Posts

तम निशेचा सरला

Image
रात्र आणि अंधार यांचे अतूट नाते असते. किंबहुना अंधार पडू लागला के रात्र आली किंवा रात्र झाली की अंधार पडणार हे गृहीतच असते. पण रात्र हा शब्द तितकासा भयावह वाटत नाही जितका अंधार वाटतो. अंधार या शब्दात एक नकारात्मकता आहे. पण रात्र मात्र सुंदर वाटते. आणि रात्र म्हटली की अनेक गाणी आठवतात. चोरी चोरी या चित्रपटातील ये रात भिगी भिगी हे गाणे आठवते.तो राजबिंडा राज कपूर आणि त्याच्या बरोबर नर्गिस . शंकर जय किशन यांच्या सुरावटी. , मन्ना डे यांचा आवाज. आणि कृष्ण धवल चित्रणाच्या मर्यादा असून सुद्धा पोषक असे चित्रण. हे गाणे ऐकणे म्हणजे खूप तरल अनुभव आहे . यात अंधाराचा कुठे मागमूस ही नाही . रात्र आणि विरह यांचे पण असेच आहे. कुणी म्हणतात विरहात रात्र मोठी प्रेमी जनांस वाटे. जेव्हा   श्रावणधारा बरसत असतात आणि येणारा प्रियकर आला नाही की विरहात झुरणाऱ्या प्रेमिकेची अवस्था या गाण्यात किती छान मांडली आहे.. रिमझिम झरती श्रावण धारा धर्तीच्या कलशात  प्रियावीण उदास वाटे रात. बरस बरस तू  मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम  बरस असा की प्रिया न जाईल मा घा ये आकाश. म्हणजे कवी म्हणतो इत...

मंदिर : राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक

Image
आज अयोध्येत श्रीराम मंदिराच्या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण धार्मिक पद्धतीने केले. आणि अनेक वर्षे अनेक वाद , कोर्टबाजी यात अडकलेला हा प्रकल्प मार्गी लागला. देशात बहुतेक लोकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. प्रभू रामचंद्र हा देशवासीयांच्या आस्थेचा विषय आहे आणि प्रभू रामचंद्र हे आयोध्येत जन्मले अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे भारताच्या एकात्मकतेसाठी प्रभू रामचंद्र हा महत्वाचा दुवा आहे. अनेक मोगल आक्रमकांनी या देशात सत्ता स्थापन केल्यानंतर येथील श्रद्ध्स्थाने व मंदिरे यांचा विध्वंस करून तेथे मशिदी उभारल्या हे वास्तव आहे. आयोध्येत पण राम जन्मभूमीच्या जागी असलेले भव्य मंदिर उध्वस्त करून तेथे मशीद उभारली गेली व तिला तत्कालीन मोगल सम्राट  बाबर याचे नाव दिले गेले. त्या परिसरात एक मंदिर होते ते बंद होते. ते पंतप्रधान राजीव गांधी यांनी उघडायला लावून दिवा लागेल अशी सोय केली. पुढे विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीत राम मंदिर व्हावे या साठी आंदोलन सुरु केले .त्याच्या जन जागृतीसाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी द्वारका येथून आयोध्येपर्यंत रथ यात्रा काढली . त्याचे ...

