राजकीय खोटेपणाचे वास्तव



आजकाल कुणी काय बोलत व काय प्रसिद्ध होत व त्यात काय तथ्य आहे हा संशोधनाचा विषय आहे. आणि याला माध्यमे जबाबदार आहेत म्हणजेच ती आपल्या जबाबदारीबद्दल गंभीर नाहीत असेच दिसते.पूर्वी कुणी एखादे विधान पत्रकारांपुढे केले तर त्यावर उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती होत असे. आजकाल काही लोकांच्या बाबतीत त्यांनी काहीही बोलावे व उपस्थित पत्रकारांनी ते बिनबोभाट प्रसिद्ध करायचे अये चालू आहे. बरे कुणी काही बोलले तरी प्रसिद्धी देताना त्याचे तारतम्य पण बाळगले जात नाही आणि आपण काही बोला त्याला प्रसिद्धी मिळते व सनसनाटी निर्माण होते आणि मग ती व्यक्ती जास्त चेकाळून विधाने करतच जाते. मग असा प्रश्न पडतो की माध्यमांना असली सनसनाटी निर्माण करून लोकांचे मनोरंजन करायचे आहे का? पूर्वी राजकारणात क्वचित असे विदुषकी वागायचे. त्यात सत्तरीच्या दशकात राज नारायण हे एक नाव होते. पण ते अपवादात्मक असायचे. पण आता अनेक नेते बर्याच वेळा तसे वागताना दिसतात.
गेले काही दिवस रोज पत्रकारांना खाद्य देण्याचे कम नेमाने करत असत व त्यात ते भाजप च्या विरोधात असल्याने चांगली प्रसिद्धी मिळत गेली. आणि महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आपणच आणली असा समज करून देण्यात ते यशस्वी झाले . त्यांना चाणक्य अशी उपाधी मिळाली. पण या सर्व गोष्टी शरद पवार यांनी घडवून आणल्या असे मानणारे पण बरेच आहेत . कारण यासाठी कॉंग्रेसला राजी त्यांनी केले असे बोलले जात होते. पण आता पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य सांगते की शिवसेनेचे ही आघाडी होण्यासाठी २०१४ मध्ये पण शिवसेना प्रयत्नशील होती.आणि अशोक चव्हाण म्हणतात मुस्लीम समाजाने भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी होकार दिला आणि म्हणून आम्ही सेनेसोबत जायचे ठरवले. आणि याला दुजोरा देणारे वक्तव्य शरद पवार यांचे. त्यांच्या मते सत्ते कुणी राहायचे हे मुस्लीम मतदार ठरवतात.
आता यात महाराष्ट्रात मुस्लीम मतदारांचा टक्का इतका नाही की ते सत्ता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावतील जी स्थिती उत्तर प्रदेशात आहे. बरे निवडणूक ही सेना भाजपने महायुती म्हणून लढवली म्हणजे बहुमत मिळाले की सत्ता युतीची येणार हे नक्की होते मग मुस्लीम समाज युतीच्या मागे उभा न राहता कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या  मागे उभा राहायला हवा होता व आघाडीला बहुमत मिळायला हवे होते पण तसे झाले नाही. अर्थात संपूर्ण प्रचारात फडणवीस मुख्यमंत्री होणार असे अनेक वेळा जाहीर झाले असताना निकालानंतर शिवसेनेने मुक्यामंत्री पदाचा वाद काढून भाजप बरोबर चर्चा बंद करून आपली मुक्यामंत्री व्हायची महत्वाकांक्षा पूर्ण केली. अर्थात अशी महत्वाकांक्षा असणे चूक नाही . यात फक्त गेली पाच वर्षे सत्तेबाहेर तडफडणाऱ्या कॉंग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत वाटा मिळवून दिला. पण ही सगळी सर्कस करताना या सरकार स्थापनेचे शिल्पकार संजय राउत यांना कटाक्षाने बाहेर ठेवण्यात आले. त्यांच्या आमदार भावाला मंत्रिपद पण दिले गेले नाही. त्यामुळे राउत पिसाळून अधिक वक्तव्ये करू लागले . यात त्यांना हे पण भान उरले नाही की आपण आटापिटा करून सत्तेत बसवलेल्या सरकारला धोका होवू शकतो.
मग इंदिरा गांधी याच्या करीम लाला यांच्या भेटी बाबत विधान केले व दिल्ली हून तंबी मिळताच मानभावीपणाने ते मागे घेतले .मग मी दावूद्ला दम दिला असे विधान केले. वास्तविक दावूद ज्या काळात भारतात होता त्या १९८५ च्या सुमारास ते लोकप्रभा मध्ये नुकतेच गुन्हेगारी बद्दल लिहू लागले होते. आणि त्यात सुद्धा त्यांच्या लिखाणाबाबत एक्ष्प्रेस्स वृत्त समूहाला कोर्टात पोलिसांची माफी पगावी लागली होती.कारण ते खर्या खोट्याची सरमिसळ करून धडधडीत खोटे लिहित होते. पण त्यांच्या बेमुर्वत विधानांची शहानिशा कुणाला करावी असे वाटत नाही.
गुजरात मधील encouter बद्दल तद्दन खोटे नाटे माध्यमातून पसरवले याबद्दल राजदीप सरदेसाई यांनी पण माफी मागितली आहे. म्हणजे खोटे बोलायचे, प्रसिद्ध करायचे आणि अंगाशी आले कि माफी मागून मोकळे व्हायचे असा मामला सुरु आहे.
असे किती तरी लिहिता येईल पण राजकीय खोटेपणाचे वास्तव आहे.

अनिल जोशी
२४.०१.२०२०
(कृपया आपल्या प्रतिक्रिया नावासह द्याव्यात)

Comments