Posts

Showing posts from June, 2020

मु पो टिळकनगर, डोंबिवली -ती २ वर्षे

Image
(शाळेचे फोटो सौजन्य पुुुष्पा जपे संदर्भ मााझी  शाळा व्य.ल. जपे) पुण्याहून जाताना कल्याण सुटले की गाडी वेग घ्यायची आणि बाजूचे ठाकुर्ली स्टेशन लक्षात यायचे नाही पण डोंबिवली स्टेशन च्या ४ क्रमांकाच्या फलाटावरील धुरळा उडवत गाडी सुसाट जायची. अशा या डोंबिवलीत चक्क दोन वर्षे राहण्याचा योग आला. तसा दोन वर्षांचा काळ म्हणजे फार नाही पण त्या दोन वर्षात जे जे काही मिळाले ते इतके भरघोस होते की ती शिदोरी आज जवळ जवळ ५० वर्षे उलटून गेली तरी पुरून उरली आहे. माझा धाकटा मामा- विजुमामा याने बिऱ्हाड करण्यासाठी डोंबिवलीत जागा घेतली. त्या नंतर एक चुलत मामा -ज्याचे नाते सक्ख्या नात्याप्रमाणे घटत होते - शिरू मामा याने पण डोंबिवली येथे जागा घेतली. दोन्ही जागा टिळक नगर मधेच. तर शिरुमामाची जागा पाहायला आम्ही डोंबिवलीत गेलो तेव्हा वडिलांचे एक मावस भाऊ बापू सहस्रबुद्धे व बहिण मराठे यांच्या राम नगर मधील घरी पण गेलो होतो. ही दोन्ही घरे स्टेशन जवळ होती. पुढे मामेभाऊ सुहास याची मुंज डोंबिवलीत झाली (ब्राम्हण सभा - निमकर मामा कंत्राटदार ) कारण मुंबई पेक्षा तिथे कार्य स्...

अपुले बोलणे आपल्याशी

Image
गेला आठवडा सुशांत राजपूत या अभिनेत्याची आत्महत्या हा विषय चर्चेत होता. एका आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याची आत्महत्या चुटपूट लावून गेली व त्या निमित्ताने या विषयाचे अनेक पैलू बाहेर चर्चेत आले. त्या पैकी कोणतीही व्यक्ती असा टोकाचा निर्णय घेण्याप्रत कशी येते हे समजत नाही कारण मानवी मनाचे मनोव्यापार अतिशय गुंतागुंतीचे असतात. कुणी एकटे पडल्यास त्याला सावरणे आवश्यक असते पण त्या साठी हे एकटेपण समजणारे दुसरे कुणी जवळचे असणे आवश्यक असते. प्रत्येकाला आपले डोके टेकायला कुणाचा तरी खांदा आवश्यक असतो. पण तो तसा मिळतोच असे नाही आणि तसे न झाल्यास एकाकीपण वाढत जाते. मानस शास्त्र असे सांगते की असे एकाकीपण वाढत गेले की डिप्रेशन येते. आणि या मनातील या वादळाला जर योग्य वळण नाही मिळाले तर ते डिप्रेशन वाढत जाते. आणि असे वाढलेले डिप्रेशन अखेर त्या व्यक्तीला आत्महत्येच्या टोकावर घेवून जाते. यशाच्या शिखरावर असताना कुणी जवळचे नसणे हे क्लेशदायी असतेच आणि ते एकाकीपण असह्य होते. पण हे एकाकीपण कुणालाच चुकलेले नाही. पण त्यावर प्रत्येक जण काही ना काही पर्याय काढत असतो. माणसाने या साठीच कुटुंब...

अनाकलनीय शरदराव

Image
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नाव. आम्ही त्यांचे नाव ऐकू लागलो ते युवा नेते म्हणून आणि आज ते एक ज्येष्ठ नेते आहेत. युवा नेते ते ज्येष्ठ नेते असा हा प्रवास आहे. याची सुरुवात १९६७ मध्ये ते प्रथम विधानसभेवर निवडून आले तेव्हा पासून धरली तरी त्या अगोदर पासून ते महाविद्यालयीन जीवनात ते युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून  सक्रीय होते. अगदी त्या काळातील नाही पण त्या नंतर ५-६ वर्षांनी पुण्यातील युवक व विद्यार्थी चळवळीशी संबंध आला त्या वेळी युक्रांद, एनएसयु आय (कॉंग्रेस) अभाविप या संघटना जोमात होत्या. त्यामुळे राजकीय नेत्यांचे तरुण नेत्यांकडे लक्ष असायचे.  महाराष्ट्राचे द्रष्टे नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांनी या तरुणामधील नेतृत्व गुण हेरून राजकारणात त्यांना आणले. १९६७ ते १९७२ ते सत्ताधारी पक्षाचे आमदार होते आणि तेव्हा पक्ष भक्कम होता. सरकार स्थिर होते. देश भरात कॉंग्रेस सरकारे पडली होती तरी महाराष्ट्र कॉंग्रेस च्या मागे उभा होता. मंत्रिमंडळ पण स्थिर असायचे. आज पण त्या काळातील मंत्री व त्यांची खाती आठवतात. एकूण २०३ आमदार कॉंग्रेस चे होते . ( शेषराव वानखेडे -अर्थ, नारेन्फ...

स्फूर्तीदायी स्मरण – प्राचार्य रा वा दीक्षित (१९२३-१९९०)

Image
फोटो-१) आमच्या विवाह समारंभात दुर्मिळ हास्य मुद्रा, कन्यादान व नातवाचा पहिला वाढ दिवस . स्पेवशल आठवणीतील गाव देवरुख लिहिताना एक ओझरता उल्लेख आला होता तो माझे श्वशुर रा वा दीक्षित यांनी देवरुख येथील नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयात प्राचार्य पद स्वीकारले व ते देवरुख निवासी झाले. ही घटना साधारण १९७२ मधील. त्यांना घरात आबा म्हणत असत. ते धरून एकूण सहा भावंडे. तीन भाऊ व तीन बहिणी .मूळ गाव देवगड तालुक्यातील तिर्लोट. सर्व कोकणातील कुटुंबांप्रमाणे कनिष्ठ मध्यम वर्गातले. हे तिन्ही भाऊ हे खूप हुशार , कष्टाने एम ए झाले व ठरवून विद्यादानाच्या कार्यात कार्यरत झाले. मोठे शिवराम हे रत्नागिरी येथे गोगटे महाविद्यालयात इंग्लिश चे प्राध्यापक झाले. मधले सखाराम व आबा हे बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयात प्राध्यापक झाले. दोघे संस्कृत शिकवायचे. आबा जेव्हा मेट्रिक झाले तो काळ असा होता की त्त्या परीक्षेला कुणी नुसते बसले (पास न होता) तरी नॉन मेट्रिक म्हणून पण मन असायचा. त्या काळात आबा या परीक्षेत १०वे आले होते. तेव्हा या परीक्षेचे क्षेत्र हे कारवार ते कराची इतके म...