नाविन्याचा शोध

नवीन गोष्टींचे प्रत्येकालाच अप्रूप असते. कारण जे आहे ते माहित झालेले असते त्यातील कुतूहल संपलेले असते मग साहजिकच नवीन काहे मिळाले तर हवेच असते. पण यात नाविन्य हे किती आहे , किती टिकणारे आहे हे पण महत्वाचे असते. एखाद्या लहान मुलाला जर नवीन खेळणे दिले तर तो त्याच्याशी थोडा वेळ खेळेल , कदाचित कुतूहलापोटी ते मोडून टाकेल मग त्यातील नाविन्य हे खूपच क्षणभंगुर ठरते. नवीन आणलेल्या कपड्यांचे नाविन्य पण ते एकदा घालेपर्यंत टिकते. तर काही नवीन गोष्टी ह्या रुळून जातात व त्यातील नाविन्य संपते. एखादा कलाकार गायक एखाद्या नवीन रागाची निर्मिती करतो आणि तो जर आवडला तर रसिक त्याचे स्वागत करतात, इतर कलाकार तो राग आत्मसात करून सादर करतात आणि मग तो राग नवीन राहत नाही. अर्थात नाविन्य किती काळ टिकणार हे त्या त्या गोष्टीवर अवलंबून असते. एका कार्यक्रमात नृत्य करता करता पंडित बिरजुम्हाराज म्हणाले आत्ता काही मुद्रा , जागा सुचतात व त्या पेश केल्या जातात पण त्या तिथेच राहून जातात. एखादे गाणे सादर करताना कलाकार अनेक नवीन जागा घेतो पण ती त्या त्या वेळेची निर्मिती असते. एखादी निर्मिती उत्कृष्टतेकडे नेण्यासाठी त्यात अन...

सुदृढ व सशक्त लोकशाही साठी

सध्या कॉंग्रेस पक्षाची चालू असलेली वाताहत पाहत असताना अनेक जण असा सूर आळवू लागले आहेत की लोकशाही साठी सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष हवा आणि एक जुना व देशव्यापी पक्ष म्हणून ती जबाबदारी कॉंग्रेस ची आहे.. पण आपला पक्ष वाढवणे व त्याला पूर्वीचे दिवस आणून देणे , त्या साठी रस्त्यावर लोकांचे प्रश्न घेवून जाणे , अन्य पक्षांशी संबंध वाढवणे या सगळ्या गोष्टी करण्याची हा पक्ष उमेद घालवून बसला आहे. २०१४ पासून राहुल गांधी यांचे नेतृत्व पूर्ण पणे अयशस्वी ठरले असले तरी ते काँग्रेसजन मान्य करीत नाहीत. हे कॉंग्रेसजन म्हणजे सगळे दुद्धाचार्य आहेत. जे वयोवृद्ध झाले आहेत व ज्यांची लोकांमध्ये जावून काम करायची क्षमता कधीच नव्हती . पण लोकांमध्ये काम करणारे तरुण व तडफदार नेते या तथाकथित श्रेष्ठींच्या नाकर्तेपणामुळे हतबल व निराश झाले आहेत. त्यांना या पक्षात आपले भवितव्य दिसत नाही. इतकी वर्षे कॉंग्रेस चे चालून गेले कारण कॉंग्रेस ला पर्याय नव्हता आणि तो पुढे आल्यानंतर कॉंग्रेस ची अवस्था दयनीय झाली. आणि या पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढेल असे राहुल गांधी यांचे नेतृत्व नाही हे अधोरेखित झाले आह...

भय न उरले मृत्यूचे आता

मृत्यूचे चे भय नाही हे जरा ऐकायला आणि पटायला अवघड आहे. अटळ असलेला मृत्यू हा मनाच्या कोपर्यात सदैव कुठेतरी दबा धरून बसलेला असतो आणि आपण तो विषय टाळतोच. याचे कारण म्हणजे मनात त्याच्या बद्दल असलेली सुप्त भीती आणि  आपली जीवनासक्ती यामुळे आपण त्या विषयापासून दूर पळत राहतो. पण परवा फेसबुक वर एक धनंजय केशव केळकर या नावाने आलेली एक पोस्ट वाचली. त्यात त्यांनी एका जगप्रसिद्ध डॉक्टर च्या बोलण्याचा हवाला दिला त्यात ते म्हणतात की त्यांनी किमान २०० जणांचा मृत्यू बेडच्या बाजूला बसून पहिला होता.  ते म्हणतात  -" तीव्र हार्ट attack, मोठा जीवघेणा अपघात, किंवा वयोमानाने आलेला नैसर्गिक मृत्यू या तीन गोष्टी सोडल्या तर माणसाची जो पर्यंत जगायची इच्छा असते तो पर्यंत तो जगतो. आणि एकदा आता आपण मरावे किंवा मारणार असे ठरवले की कुणी त्याला वाचवू नाही शकणार. (अर्थात किती तरी विकलांग मृत्यू ची वाट पाहत जगात असतात हे पण वास्तव आहे पण तो आजचा विषय नाही) ते म्हणतात करोनाने आपण मारणार ही भीती सोडून द्या.रक्तातील प्राणवायूची पातळी लक्षात न येत खूप खाली गेली तरच मृत्यूची शक्यता असते. बाकी सगळे बरे होतातच. ...

