Posts

Showing posts from March, 2020

एक महत्वाची तारीख

Image
आज ३१ मार्च. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. जे कुणी फायनान्स किंवा ऑडीट संदर्भात काम करतात त्यांना या दिवसाचे महत्व सांगायलाच नको पण आता याचे महत्व सर्व सामान्यांपर्यंत पोहोचले आहे कारण लोकांमध्ये आर्थिक जागरूकता वाढली आहे. मला जेव्हा थोडे फार समजायला लागले म्हणजे समजायला लागण्याच्या वयातच मी टाटा मोटर्स सारख्या संस्थेच्या वित्त विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालो . तो महिना होता फेब्रुवारी चा. ऑफिस मध्ये मार्च ची धाम धूम सुरु झाली होती. त्याचे पहिले लक्षण म्हणजे ऑफिस ची वेळ संपल्यानंतर पण कामासाठी थांबणे. हे सारे मला अगदी नवीनच होते. फार तपशिलात न जाता एवढच सांगेन की तेव्हापासून हा ३१ मार्च आमच्या कुंडलीत कायम महत्वाच्या स्थानी जाऊन बसला . यातील एक गम्मत म्हणजे वर्षासाठी म्हणून जे बजेट केलेले असते ते वर्षभरात खर्ची पडले नसले तर ते संपवण्यासाठी गडबड सुरु होते. या उलट एका सरकारी खात्यातला अनुभव असा होता की एप्रिल मध्ये बजेट आले की कर्तव्य भावनेने ते लगेच खर्च करून टाकले जाते. पूर्वी बँका आपले वर्ष जानेवारी ते डिसेंबर असल्याने सर्व खात्यांचे balancesबंद करून पुढील वर्षासाठी हस्तांतर...

स्वप्नांना बळ हवे

Image
परवा डॉ आनंद नाडकर्णी यांची माझा कट्ट्यावरची मुलाखत ऐकत होतो. या अवघड परिस्थितीत आपले मानसिक संतुलन कसे  टिकवावे याबद्दल त्यांनी विस्तृत चर्चा केली असून स्टार माझचे या साठी खुप धन्यवाद्. सदर मुलाखत यु ट्यूब वर व अन्य समाज मध्यमावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की अशा वेळी वेळ जात नहीं म्हणून कंटाळा आलेल्या मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना कसे उत्तर द्यावे किंवा त्यांचे मन कसे रमवावे ? या प्रश्नाचे पण त्यांनी सविस्तर उत्तर दिले। त्यात एक मुद्दा असा होता की ज्येष्ठ लोक भूत काळात रमतात तेव्हा त्यांच्या जुन्या आठवणी जागृत होतील व् त्यांना स्मरण रंजनाचा आनंद मिळेल ऐसे पहावे।  मुले मात्र वर्तमान काळात जगतात. मी आत्ता काय करू? असा त्यांचा थेट प्रश्न असतो।  त्यांना आपण शिस्त लावायचा प्रयत्न करत असतो किंबहुना तसा आपला आग्रह असतो. पण मुले ही थोड़ी बेशिस्त वागणार , थोड़ा पसारा करणार हे गृहित धरावे आणि त्या वेळी त्यांना न टोकता पसारा करू द्यावा अणि मग त्यांना त्याची जाणीव करून दिली तर लगेच मुले तो पसारा आवरतील ...

