विम्याचा फसवणुकी साठी वापर
इन्शुरन्स म्हणजे विमा आपण सुरक्षितते साठी घेतो. आपले आयुष्य, वाहन, घर, प्रवास, आरोग्य या सारख्या
आपतींमध्ये दिलासा मिळावा म्हणून आपण विमा घेतो. अर्थात त्यामुळे विमा म्हटल्यावर आपण थोडे भावनिक होतो आणि व्यवहार बाजूला ठेवतो. नेमक्या याच गोष्टीचा फायदा काही भामटे घेऊन आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.
सर्वांच्या माहितीसाठी आलेले तीन अनुभव द्यावेसे वाटतात.
एकदा मी घरी नसताना फोन आला . पत्नीने तो घेतला. फोन वरचा माणूस सांगत होता की तो हेंद्राबाद येथून बोलत आहे. त्याचे असे म्हणणे होते की माझ्या वडिलांनी माझ्या नवे एक पोलिसी घेतली होती . ती पोलिसी आता देय झाली असून तिची रक्कम २० लाख रुपये मिळण्यासाठी तुम्ही मागणी करा. ही मागणी ऑन लाईन असून त्याच्या प्रोसेसिंग साठी तुम्हाला २५००० रुपये क्रेडिट कार्ड वर भरावे लागतील . पण मी घरात नसल्याचे सांगून पत्नीने फोन बंद केला.यातील वस्तुस्थिती अशी की माझे वडील १९८४ मध्ये निवृत्त झाले होते आणि २००१ मध्ये त्यांचे निधन झाले. आम्ही कायम संपर्कात असल्याने त्यांची आर्थिक स्थिती माहित होती आणि ते हैद्राबाद ला जाऊन पोलिसी घेतील हे शक्यच नव्हते. शिवाय आमच्या सर्वच व्यवहारांमध्ये पारदर्शकता असल्याने त्यांनी खरंच अशी पोलिसी घेतली असती तर ते बोलले असते. शिवाय माझी एकट्याचीच कशाला त्यांनी भावाची व बहिणीची पण पोलिसी काढली असती.तेव्हा हा प्रकार म्हणजे केवळ २० लाखांचे अमिश दाखवून २५००० रुपये उकलण्याचा सापळा होता.
दुसरा अनुभव hdfc बँकेतील आहेत. एकदा आम्ही काही रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवायला गेलो असता आम्हाला त्यांनी त्यांची एक पोलिसी घ्या तिचा परतावा साधारण ११ ते १२ % इतका मिळेल असे सांगितले. त्या वेळी सारासार विचार करायची मनस्थिती नव्हती व पुढे चांगली पेन्शन मिळेल म्हणून रक्कम गुंतवली कारण हा परतावा मुदत ठेव दरा पेक्षा जास्त होता. प्रत्यक्षात जेव्हा पेन्शन द्यायची वेळ आली तेव्हा त्या इन्शुरन्स कंपनी ने सांगितले परतावा फक्त ५.७५ % इतकाच मिळेल. तुम्हाला बँकेत काय सांगितले त्याचा आमच्याशी संबंध नाही. आता बँकेत ज्यांनी सांगितले ती माणसे सोडून गेलेली . मग पेन्शन नको आमचे मुद्दल परत द्या असे सांगितले तर तसे देता येत नाही असे सांगितले.
ही एक प्रकारे सफेत फसवणूक कारण पेन्शनचा ५.७५% परतावा हा सध्याच्या मुदत ठेव दरापेक्षा पण कमी आहे.
तिसरा अनुभव हा कालचाच आहे. असाच एकदा hdfc बँकेत गेलो असता त्यांनी एक एर्गो ऍक्सीडेन्ट पोलिसी घ्यायला सांगितली. कमी रकमेत आकर्षक विमा संरक्षण मिळणार होते. पुढे ५ वर्षांनी मी त्यांना या पोलिसी चे आरोग्य विम्यात रूपांतर कायला विनंती केली पण त्यांच्या मते या वयात आरोग्य विमा नाही तर फक्त अपघाती विमाच मिळेल. आता तरुण वयात अपघाती मृत्यू आला तर कुटुंब उघडे पडू नये म्हणून अपघात विमा ठीक पण पुढे आरोग्य विमा जास्त आवश्यक असतो आणि त्याचा फायदा आपल्यालाच मिळतो. मग ती पोलिसी मी बंद केली. काल सुमारे ६ वर्षानंतर फोन आला की तुमच्या पोलिसी चे हप्ते तुम्ही वेळेवर भरले आहेत आणि फायदा काहीच घेतला नाही. आता अपघात झालाच नाही व मेलो पण नाही तर फायदा काय आणि कसा घेणार? पण त्या मुळे तुम्हाला रु १४५७०० इतका बोनस दिला आहे आणि तो मिळण्यासाठी तुम्ही noc प्रकिया पूर्ण करा . या प्रक्रियेला ४५ दिवस लागतात व त्या नंतर १० दिवसांनी तुम्हाला रक्कम मिळेल. प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला लिंक देते त्या द्वारे आधी २०००० रुपये क्रेडीट कार्ड च्या मध्यमातून भरा व मग प्रोसेस सुरु करू.
मग माझ्या लक्षात आलं की कोणतीही विमा कंपनी नो क्लेम बोनस असा देत नाहीत फार तर पुढील हप्त्यात थोडी सूट देतात. मी सांगितले कि मी बाहेर आहे तुम्ही लिंक देऊन ठेवा. त्यावर उत्तर असे होते कि तुम्हाला वेळ असेल तेव्हा याच नंबरवर फोन करा मग लिंक मिळेल.त्या नंबरवर फोन अस्तित्वात नाही असे उत्तर येते.
अशा प्रकारे आता विम्याच्या माध्यमातून फसवणुकीचा ट्रेंड आला आहे . तेव्हा सावधान.
अनिल जोशी
२९.०४.२०१९
(कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.)

फार छान माहिती, सतर्क राहू
ReplyDelete