आपण सारे प्रवासी
खर तर जीवन आयुष्य म्हटलं की अध्यात्म ,तत्वज्ञान असं काही तरी समोर येत . आणि सगळा मामला गंभीर होवून जातो. त्याचं कारण म्हणजे जीवन , आयुष्य आणि प्रवास याचं जवळचं नात आहे. अनेकांनी त्याचा आपापल्या परीने अर्थ लावायचा प्रयत्न केला आहे. पण आयुष्य असं गंभीर असण आपल्याला नाही आवडत . आणि याच साठी अनेकांनी जा जीवन प्रवास सांगीतिक करून त्यात वेगळे रंग भरले आहेत.
"जिंदगी के सफरमे गुजर जाते है जो मुकाम वो फिर नाही आते" या गाण्यात वास्तव किती समर्थपणे मांडले आहे. प्रवासातला एक टप्पा संपून दुसरा सुरु होतो आणि अशा रीतीने आपण पुढे पुढे जात राहतो. पण पुन्हा मागच्या टप्प्यावर नाही जाता येत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या मित्राबरोबर काही काळ छान व्यतीत केला होता. पण काही काळानंतर पुन्हा भेट झाली तर आनंद जरूर होतो पण थोड्या वेळात लक्षात येत की अरे आता ती मजा येत नाही . कारण सगळे संदर्भ बदललेले असतात. म्हणजे ती मैत्री किंवा जिव्हाळा तोच असतो पण कुठे तरी काही तरी हरवलेले असते. आणि हरवलेले असतात ते गेलेल्या काळातले क्षण. ते पुन्हा नाही येत.
"जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना" या मध्ये जीवनातील अनिश्चितता किंवा क्षणभंगुरता व्यक्त होते. आज आहे , उद्याचे ठावूक नाही. पण यावर मात करण्याची उर्मी मात्र जरूर आहे . मौत आनी है आयेगी एक दिन ,जान जायेगी जायेगी एक दिन पण याला हसते गाते यहासे गुजर दुनियाकी तू परवा न कर असं म्हणत हा प्रवास हसत खेळत करण्याचा भाव दिसतो.
अशी कितीतरी गाणी जीवनाच्या विविध छटा , रंग, भाव दाखवतात. आणि ही गाणी ऐकताना मग मन विषण्ण होत नाही तर जगण्याची नवीन प्रेरणा मिळते.
अशीच आठवलेली काही गाणी
जिंदगी का सफर
प्यार जिंदगी है
एक प्यार का नगमा है .......जिंदगी और कुच्ह भी नही तेरी मेरी कहानी है
ऐ गमे जिंदगी उदास ना हो, तुम्हे हम गले लागते है
इस जीवन मे बहुत ढूढा ,पर पा न सके उनको, गर है कोई समझने वाला, पहुंचा देना मेरा ये पैगाम उनको
जिंदगी कैसी है पहेली
जिंदगी प्यार का गीत है
जीवन गाणे गातच राहावे
माझे जीवन गाणे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
जगणे अमुचे नका विचारू
जीवन गगन मी पाखरू
जीवन त्यांना कळले हो
जीवनाची वाटच वेडी
जीवनात ही घडी
गाण्याचं असंच आहे . आठवायला बसलं की नाही आठवत. पण या व अशा अनेक गाण्यांनी आपले जीवन सुंदर केले आहे हे नक्कीच.
अनिल जोशी
२३.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी
अगदी खरं आहे.किती साध्या सोप्या छान शब्दात व्यक्त झाला आहात..
ReplyDeleteखूप छान
धनश्री जोशी