पद्मश्री सय्यद भाई -एक सच्चा कार्यकर्ता

काल प्रजासत्ताक दिनानिमित्त जे पद्म पुरस्कार जाहीर झाले त्यात एक नाव होत सय्यद भाई  यांचे. या नावाचा समावेश मनाला सुखवून गेला. ते काही माझ्या परिचयाचे नाहीत. किंवा त्यांच्या कार्याशी पण माझा काही संबंध नाही . तरीपण एका सच्च्या कार्यकर्त्याचा हा सन्मान सुखवून गेला. १९७२-७३ मध्ये समान नागरी कायदा या विषयावर माहिती घेण्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात एक  बैठक घेतली होती आणि त्या साठी साधना साप्ताहिकाचे तत्कालीन संपादक व लेखक यदुनाथ थत्ते यांना निमंत्रित केले होते आणि त्या वेळी ते सय्यद भाईना घेवून आले होते. स्व. हमीद दलवाई यांच्या सोबत ते पुण्यात मुस्लीम सत्यशोधक समाजाचे काम करत होते.
त्या नंतर मुस्लीम लीग चे बनातवाला यांनी विधान सभेत वंदे मातरम म्हणणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्याला त्यावेळी समाजाच्या विविध स्तरातून विरोध झाला होता. विद्यार्थी परिषदेतर्फे या विषयावर एक सर्वपक्षीय सभा घेण्यात आली होती त्या वेळी ते स्व ग प्र प्रधान यांच्या समवेत आले होते. त्यांनी त्यावेळी बनातवाला यांचे मत हे सर्व मुस्लिमांचे प्रातिनिधिक मत नाही असे प्रतिपादन केले होते.
त्यांचा मूळ पिंड हा समाजवादी कार्यकर्त्याचा. पण त्यांनी स्वत:ला मुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या रचनात्मक कार्याला वाहून घेतल. हे असिधारा व्रत निभावणे सोपे नव्हते . मुल्ला मौलवींचा विरोध पत्करून ते कार्यरत राहिले. या कामाला कोणतेही glamour नाही. तसेच ते निवडणुकीच्या राजकारणापासून पण दूर राहिले. तीन तलाक ला विरोध व समान नागरी कायदा व्हावा ही मूळ मागणी मुस्लीम सत्यशोधक समजा तर्फे समाजाचे संथापक हमीद दलवाई यांनी केली. त्या प्रीत्यर्थ एक मोर्चा मुंबईत काढला गेला होता त्यात अनेक समजवादी व कम्युनिस्ट नेते सामील झाले होते. त्यात डॉ भालचंद्र मुणगेकर पण होते असे पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिले आहे.
तीन तलाक व समान नागरी कायदा हे तर व्हायलाच पाहिजे होते पण नुसते कायदे करून सुधारणा होत नसते व त्यासाठी मुळातून वैचारिक परिवर्तन घडवून आणण्याचा अवघड मार्ग सय्यद भाई नी निवडला. अनेक तरुण कार्यकर्ते तयार केले. लढा किंवा संघर्ष करून आपल्या समाजाला दुखवण्या पेक्षा त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याचा अवघड मार्ग त्यांनी निवडला. मत पेढीचे राजकारण करणाऱ्या राजकीय नेयानी त्यांना दूरच ठेवले. कारण मुस्लीम समाज मागास राहणे व isolated राहणे राजकीय दृष्ट्या फायद्याचे होते.
आज त्यांच्या या कार्याचा पद्मश्री पुस्काराने गौरव झाला असतानाच हे कार्य पुढे चालू ठेवण्याची जबादारी वाढली असल्याचे  मत त्यांनी व्यक्त केले आहे.
त्यांच्या या कार्याला पुढे अधिक यश लाभो यासाठी मनापासून शुभेच्छा.

अनिल जोशी 
२६.०१.२०२०

( आपल्या प्रतिक्रिया कृपया नावासह द्याव्यात.)

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती