Posts

Showing posts from May, 2020

आठवणीतील गावे,बेगर्स होम आणि तेथील माणसे

Image
(बेगर्स होम चेंबूर यु ट्यूब सौजन्य ) ( आमच्या चेंबूर येथील घराबाहेत अशी रातराणी होती, जिचा घमघमाट सर्वदूर पसरायचा ) आठवणीतील गाव विसापूर लिहिताना तेथील बेगर्स होम चा उल्लेख होता. आणि आज मी विरार या गावाविषयी लिहितांना पण बेगर्स होम चा उल्लेख होणे अपरिहार्य आहे कारण आम्ही वडिलांच्या नोकरी निमित्त ज्या ज्या गावी वास्तव्य केले तिथे एक तर बेगर्स होम तरी होती किंवा बाल सुधार गृहे तरी. महाराष्ट्रात एक भिक्षेकरी कायदा (Beggars Act ) आहे त्या नुसार भीक मागणे हा गुन्हा आहे आणि यासाठी १ ते ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण या गुन्हेगारांना नेहेमीच्या तुरुंगात न ठेवता बेगर्स होम मध्ये ठेवण्यात येते व तिथे त्यांना स्वावलंबी होण्यासाठी व्यावसायिक शिक्षण ( सुतार काम , गवंडी काम , हातमाग विणकाम , कुक्कुट पालन, इत्यादी. ही बेगर्स होम समाज कल्याण खात्या तर्फे चालवली जातात. अर्थात भिकार्यांची संख्या व उपलब्ध बेगर्स होम यांचे व्यस्त प्रमाण असल्याने शिवाय सध्या अशी बेगर्स होम चालू आहेत की नाही याची पण कल्पना नाही. आणि एकदा भिक मागण्याची व त्यातून सोप्या पद्धतीने पैसे मिळायला लागले की कष्ट नको वाटतात. पण ...

सदासुहागन सदारंजनी भैरवि

Image
रंगलेल्या मैफलीत भैरवीचे सूर छेडले जातात आणि मैफलीच्या समाप्तीची चाहूल लागते. त्यात मैफल संपल्याची हूर हूर असते पण तृप्तीची भावना पण तितकीच असते. तुडुंब जेवण झाले तरी स्वीट डिश ची लज्जत काही न्यारीच असते. अति मधुर सूर सगळ्या मैफलीवर एक छान सुरेल आवरण घालतात आणि मैफल परिपूर्ण होते. भैरवी ही चटका लावून जाणारी असते आणि अनेक मान्यवर कलाकारांनी आपली छाप एकेका भैराविवर टाकली आहे. भैरवी ही मैफलीच्या शेवटी गायिली जाते पण कट्यार काळजात घुसली या नाटकात सुरुवातीलाच भैरवी आहे. याचे कारण असे दिले गेले की नाटकाची जरी सुरुवात असली तरी भानुप्रसाद पंडित या गायकाच्या कारकीर्दीचा तो  शेवट होता . भैरवी म्हणजे भजन, ठुमरी, चीज, अशी गायिली जाते. खयाल सहसा नाही. पण एका सवाई गंधर्व संगीत समारोहात रविवार सकाळच्या सत्रात शेवटचे कलाकार अजय चक्रवर्ती यांनी भैरवीत खयाल सादर केला होता तो ऐकायचा सुयोग आला होता. सैगल पासून भीमसेन, किशोरी यांची बाबुल मोरा कशी विसरता येईल ? विनायक बुवा पटवर्धन , ओमकारनाथ ठाकूर , मल्लिकार्जुन मन्सूर अशा बुजुर्ग कलाकारांनी जोगी मत जा ही अमर केलेली भैरवी. भवानी दयानी ह...

