Posts

Showing posts from December, 2019

वर्ष सरले

वर्ष सरले  आज ३१ डिसेंबर म्हणजे वर्षाखेर म्हणजे रुक्ष भाषेत भिंतीवरील कॅलेंडर बदलाचा दिवस. पण हा बदल नवीन वर्षाचे स्वागत म्हणून उत्साहात साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे सगळ्यांना नेहेमीच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा हवा असतो आणि म्हणून असे सण, उत्सव साजरे केले जातात . याला पौराणिक संदर्भ पण आहे. रामायण काळात सीता त्यागानंतर रामराज्य सुरळीत सुरु होते.पण तेच तेच पण आणि जीवनातील रुक्षपण यामुळे प्रजा उदास होती असा रामाला अहवाल मिळाला . व राजसभेत यावर असे ठरले की रामाने राजसूय यज्ञ करावा म्हणजे प्रजाजन हा उत्सव साजरा करतांना आनंदित होतील. तसेच सौभद्र नाटकात पण नारद लग्नाला जातो मी या गाण्यात म्हणतो - न मिळे अशी मौज पहावया पुन्हा . असर हे सण व उत्सवाचे महात्म्य. या निमित्ताने नवीन वर्षात संकल्प केले जातात.मी सहसा असे काही ठरवत नाही पण यंदा या ब्लॉगच्या निमित्ताने दिसामाजी काही लिहित जावे असा मानस आहे. म्हणजे सक्ती नाही .एखाद्या दिवशी काही सुचले नाही तर नाही लिहायचे . पण अशी शक्यता कमी कारण लिहायला उद्युक्त करणारी घटना दिवसात घडली नाही असे सहसा होत नाही .आणि तसे न झाल्यास सरलेल्...

निवेदनातील करामती

निवेदनातील करामती -अनिल जोशी  आज मालती पांडे यांची जुनी भावगीते ऐकत होतो.  लपविलास तू हिरवा चाफा , या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, त्या तिथे पलीकडे अशी काही. यातील काही ओळी विशेषत्वाने आठवल्या.  गवत उंच दाट दाट वळत जात पायवाट वळत जात पायवाट वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे माझिया प्रियेचे झोपडे. याच ओळी आठवण्याचे कारण म्हणजे आम्ही कलासागर तर्फे दर कोजागिरीला विशेष मराठी कार्यक्रम करायचो. म्हणजे तो उपक्रम अजूनही चालू आहे फक्त मी त्यात नाही. कारण माजी झालो. तर बर्याच वेळी त्याचे निवेदन मी लिहित असे. जर निवेदन स्वत: करायचे असेल तर त्याची रूपरेषा लिहून ते आयत्यावेळी करता येते. पण आपण दुसर्या निवेदकासाठी निवेदन लिहायचे असेल तर ते तपशीलवार व सगळे लिहावे लागते. बरे कार्यक्रम पूर्ण आखलेला असेल तर त्या निवेदनात सुसूत्रता येते.. पण बर्याच वेळा गाण्यांची यादी हाती येत असे व त्यांचा क्रम पण ठरलेला नसायचा अशावेळी निवेदन लिहिणे ही कसरत असायची. बरे एकदा लिहिले व मग बदलले असे करायला वेळ पण नसायचा.  अशा वेळी माझी एक पद्धत मी ठरवली होती. यादी आली की लगेच त्या रात्री कार्यक्...

तीच चव

तीच चव  आज खूप वर्षांनी स्वीट होम मध्ये गेलो होतो. सकाळची वेळ आणि हवा आल्हाददायक गार होती. तेव्हा वाफाळलेली कॉफी प्यायची इच्छा झाली. सध्या साधी गोड जायफळ युक्त कॉफी दुर्मिळ झाली आहे. पूर्वी लग्नाच्या आदल्या दिवशी सीमांत पूजनाला सर्रास जेवण नसायचे तेव्ह्या कॉफी द्यायची पद्धत होती. ब्रू, नेस्कॅफे, सीसीडी , latte, coppichinu, अशा अनेक प्रकारची कॉफी आपल्या समोर येत असतात. त्यातून वयपरत्वे शुगर लेस कॉफी अनिवार्य. सुमारे ४८-४९ वर्षांपूर्वी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलो तेव्हा होस्टेलवर पुण्याबाहेरचे अनेक विद्यार्थी होते. त्यापैकीच कुणी तरी स्वीट होम मधील कॉफी बद्दल सांगितले. मग तिचा आस्वाद घेतला. नंतर तेथील साबुदाणा खिचडीने पण भुरळ पाडली. तेथील शेवेची पखरण असलेले इडली सांबार वैशिष्ठ्यपूर्ण होते. त्याच्या पूर्ण मराठी पेहरावामुळे ते तितकेसे रुचले नाही. आता स्वीट होम ने कात टाकली आहे. अनेकविध पदार्थ तुमची जिव्हा तृष्णा तृप्त करायला उपलब्ध आहेत. विशेषत: उपवासाचे पदार्थ. अशा वेळी सध्या तिथे कॉफी मिळेल की नाही याबद्दल मी साशंकच होतो. पण तिथे होकार मिळाला. फरक फक्त तेव्हा जितक्या...