घरातल्या घरात

Image
आज मला घरून काम करायला लागून दोन आठवडे उलटले. बाकी लोकांना एक आठवडा झाला असेल. गेल्या रविवारी स्वेच्छेने संचारबंदी आपण अनुभवली व आता लॉक आउट च्या निमित्ताने घरात राहणे आले आहे. हळू हळू सगळ्यांनी हसत खेळत किंवा कुरकुरत हे वास्तव स्वीकारले आहे. घरून काम म्हणजे ऑफिस ला जाणे नाही. तो प्रवासाचा वेळ, वाह्तुकीमधील खोळंबा यातून सुटका. सकाळी उशीरा उठणे असे काही फायदे. पण हे ज्या कारणासाठी होते ते म्हणजे जनसंपर्क टाळणे , उगाच इकडून तिकडे जाणे यावर प्रतिबंध म्हणून. त्या दृष्टीने ज्यांना घरून काम करायला मिळाले ते नशीबवान कारण त्यांना एक सुरक्षिततेचे एक कवच मिळाले. पण ज्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून बाहेर कामाला जावे लागते त्यांचे कष्ट वाढले व स्वत:च्या आरोग्याबाबत धोका वाढला. आरोग्य सेवा देणारा कर्मचारीवर्ग तर कामाच्या ठिकाणीच मुक्कामाला आहे. पोलीस व अन्य शासकीय यंत्रणांना या धोक्या सोबतच लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. ज्यांचा रोजगार बंद झाला आहे त्यांचे अधिक हाल आहेत. हे लगेच दिसणारे परिणाम आहेत तर पुढील आर्थिक वर्षात कदाचित अधिक तीव्र मंदीला तोंड द्यावे लागेल अशी सार्थ भीती व्यक्त करण...

कोणे एके संध्याकाळी

Image
आज दुपारीच जोरकस पाऊस झाला आणि अजून पडतोच आहे . यामुळे आजची संध्याकाळ वेगळीच वाटली . ही संध्याकाळ पाहताना काही संध्याकाळी उलगडून गेल्या त्यांचा हा कोलाज नक्की आवडेल. संध्याकाळ याने तिन्हीसांज म्हणजे दिवस आणि रात्र यांना अधोरेखित करणारी सीमारेषा. दिवस सरलेला आहे आणि रात्रीचा अजून अंदाज यायचा आहे आणि मनात विलक्षण हुरहूर दाटून येते. ही मनाची कातर अवस्था जर लक्षात आली तर समजावे आपल्या संवेदना अजून जागृत आहेत. एखाद्या गावाबाहेरच्या संध्याकाळी स्वत:चा श्वासोश्वास सुद्धा स्पष्ट ऐकू येतो इतक्या शांततेत स्वत:मध्ये हरवताना पब्लिकने तुडुंब वाहणारे रस्ते, दुकाने, आणि फुटपाथ विविध मेक अप , फेंशन्स अशा गर्दीत आपला ह्रिदम हरवू नये म्हणून तो शोधायची केलेली धडपड किंवा एखादा रुक्ष दिवस विसरत आजची संध्याकाळ सुद्धा गेली ही जाणीव असह्य होत असताना पालिकेच्या ट्यूब लाईट च्या प्रकाशात सुद्धा आम्हाला वसंतात फुललेल्या गुलमोहराचा लाल जर्द बहर कासावीस करतो एखादी संध्याकाळ चोरपावलाने येते अंधारून आलेल्या दिशा मनाला स्वीकारता येत नाही यासाठी प्रत्येल संध्याकाळ ही नजरेखून घातलीच पाहिजे उन्ह...

