त सैनिक शत्रुवर तुटून पडायचं प्राण पणाला लावून मृत्यूला सामोरे ...