हॉस्पिटल
लहान पणी एक गाणे ऐकले होते
पडू आजारी मौज हीच वाटे भारी.
यात आजारी पडल्यावर आपल्याकडे सर्वांचे कसे लक्ष जाते, आपली कशी काळजी घेतली जाते, शाळेत न जाता घरी राहायला मिळते असे वर्णन होते. त्या बदल्यात फक्त कडू औषधाचा घोट गिळावा लगे. अर्थात ते आजार पण साधा ताप, खोकला असे किरकोळ असायचे. आम्ही ह्या सरकारी वसाहतीत राहायचो तिथे एक दवाखाना होता. तिथे एक डॉक्टर येत असत व एक वैद्य नावाचे कंपौंडर असत. कधी इंजेक्शन ची वेळ आली तर ते वैद्य खुप्प दुखवायचे पण डॉक्टर हळुवार हाताने न दुखवता द्यायचे .(त्यांचे आडनाव बहुतेक मुळे होते)
मोठ्या हॉस्पिटलचा अनुभव पहिल्यांदा माझा हात मोडला तेव्हा आला. संध्याकाळी हात मोडला तेव्हा मुळे डॉक्टरनी एक इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी मी व माझे वडील मुंबईला जे जे हॉस्पिटल मध्ये आलो. तिथे पण एक इंजेक्शन व हाताला प्लास्टर घातले. त्या पेक्षा लक्षात राहिले ते वडिलांबरोबर हॉटेल मध्ये जाऊन जेवण केले ते..
नंतरचा हॉस्पिटलचा अनुभव म्हणजे काही कारणाने आईला दोन दिवस हॉस्पिटल मध्ये (ते नागपूरचे हॉस्पिटल बहुतेक मेयो हॉस्पिटल होते) राहावे लागले तिला भेटायला गेलो होतो. नंतर मुंबईला असताना एक नातेवाईक टाटा हॉस्पिटल मध्ये होते. त्यांना रात्रीचा डबा द्यायला मी व माझा भाऊ तिथे जायचो. नाकाला नळ्या लावलेले , बँडेज केलेले असे अनेक पेशंट तिथे दिसायचे. त्यांच्या खोलीतील एखादा पेशंट दिसला नाही की आम्ही आमच्या पेशंटकडे ( त्यांना बाबा म्हणत असू) चौकशी करायचो तेव्हा ते सांगत ते रात्रीच गेले. टाटा हॉस्पिटल समोर के ई एम हॉस्पिटल आहे. आणखी पण बाजूला काही हॉस्पिटल आहेत. त्यामुळे कधी कधी बस ची वाट पाहत असताना एखादी प्रेतयात्रा दिसायची.त्यामुळे लहानपणी या हॉस्पिटल प्रकारची धडकी भरली होती की इथे आलेला माणूस मरतोच. आमचे बाबा मात्र जिवंत पणी घरी गेले. पण काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. टाटा हॉस्पिटल हे कॅन्सर चे. तो काळ होता १९६६ चा.त्या वेळी त्यावरचे उपचार प्रगत झाले नव्हते.
हॉस्पिटलची आपणा सर्वांनाच भीती वाटते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे सुया खुपसणे. शरीरात सुई खुपसून घेणे म्हणजे नकोच वाटते. मी जेव्हा नोकरीसाठी रुजू झालो तेव्हा तिथे तपासणीसाठी शिरेतून रक्त काढले तेव्हा मला चक्कर आली होती. पण पुढे मित्रांबरोबर मी रक्त दान केले तेव्हा मात्र सुई आणि स्वतः:चे रक्त पाहणे याची भीती अजिबात निघून गेली. आता माझी व्हेन कुठे सापडेल हे मी सांगू शकतो. ऑपरेशन थेटर मध्ये विना टेन्शन जाऊ शकतो. सलाईन,बायोप्सी , ऑपरेशन कशाचीच आता भीती वाटत नाही.
सलाईन ,ऑक्सिजन लावलेल्या शुद्ध हरपलेल्या पेशंट सोबत थांबू शकतो. डायलेसिस रूम मध्ये नळीतून फिरणारे रक्त पाहू शकतो. एकूण हे सर्व प्रकार पेशंट चा आजार बारा करण्यासाठी, नियंत्रित ठेवण्यासाठी असतात. अशा तपासण्यांमुळे रोग निदान व्हायला व उपचार करायला मदत होत असते हे माहित झाले आहे. हास्पिटल मधून पेशंट बरे होऊन पण जातात हे ही पहिले आहे.
या हॉस्पिटल मध्ये आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. सगळीकडे वेदना, दुःख, काळजी, चिंता दिसत असते.आणि यात इथले डॉक्टर्स,नर्सेस व इतर स्टाफ लीलया सहजतेने वावरत असतात. त्यांची कामे यंत्रवत करत असतात.काही पेशंट ना व्हील चेअर वरून व स्ट्रेचर वरून ने आण करत असतात.
हॉस्पिटल मध्ये आपण कुणा पेशंटला भेटल्या जातो तेव्हा, आपला पेशंट ऍडमिट असेल तेव्हा व पण स्वतः: ऍडमिट असू तेव्हा आपल्या वागण्यात फरक असतो. आपण जेव्हा भेटायला जातो तेव्हा चौकशी करणे , पेशंटला धीर देणे शिवाय समजल्यावर भेटायला पण गेलो नाही असे कुणी म्हणू नये ही पण भावना असते. आपला पेशंट असेल तर पेशंटची तब्बेत, पैशांची सोय, औषधांची व्यवस्था असे अनेक ताण असतात. त्या मानाने स्वतः: ऍडमिट झालो तर फक्त आपला आजार हा एकाच विचार असतो. बाकी काळजी इतर घेत असतात.
असं हे हॉस्पिटल जरी कुणाच्या वाट्याला येऊ नये असं वाटत असलं तरी ते अपरिहार्य आहे. कधी ना कधी आपल्याला त्याचा सामना करावाच लागतो. तिथे सकाळ उजाडते ती सफाई कामगारांच्या सफाईने. रात्री पेशंट सोबत झोपायला आलेली मंडळी चहा पिऊन आपल्या रिलिव्हर ची वाट पाहतात. शिफ्ट बदलते. स्टाफ बदलतो. मग डॉक्टर्स च्या फेऱ्या सुरु होतात. ऑपरेशन्स सुरु होतात. ओपीडी मध्ये पेशंट नंबर लावून डॉक्टरची वाट पाहत असतात .इथे हल्ली विम्याबाबत सेवा देणारा विभाग असतो . शिवाय दुर्धर आजार झालेल्या रुग्णांना त्यांचे मनोबल वाढवायला सामाजिक कार्यकर्ते पण असतात.
एखादी रुग्णवाहिका नवीन पेशंट घेऊन येते तर मॅटर्निटी वॉर्ड मध्ये एखादा जीव जन्माला आलेला असतो. काही पेशंट डिस्चार्ज मिळून घरी जायला निघालेले असतात तर एखाया मृत पेशंटचे पार्थिव शोकाकुल वातावरणात हॉस्पिटल मधून बाहेर नेले जात असते.नेहेमीच्या आपल्या जीवनात आपल्याला आजार होणारच नाही व आपण अमर आहोत याच भावनेने आपण जगत असतो आणि ते योग्यच आहे. पण हे हॉस्पिटल आपल्या जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देत हे ही खरं आहे.
अनिल जोशी
३१.०१.२०२०
(आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी )

Comments
Post a Comment