हरवलेल्या पत्त्यांचा (की नात्यांचा) बंगला

हरवलेल्या पत्त्यांचा (की नात्यांचा) बंगला सध्या नवीन आलेले हे नाटक गाजते आहे. असे म्हणायचे कारण की याची तिकिटे on-line लगेच संपतात . पण आठवडाभर आधी करून का होईना आजच्या प्रयोगाची तिकिटे मिळाली. आणि एक चांगला प्रयोग पाहिल्याचे समाधान पण मिळाले. या नाटकाबद्दल आणखी एका कारणाने उत्सुकता होती ती म्हणजे यात वंदना गुप्ते महत्वाची भूमिका करणार होत्या. कलर्स मराठी वरील एक मराठी मालिका त्या करत होत्या त्यात त्यांच्या क्षमतेला न साजेशी भूमिका त्या करत होत्या. आता त्यांनी ती मालिका सोडली आणि आज त्यांचे काम पाहून वाटले - होय याला वंदना गुप्ते म्हणतात. स्वरा मोकाशी यांनी नेटकेपणाने हे नाटक लिहिले आहे. तुलना करू नये पण त्यांचे लिखाण हे वसंत कानेटकर यांच्या लिखाणासारखे बांधीव वाटले. काही संवाद दाद घेवून गेले. वय उताराला लागलेल्या एका एकाकी स्त्रीच्या अवस्थेचे चित्रण आहे. सोबत म्हणून एक पेयिंग गेस्ट मुलगी- निधी -तिथे राहत असते. मुलगा सून व नात अमेरिकेत. मुलगी इथेच . ती तिच्या मुलाला आई कडे ठेवायचा प्रस्ताव आणते पण तिची परवानगी गृहीत धरून . आणि त्यासाठी ती निधीला घराबाहेर पण काढते व तिची बदली झाली म्...

आवडलेली कविता

आवडलेली कविता  गर्दीत तुझा हात सूटतांना,  धस्स झालेलं काळजात.. छे..! अासक्ती नाही रे कसलीच.. अाणि तुझ्याशिवाय जगण्याची काळजी? ती तर मूळीच नाही..! तुझे तत्त्वं,तुझे विचार,तुझे सारे सारे ऋतु रुजलेत पंचप्राणात माझ्या.. अाता तुझ्यानंतरही 'तुझ्यासहच' असेल जगणं माझं.. पण माझ्यानंतर स्पर्शेल का कोणी तुझ्या अथांग,पारदर्शी डोळ्यांपल्याडच्या अात्म्यास?.. समजेल तिला तुझी मौनाची भाषा..? तुझ्या ह्रदयापर्यंत पोहोचणारी एक 'अरुंदशी पायवाटही',जी फक्त मलाच गवसली.. ती सापडेल कोणास? तू तर माझ्या पावलांचे ठसेही पुसून टाकलेस त्या वाटेवरले..कोणी मागोवा घेत पुन्हा येऊ नये म्हणून.. अाणि वाचताही येणार नाहीत तुझ्या अाभाळभर पसरलेल्या मनावर कोरलेले गूढ शिलालेख कोणाला.. 'माझ्या डोळ्यांनी'..! तुझ्या डोळ्यांतून क्वचित कधीतरी ओघळलेला अन् तोही माझ्या ओंजळीतून निसटू न दिलेला .. 'इमानदार अश्रु' अाता ओंजळ नसल्याने ओघळणारही नाही कदाचित..! मग अजूनच गोठशील तू.. तुझं अस्तित्त्वं वितळवणारी, माझी मिठीही नसेल तिथे...   म्हणून सैलावत नव्हती पकड....

राजकारणातील द्वेष आणि विरोध

राजकारणातील द्वेष आणि विरोध आज राजकारणात आपल्याला विरोधापेक्षा द्वेष जास्त दिसतोय पण हे फर आधीपासून चालू आहे. फर इतिहासात न जाता एवढच सांगता येईल की स्वातंत्र्यानंतर जेव्हा कांग्रेस ने सत्ता मिळवून कारभार सुरु केला तेव्हा भ्रमनिरास  झाल्याने समाजवादी मंडळी कांग्रेस पासून वेगळी झाली अणि त्यांनी वेगळी चूल मांडली अणि ते कांग्रेस चे विरोधक झाले. त्यातील जे मवाळ होते ते कांग्रेस चे विरोधक झाले. यातील जहाल होते ते मात्र कांग्रेस चा द्वेष करीत. यातील प्रमुख नाव म्हणजे डॉ राम मनोहर लोहिया. ते नेहरूंचे कमालीचे द्वेष्टे होते आणि ते तो उघडपणे करत।  पण त्याचा अतिरेक पाहून विचारवंत प्रभाकर पाध्ये यांनी जाहीर केले की यापुढे या माणसाबरोबर चर्चा ,गप्पा बंद. आधी हिंदूमहासभा अणि मग संघ व् जनसंघ यांचे समर्थक कांग्रेस चा द्वेष करीत. आणि आपण कांग्रेस ला पराभूत करू शकत नहीं या उद्विग्नतेतून होत असावा. १९६७ मधे कांग्रेस चा अंशत: पराभव झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या पैन १९७१ मधे इंदिरा गांधी यांनी सत्ता बळकट केली अणि विरोधक हताश झाले. अणि येन केन प्रकारे इंदिरा गांधी यांना सत्ताभ्रष्ट कर...
अटलजी एक राजस व्यक्तिमत्व आज अटलजींची जयंती. भारतीय राजकारणातील एक राजस पर्व. १९६९ साली आम्ही मुंबईत राहत होतो. सायन हून चेंबूर ला बस ने जाण्यासाठी स्टोप वर उभा होतो तेव्हा उघड्या जीप मधून अटलजी मुंबईत प्रवेश करत होते. त्यांचे आगमन हे त्यावेळी मुंबईत जनसंघाचे अधिवेशन होते व ते नव निर्वाचित अध्यक्ष होते. हे त्यांचे झालेले पहिले दर्शन. त्या अधिवेशनात पक्षाबाहेरील अतिथी म्हणून आचार्य अत्रे यांना निमंत्रित केले होते असे पण आठवते. पुढे १९७० च्या मे महिन्यात संघ शिक्षा वर्गासाठी नाशिक येथे गेलो असताना एके दिवशी अटलजींचे बौद्धिक ५ फूट अंतरावरून ऐकायचा योग आला होता. ते त्यांचे अ राजकीय भाषण होते. त्यातील एक वाक्य अजून आठवते आहे. ते म्हणजे "संघ समझना आसान नही है." पुढे त्यांची काही अ राजकीय भाषणे पण ऐकली होती. त्यात गीत रामायणाच्या रौप्य महोत्सवात केलेले भाषण, गोळवलकर गुरुजींच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी झालेले भाषण आठवते. नाशिकच्या वर्गानंतर लगेच भिवंडी येथील दंगली नंतर मुंबईत एका भव्य सभेत त्यांचे याज्कीय भाषण प्रथम ऐकले. मग अनेक वेळा ऐकत गेलो. पण त्यांची भाषणे ही राजकीय असली त...

पण अपुल्या हाताने

साधारण पणे आपण लिहितो ते अन्य कुणी प्रसिद्ध करतो . पण असं नेहेमी होतंच असं नाही. मनात अनेकवेळा अनेक विचार येत असतात पण ते लिहिले जातीलच असे नाही कारण बरेच विचार प्रासंगिक असतात. कधी एखादी मैफल, वाचलेलं पुस्तक, पाहिलेला सिनेमा किंवा नाटक, वाचलेली बातमी, घटना, आपल्याला लिहिण्यासाठी खुणावत असतात. सध्या सोशल मिडीयावर लिहून हे काही प्रमाणात सध्या होत पण ते सगळीकडे पाठवत बसावं लागत .म्हणून हा ब्लोग . इथे लिहून लगेच प्रसिद्ध करता येत. थोड आपणच आपल्या हातांनी असं होतंय , पण पाहूया. अर्थात अनेकांनी माझे लिखाण आवडतं असं सांगितल्याने हा उपक्रम सुरु करत आहे. धन्यवाद. अनिल जोशी 

नवीन सुरुवात

नमस्कार आज हा नवीन ब्लोग सुरु करत आहे. आपल्या मनातील काहीतरी साहित्य, संगीत, प्रवास, राजकारण,अर्थकारण या विषयांवर इथे लिहिण्याचा विचार आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि शुबेच्छा हव्यातच. अनिल जोशी