असा पण उघड गनिमी कावा

गेल्या आठवड्यात मी प्रधान मंत्री कार्यालयाला एक मेसेज केला व त्यात असे लिहिले होते की महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून आता केंद्राने महाराष्ट्रात हस्तक्षेप करावा. पण हे लिहिताना मला काही मर्यादा पण दिसत होत्या. पोलीस आता दमले आहेत त्यांच्या मदतीसाठी लष्कर किंवा निमलष्कर बोलावणे आवश्यक आहे . पण राज्य सरकारने जर मागणी केली तर केंद्र ते पाठवू शकते. इथे महाराष्ट्र सरकार चा आडमुठेपणा व इगो आड येतो. आता दिल्ली वाचवण्यासाठी सर्व मतभेद  बाजूला ठेवून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मदतीसाठी गृहमंत्री अमित शाह यांना साकडे घातले आणि मग दिल्ली सरकार, केंद्र सरकार, तीन महापालिका यांच्या कार्यक्षेत्रात सुसूत्रता आणून कृती सुरु केली. हे महाराष्ट्रात पण घडू शकले असते. कारण महाराष्ट्र शासन, मुंबई व इतर (ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भायंदर ) महापालिका यांच्यात सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे प्रशासन यंत्रणा हलवणे आवश्यक आहे पण महाराष्ट्र शासन ढिम्म आहे. त्यांना हे सरकार चालवण्यात रस नाही पण ते वाट पाहत आहेत की केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावेल व आपण यातून बाहेर पडू. पण बहुमत आहे तो...

बसंत है आया

Image
 (सदर लेख एप्रिल च्या उत्तमकथा साठी लिहिला होता पण मध्ये तीन महिने अंक निघू शकला नाही म्हणून जुलै मध्ये प्रसिद्ध झाला.) चैत्र पाडव्याला ऋतू चक्रातील पहिला ऋतू वसंत याचे आगमन होते. पानगळी नंतर रुक्ष झालेल्या वृक्षांना पालवी फुटते आणि हिरव्या गार वृक्षांना रंगी बेरंगी फुलांनी डवरलेले पाहताना मन प्रफुल्लीत होते. गोठवणारा हिवाळा सरून पुन्हा धरतीला उष्ण धुमारे फुटू लागतात. संगीतात या ऋतूचा अविष्कार दाखवणारा राग म्हणजे राग बसंत. ललितलवंगलतापरिशीलन कोमल मलय समीरे ही कवी जयदेव यांची अष्टपदी म्हणजे वसंत ऋतूचे सुंदर वर्णन. वसंत ऋतूतील नवी पालवी आणि संगीतातील बसंत राग यांचे अतूट नाते सर्वमान्यच आहे. या रागाचे यथार्थ वर्णन करणारी बसंत रागातील चीज पंडित जसराज गातात- और राग सब बने बाराती, दुल्हा राग बसंत मदन महोत्सव आज सखी री, बिदा भयो हेमंत. वसंत ऋतूत आंब्याच्या मोहोराचा मादक वास आमराईत दाटून राहतो. गुलमोहर केशरी आणि तांबड्या रंगांची उधळण करीत असतात, कोकीळ कुहू कुहू गात असतो.अंगणी गुलमोहर फुलला या गदिमांच्या गाण्यातील विरहिणी म्हणते –वसंत आला ,याल तुम्ही ही कोकीळ कुजबुजला. ऋ...