सावल्यांची साथ

Image
राधे , अग किती सैरभैर आहेस अजून? किती बावरलेली? हरवलेली? अनया, अरे काय सांगू? माझ अस्तित्वच जाणवत नाही. सगळ निसटून गेलंय असं वाटतंय. ती यमुना बघ ना, किती निर्जीवपणे वाहते आहे? तो कदंब तर वठून गेलंय. त्या कालियाची पिलावळ मात्र वळवळताना दिसत्ये. त्या मुरलीचा वेणू पिचून गेलाय आणि त्यातून सूर नाहीत तर फक्त हवा निघते आहे. मथुरेच्या बाजाराला जाणार्या सख्या गौळणी पण दिसत नाहीत. कुठे गेला तो वाट अडवणारा पेंद्या? सगळ गोकुळ उध्वस्त झालंय. असं का झालंय अनया? तू तर माझा जन्मोजन्मीचा जोडीदार ना? सांग ना , हे सगळ काय आहे? राधे, अग भानावर ये. तू होतीस त्या तेज:पुंज युगंधराची सावली. तो युगंधर तेजोहीन झाला , त्याला युग उलटली . मग ते तेजच निघून गेल्यावर काय उरणार? या तुझ्यासारख्या अस्तित्वहीन सावल्या. त्या युगंधराच्या. आता त्याचच अस्तित्व तेजोहीन आहे तर त्याच्या सावल्या कशा असतील? अनया, हे तुझ्यासारखं शहाणपण माझ्यात नाही त्यामुळे तू काय सांगतोस ते काही समजत नाही. मी खूप शोध घेतला. त्याला भेटायला द्वारकेत गेले. पण तिचं अस्तित्व समुद्राने गिळंकृत केलं. मथुरेत गेले तर त्याची मूर्ती मंदिरात बंदिस्...

आज की ताजा खबर

Image
आमच्या लहानपणी एका चित्रपटातील हे एक गाणे प्रसिद्ध होते. आज की ताजा खबर आज की ताजा खबर, आओ काकाजी इधर आओ मामाजी इधर ईस दुनिया की खबर. असं काहीसं. एक लहान मुलगा हातात एक वर्तमान पत्र घेवून धावत धावत हे गाणे म्हणत आपल्या वर्तमान पत्राची जाहिरात करत असतो किंबहुना ते वर्तमानपत्र लोकांनी विकत घ्यावे म्हणून लोकांना उद्युक्त करीत असतो. आपल्या दैनंदिन जीवनात वर्तमानपत्र हे एक महत्वाचे अंग झाले आहे. आता चोवीस तास बातम्यांचा अखंड रतीब सुरु असला तरी मुद्रित माध्यमांनी आपले वेगळेपण जपले आहे आणि म्हणूनच वर्तमान पत्रे टिकून पण आहेत. महाविद्यालयात शिकत असतांना टीव्ही येत होता. आणि टीव्ही मधून दृश्ये पाहिल्यावर ही छापील वर्तमानपत्रे कोण वाचणार अशी चर्चा सुरु होती तेव्हा एका पत्रकार मित्राने ( कै.रविकिरण साने) एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे नुकताच अंतिम विबल्डन टेनिस सामना झाला होता आणि तो जगाने टीव्ही वर पहिला होता , त्याचा थरार अनुभवला होता. तरीपण टाइम्स सारख्या वर्तमान पत्रासह सगळ्या वर्तमान पत्रांनी पानभर सामन्याची रसभरीत वर्णने छापली होती. त्यामुळे मुद्रित माध्यमांना मरण नाही. आज ई वर...

सामना महा संकटाशी

Image
आज वर्ष प्रतिपदा. म्हणजे शालिवाहन शकाचा वर्षारंभ. गुढी पाडवा . वसंत ऋतूचे आगमन. या दिवसाच्या सगळ्या आनंदावर, उत्साहावर एक काळी कुट्ट छाया एका महा संकटाची आहे . ते म्हणजे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव. हजारो माणसे किड्या मुंग्यांसारखी मरत आहेत. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव म्हणजे संपूर्ण मानवतेला पडलेला मृत्यूचा विळखा आहे. आता व्यवहारांसाठी माणसे इकडून तिकडे जात असतात. ते अपरिहार्य आहे पण या संक्रमणाने कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे हे संकट अतिशय भयानक आहे. केवळ अतर्क्य आहे. आजवरचा अनुभव पाहता हे जे संकट आहे हे आजवर मानवतेवर जेवढी संकटे आली त्यापेक्षा हे संकट भयानक आहे. आजवर जगाने दोन महायुद्धे पहिली .त्या वेळचा नरसंहार पहिला . १९४५ मध्ये मानवतेला काळिमा फासणारा अणु बॉम्ब चा विध्वंस पहिला. अनेक दुष्काळ, महापूर, भूकंप अशी एक ना अनेक संकटे पहिली व त्यांना तोंड दिले. अशावेळी सगळे भेदभाव आणि मतभेद विसरून माणूस म्हणून सगळे एकत्र आले व लढले. गेल्या रविवारी आपण स्वेच्छेने संचारबंदी पाळली. आणि आता आपल्याला तीन आठवडे खूप संयमाने या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. कारण आपल...

शोध एक लघु कथा

Image
पहाटेच त्याने घर सोडले होते. तेव्हापासून तो सतत चालतच होता. सुमारे तीन तास उलटले असतील . तो आता एका डोंगराच्या पायथ्याशी आला होता. क्षणभर तो थबकला आणि त्याने डोंगरावर जाणारी पायवाट तुडवायला सुरुवात केली. आता ती पायवाट जंगल सदृश झाडीतून चालली होती. वळणा वळणाने ती वाट डोंगर चढत होती. आजूबाजूला फक्त झाडी. अनेक प्रकारची काही ताड माड वाढलेली तर काहींची वाढ मधेच खुरटलेली. कुठे वेली पसरलेल्या . काही वृक्ष बहरलेले तर काही वठलेले. तो पाहत पाहत पुढे चालला होता. ही सगळी वनश्रीची किमया त्याला सुखावत नव्हती. कदाचित याचा संबध त्याच्या मनात चालू असलेल्या वादळांशी किवा अस्वस्थ मनस्थितीशी असू शकेल. एका दगडावर तो बसला. त्याला आश्चर्य वाटलं की एवढा वेळ आपण चालतो आहोत पण ना दाम्ल्याची जाणीव, ना तहान , ना भुकेची जाणीव . कोणत्या उर्मीने या आपल्या प्राथमिक भावनांवर नियंत्रण मिळवलं हे त्याच्याच लक्षात येत नव्हते. तो चालतच राहिला. एका पिंपळाच्या झाडाखाली लाल कुंकू लावलेला एक दगड होता. बाजूला दोन हाडे व एक कवटी व पसरलेली कोंबड्याची पिसे पाहून त्याच्या लक्षात आल की इथे कुणीतरी अघोरी शक्तीची उपासना करत असाव. त...

आपण सारे प्रवासी

Image
खर तर जीवन आयुष्य म्हटलं की अध्यात्म ,तत्वज्ञान असं काही तरी समोर येत . आणि सगळा मामला गंभीर होवून जातो. त्याचं कारण म्हणजे जीवन , आयुष्य  आणि प्रवास याचं जवळचं नात आहे. अनेकांनी त्याचा आपापल्या परीने अर्थ लावायचा प्रयत्न केला आहे. पण आयुष्य असं गंभीर असण आपल्याला नाही आवडत . आणि याच साठी अनेकांनी जा जीवन प्रवास सांगीतिक करून त्यात वेगळे रंग भरले आहेत. "जिंदगी के सफरमे गुजर जाते है जो मुकाम वो फिर नाही आते" या गाण्यात वास्तव किती समर्थपणे मांडले आहे. प्रवासातला एक टप्पा संपून दुसरा सुरु होतो आणि अशा रीतीने आपण पुढे पुढे जात राहतो. पण पुन्हा मागच्या टप्प्यावर नाही जाता येत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या मित्राबरोबर काही काळ छान व्यतीत केला होता. पण काही काळानंतर पुन्हा भेट झाली तर आनंद जरूर होतो पण थोड्या वेळात लक्षात येत की अरे आता ती मजा येत नाही . कारण सगळे संदर्भ बदललेले असतात. म्हणजे ती मैत्री किंवा जिव्हाळा तोच असतो पण कुठे तरी काही तरी हरवलेले असते. आणि हरवलेले असतात ते गेलेल्या काळातले क्षण. ते पुन्हा नाही येत. "जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल  क्या हो किसने ज...