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

Image
(देवरुख ची गायिका रसिका गानू ) देवरुख हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असलेले गाव. कोकण म्हणजे तसा डोंगराळ प्रदेश पण रत्नागिरी जिल्ह्यात दोन गावे अशी आहेत की ती पठारावर आहेत त्यामुळे ती विशेष मानली जातात. एक दापोली व दुसरे देवरुख. देवरुख हे दोन महामार्गांच्या मधोमध व उंचावर आहे. कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील साखरपा व मुंबई गोवा रस्त्यावरील संगमेश्वर या दोन्ही ठिकाणांहून सारख्या अंतरावर (१६ किमी) हे गाव वसलेले आहे. या गावाचा माझा संबंध हा १९८१ मध्ये माझ्या विवाहानंतर आला. येथील माणिक रामकृष्ण दिक्षित हिच्याशी पुण्यातच विवाह झाल्यानंतर खास जावई या विशेष नात्याने या गावी प्रथम गेलो. तसे हे दिक्षित यांचे मूळ गाव नव्हे. श्वशुर रा वा दिक्षित हे देवरुख येथे १९७० च्या सुमारास नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालाचे प्राचार्य म्हणून इथे आले होते. त्यांची अध्यापनाची सगळी कारकीर्द कर्नाटकात बेळगाव, गडद, निपाणी येथे घडली होती. अध्यापन व प्रशासन यातील हातोटी व काहीतरी साध्य करायचा ध्यास यामुळे ते इथे आले. त्यांचे मूळ गाव देवगड तालुक्यातील तिर्लोट. त्यामुळे या कोकण भूमीत...

ते ठीक आहे , भाजपचे काय?

Image
मी गेले दोन दिवस कॉंग्रेस च्या एकूण खेळी बद्दल लिहित होतो. त्यावर प्रतिक्रिया अशी आली की कॉंग्रेस ची या सरकारमध्ये येण्याबाबत काही धारणा असणार,राष्ट्रवादीचा पण काही डाव असू शकतो , शिवसेनेची महत्वाकांक्षा असू शकते. मग भाजपचे काय? त्यांचा अति आत्मविश्वासाचा फुगा फुटलाच की नाही? फडणवीस यांनी जागा कमी मिळाल्यावर सेनेला मुख्यमंत्रीपद देवून रिमोट कंट्रोल स्वत:कडे का ठेवला नाही? का फडणवीस यांची महत्वाकांक्षा पक्षाच्या हिताच्या आड आली? वास्तव हे आहे की महाआघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे पराभव झाला त्याचे उत्तरदायित्व नैसर्गिकरीत्या फडणवीस यांच्याकडे जाते. आणि पराभवाला कुणी पालक नसतो. तो स्वीकारावा लागतो आणि टीकेचे धनी व्हावेच लागते. आता महाघाडी सरकार होणे थांबवता आले असते का? अर्थात या जर तर च्या चर्चेला तसा अर्थ नाही पण त्या काळातील परिस्थिती पाहता काही अंदाज माझ्या आकलनानुसार. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी (कोणत्याही किमतीत सगळे पर्याय उघड ठेवून) आग्रही होते आणि त्यांचा दावा होता हा भाजपने त्यांना शब्द दिला होता. आणि तसे काही ठरले नसल्याने फडणवीस यांनी ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद ...

प्रवासातील कुतूहल

Image
  प्रवास हा एक गुरु आहे असे म्हणतात पण प्रवास जे काही आपल्याला शिकवतो त्या साठी आपले कुतूहल मात्र जागृत असायला हवे. आता प्रवासाला जाताना आपण आपली जागा आरक्षित करतो. आणि मग आपल्याला कोणत्या जागेवर बसून वा बर्थ वर झोपून प्रवास करायचा आहे हे समजले की प्रच्वासातील अर्धे कुतूहल संपून जाते. अचानक प्रवासाला निघायचे आहे आणि आपण बस स्टोप वर वा स्टेशन वर बस/गाडी पडायला जातो. कोणती बस /गाडी मिळणार, बसायला जागा मिळेल की नाही अशा अनिश्चित अवस्थेत आपण प्रवास सुरु करतो कधी छान जागा मिळते व प्रवास सुखकर होतो तर कधी हाल होतात पण प्रवासाची निकड असल्याने आपण ते गोड मानून घेतो. गर्दीच्या दिवसात विना आरक्षण प्रवास नको वाटतो. म्हणजे आपल्याला बस मध्ये प्रवेश पण मिळत नाही. असाच एक प्रसंग घडला. कोल्हापूर हून पुण्याला यायचे होते. कोकणातून कोल्हापूरला एकाला आरक्षण करायला सांगितले होते. पण त्याला ते जमले नाही आणि ओ भेटला पण नाही. तेव्हा आतासारख्या खूप बसेस वा खाजगी गाड्या नव्हत्या. तिथून सुटणाऱ्या सगळ्या गाड्या फुल. मग स्टेशनवर आलो. थोड्या वेळाने महाराष्ट्र एक्स्प्रेस सुटणार होती. मग एका हमालाला थोडे पैसे ...