स्वप्नांना बळ हवे
परवा डॉ आनंद नाडकर्णी यांची माझा कट्ट्यावरची मुलाखत ऐकत होतो. या अवघड परिस्थितीत आपले मानसिक संतुलन कसे टिकवावे याबद्दल त्यांनी विस्तृत चर्चा केली असून स्टार माझचे या साठी खुप धन्यवाद्. सदर मुलाखत यु ट्यूब वर व अन्य समाज मध्यमावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा.
या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की अशा वेळी वेळ जात नहीं म्हणून कंटाळा आलेल्या मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना कसे उत्तर द्यावे किंवा त्यांचे मन कसे रमवावे ? या प्रश्नाचे पण त्यांनी सविस्तर उत्तर दिले। त्यात एक मुद्दा असा होता की ज्येष्ठ लोक भूत काळात रमतात तेव्हा त्यांच्या जुन्या आठवणी जागृत होतील व् त्यांना स्मरण रंजनाचा आनंद मिळेल ऐसे पहावे। मुले मात्र वर्तमान काळात जगतात. मी आत्ता काय करू? असा त्यांचा थेट प्रश्न असतो। त्यांना आपण शिस्त लावायचा प्रयत्न करत असतो किंबहुना तसा आपला आग्रह असतो. पण मुले ही थोड़ी बेशिस्त वागणार , थोड़ा पसारा करणार हे गृहित धरावे आणि त्या वेळी त्यांना न टोकता पसारा करू द्यावा अणि मग त्यांना त्याची जाणीव करून दिली तर लगेच मुले तो पसारा आवरतील कारण तेव्हा त्यांचे खेळून झालेले असेल.
हे सारे ऐकताना माझ्या मानत आले मुले वर्त्तमानात जगणार, ज्येष्ठ भूतकाळात रमणार. मग त्याच्या मधल्या वयोगटातील लोकांनी साधारण २० ते ५० या वयोगटातील लोकांनी मी त्यांना तरुण म्हणेन त्यांनी कोणत्या काळात जगावे? त्यांना भूत काळाचे भान हवे। पण किती? तर गाड़ी चालवताना आरशातून मागचे दृश्य बघावे इतपतच। वर्तमान तर आव्हानांचा , समस्यांचा, त्याला सामोरे जावेच लगते पण त्यांची ऊर्जा यातच संपता कामा नये. कारण भविष्याचा वेध घेवून त्यातील आव्हाने, शिवाय काहीतरी करायची उर्मी ही जागृत रहायला हवी। त्यांनी मोठ मोठी स्वप्ने पहायलाच हवीत. कारण ती स्वप्ने पुरी करायची शक्ती व ऊर्जा त्यांच्यापाशीच असते। त्यामुळे प्राप्त परिस्थितीत ते खचून जाणार नाहीत याची काळजी ज्येष्ठानी घ्यायला हवी. कुणी सल्ला मागायला आला तर त्याला प्रोत्साहन प्रथम दिल पाहिजे. आपल्या अनुभवा प्रमाणे कही धोके दिसत असतील तर त्यांची कल्पना द्यावी पण त्यामुळे आपण त्यांचे पाय मागे ओढ़त नाही ना याची खबरदारी घ्यावी अणि आमच्या वेळी हे अस नव्हत अस चुकुनही म्हणू नये. कारण आपल्या उमेदीचा काळ अणि आताचा काळ यात खुप बदल झालेले असतात त्यामुळे या वाक्याला अर्थ उरत नाही। तरुणाना आपल्याकडून सकारात्मक ऊर्जा मिळेल याची खबरदारी आपण घेतली तर तरुणाई बरोबर आपला चांगला संवाद प्रस्थापित होईल.
म्हणून मला वाटून गेले की तरुणांच्या स्वप्नांना बळ देणे आपले कर्तव्य आहे.
अनिल जोशी
30..03. २०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
बरोबर आहे काका.
ReplyDeleteGreat points. Also the 20 to 50 something's are today engaged in taking care of seniors and kids, but many times they are not taking care of themselves. They need to have some "Me Time" for themselves thinking about what they want to do and restore their own mental health