हरवलेल्या पत्त्यांचा (की नात्यांचा) बंगला

हरवलेल्या पत्त्यांचा (की नात्यांचा) बंगला

सध्या नवीन आलेले हे नाटक गाजते आहे. असे म्हणायचे कारण की याची तिकिटे on-line लगेच संपतात . पण आठवडाभर आधी करून का होईना आजच्या प्रयोगाची तिकिटे मिळाली. आणि एक चांगला प्रयोग पाहिल्याचे समाधान पण मिळाले. या नाटकाबद्दल आणखी एका कारणाने उत्सुकता होती ती म्हणजे यात वंदना गुप्ते महत्वाची भूमिका करणार होत्या. कलर्स मराठी वरील एक मराठी मालिका त्या करत होत्या त्यात त्यांच्या क्षमतेला न साजेशी भूमिका त्या करत होत्या. आता त्यांनी ती मालिका सोडली आणि आज त्यांचे काम पाहून वाटले - होय याला वंदना गुप्ते म्हणतात. स्वरा मोकाशी यांनी नेटकेपणाने हे नाटक लिहिले आहे. तुलना करू नये पण त्यांचे लिखाण हे वसंत कानेटकर यांच्या लिखाणासारखे बांधीव वाटले. काही संवाद दाद घेवून गेले. वय उताराला लागलेल्या एका एकाकी स्त्रीच्या अवस्थेचे चित्रण आहे. सोबत म्हणून एक पेयिंग गेस्ट मुलगी- निधी -तिथे राहत असते. मुलगा सून व नात अमेरिकेत. मुलगी इथेच . ती तिच्या मुलाला आई कडे ठेवायचा प्रस्ताव आणते पण तिची परवानगी गृहीत धरून . आणि त्यासाठी ती निधीला घराबाहेर पण काढते व तिची बदली झाली म्हणून स्वत: राहायला येते. आई अस्वस्थ असते . तिची अस्वथता नेपथ्य , अभिनय , पात्रांच्या हालचाली यातून संवादाशिवाय प्रेक्षकांपर्यंत पोचतात. यावर कळस म्हणून मुलगी स्वत:ची सासू आजारी म्हणून आईला तिकडे पाठवायचा घाट घालते. आणि या अस्वस्थेत असतानाच निधी तिला भेटायला येते आणि सगळे बंध कोसळतात. निमित्त वृद्धाश्रमात आलेलेल्या तिच्या बहिणीच्या मृत्यूचे. मग एक वेगळी स्वत्वाची जाणीव झालेली आई पुढे येते. इथे नात्यांचे वेगवेगळे पदर पुढे येतात. वृद्धाना गृहीत धरण , नात्याचे अधिकार गाजवण नि हे करतांना त्या व्यक्तीवर कळत न कळत आक्रमण कारण. एक चांगली संहिता, वंदना गुप्ते -आई , प्रतीक्षा लोणकर इरा म्हणजे मुलगी या दोन समर्थ अभिनेत्रींच्या अभिनय जुगलबंदीत निधी झालेली दीप्ती लेले आपला विशेष ठसा उमटवून जाते. त्यांना इतर कलाकारांनी पण छान साथ दिली आहे. दिग्दर्शक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी हे नाव आपल्या कीर्तीला साजेसा ठसा उमटवते. अर्थात प्रेक्षकांचा प्रतिसाद पण उत्साहवर्धक होता.

अनिल जोशी
२८.१२.२०१९.

Comments

  1. नाटकातील कलाकार आणि दिग्दर्शक यांची नावं वाचून काहीतरी चांगलं असावं असं वाटत होतं. धन्यवाद तुझ्या अभिप्रायाबद्दल!

    ReplyDelete
  2. नाटक बघायला पाहिजे.

    ReplyDelete
  3. Thanks for the review and gist. Will.watch when I get a chance!!

    ReplyDelete
  4. नक्कीच बघण्यासारखे... छान रिव्ह्यू

    ReplyDelete
  5. Gharo ghari maatichya chuli. Good artist make such stale tales tolerable.

    ReplyDelete
  6. Natakacha vishay khup vegala aahe..nice article as usual

    ReplyDelete
  7. सुंदर समीक्षा... धन्यवाद..
    ... प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह ,गुरुकृ संस्था.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती