हे चमत्कारच.
कालचा कलर्स मराठी वरील सूर नवा ध्यास नाव कार्यक्रम. १० वर्षांची श्रावणी मंचावर येते आणि सुरु करते -
भय इथले संपत नाही .
आम्ही अवाक. ही कवी ग्रेस यांची रचना. ग्रेस यांची कविता समजायला बरंच आयुष्य जगावं लागतं. त्यांच्या रचनांना हात फक्त कवितेची उत्तम जण असणारा संगीतकार म्हणजे बाळासाहेब मंगेशकरच घालू शकतात. ती कविता आत्मसात केल्यावर तिची चाल जन्माला येते. आणि त्यांच्या चाली म्हणजे भल्याभल्या गायकांची -अगदी त्यांच्या बहिणींची पण दमछाक करणाऱ्या असतात असं आशाबाई म्हणाल्या आहेत.तर अशी चाल झाल्यावर भारतरत्न लता मंगेशकर आपली जानओतून ते गीत गातात तेव्हा असं गाणं तयार होतं. आणि असं हे गाणं १० वर्षांची बालिका आपल्या गोड आवाजात गेला लागते तेव्हा आधी आश्चर्य मग कौतुक दोन्ही बाजूला राहतं आणि गाणं पुढे सुरु राहतं.सगळे उपस्थित मंत्रमुग्ध. कवी ग्रेस, बाळासाहेब मंगेशकर व लता मंगेशकर यांनी हे गाणं म्हणजे कैलास शिखर निर्माण केले. कुणा नावागाताची ते पाहून धडकीच भरते. पण ही बालिका ते शिखर लीलया सर करून जाते आणि आपल्याला त्याचे सौन्दर्य दाखवते. गाणं संपल्यावर स्पृहा श्रावणीजवळ येऊन तिला फक्त मिठी मारते व नंतर आपल्या डोळ्यातील काजळाची तिला तीट लावते, कुणाची दृष्ट लागू नये म्हणून.
नंतर अवधूत स्पृहाला म्हणाला तुला काहीतरी बोलायचे आहे तर तू बोल. तेव्हा ती म्हणाली -माझा चमत्कारांवर अजिबात विश्वास नाही पण असं काही पाहिलं की वाटत हे जे काही घडतं ते अजब आहे , कोणत्याही तर्कशास्त्रात हे बसत नाही.
पण असं पहिल्यांदाच घडत नाही. पहिला सारेगम लिटल चॅम्प्स अथवा. कार्तिकी, मुग्धा, आर्या,शमिका अशा मुली अशी काही गाणी सादर करायच्या की सगळे चकित. त्या कार्यक्रमाला प्रसाद ओक म्हणाला होता ही हा कार्यक्रम म्हणजे जादूचे प्रयोग आहेत.
असाच चमत्कार १९८० च्या दशकात घडला होता. एक शाळकरी मुलगा साक्षात बाल गंधर्वांची गाणी गाऊ लागला होता. ज्यांनी प्रत्यक्ष बाल गंधर्व ऐकले होते ते पण चकित झाले होते. आणि ज्यांनी बाल गंधर्व ऐकले नव्हते त्यांना बाल गंधर्व कसे होते ते म्हणजे आनंद भाटे असे समीकरण झाले . ते इतके की लोकांनी त्यांना आनंद गंधर्व ही उपाधी दिली.
आपल्या समजुतीनुसार मग आपण मानतो की हे आधीच्या जन्मातील संचित आहे. किंवा ही दैवी देणगी आहे.आता बालगंधर्व , छोटा किंवा कुमार गंधर्व यांची चुणूक त्यांच्या लहानपणीच दिसली होती. म्हणून त्यांना बाल, कुमार , छोटा अशी बिरुदे लागली.अगदी लता मंगेशकर सुद्धा खूप लहान वयात गायला लागल्या होत्या. या सर्वांनी लहानपणी आपली चुणूक दाखवून पुढे परिश्रम घेऊन आपले नाव मोठे केले.
लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत सुद्धा असेच म्हटले जाते. एक राजकारणी, गणितज्ञ,संस्कृत पंडित, कायदेतज्ज्ञ असे टिळकांचे बहू आयामी व्यक्तिमत्व होते. म्हणजे या प्रत्येक गोष्टीसाठी एक जन्म पुरत नाही तर या सगळ्या गोष्टी त्यांनी एकाच जन्मात साध्य केल्या. सावरकरांनी पण क्रांतिकारक, राजकारण, समाजकारण कवी,लेखक,वक्ता , भाषा-लिपी शुद्धी अशा अनेक बाबी एकाच जन्मात साध्य केल्या.
म्हणून आपण कुणी काही चमत्कार केला की म्हणतो ही हातचलाखी आहे, पण अशा व्यक्ती म्हणजे चमत्कारच आहेत.
अनिल जोशी
१६.०४.२०१९
(कृपया आपल्या प्रतिक्रिया नावासह द्याव्यात )

खरंच चमत्कार
ReplyDeleteखरं आहे...खूप छान शब्दांकन
ReplyDeleteधनश्री जोशी