हॉस्पिटल
लहान पणी एक गाणे ऐकले होते पडू आजारी मौज हीच वाटे भारी. यात आजारी पडल्यावर आपल्याकडे सर्वांचे कसे लक्ष जाते, आपली कशी काळजी घेतली जाते, शाळेत न जाता घरी राहायला मिळते असे वर्णन होते. त्या बदल्यात फक्त कडू औषधाचा घोट गिळावा लगे. अर्थात ते आजार पण साधा ताप, खोकला असे किरकोळ असायचे. आम्ही ह्या सरकारी वसाहतीत राहायचो तिथे एक दवाखाना होता. तिथे एक डॉक्टर येत असत व एक वैद्य नावाचे कंपौंडर असत. कधी इंजेक्शन ची वेळ आली तर ते वैद्य खुप्प दुखवायचे पण डॉक्टर हळुवार हाताने न दुखवता द्यायचे .(त्यांचे आडनाव बहुतेक मुळे होते) मोठ्या हॉस्पिटलचा अनुभव पहिल्यांदा माझा हात मोडला तेव्हा आला. संध्याकाळी हात मोडला तेव्हा मुळे डॉक्टरनी एक इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी मी व माझे वडील मुंबईला जे जे हॉस्पिटल मध्ये आलो. तिथे पण एक इंजेक्शन व हाताला प्लास्टर घातले. त्या पेक्षा लक्षात राहिले ते वडिलांबरोबर हॉटेल मध्ये जाऊन जेवण केले ते.. नंतरचा हॉस्पिटलचा अनुभव म्हणजे काही कारणाने आईला दोन दिवस हॉस्पिटल मध्ये (ते नागपूरचे हॉस्पिटल बहुतेक मेयो हॉस्पिटल होते) राहावे लागले तिला भेटायला गेलो होतो. नंतर मुंबईला अ...