आयुष्याचे नेटवर्क
वेगवेगळ्या ठिकाणी असलेले माहितीचे स्त्रोत, प्रोसेसर्स, त्या माहितीवर वेगवेगळ्या ठिकाणी होणार्या प्रक्रिया या सगळ्या जोडणाऱ्या यंत्रणेला नेटवर्क म्हणतात. म्हणजे उत्पादनांचे आरेखन (designing) एका ठिकाणी , त्याबरहुकूम उत्पादन करणे, त्या उत्पादनाच्या सगळ्या नोंदी, त्या उत्पादनांसाठी लागणाऱ्या मालासाबंधीची माहिती, त्याच्या ऑर्डर्स, पुरवठा व त्याच्या नोंदी , आलेल्या मालाची नोंद, त्याचा साठा, आलेल्या मालाच्या बिलांची नोंद व त्यांची पेमेंट,आर्थिक बाबतीतील नोंदी , तयार झालेल्या मालाची ग्राहकांकडे पाठवणी, त्यच्या नोंदी, देयके, त्यांची वसुली,सोबत कामगारांची हजेरी व त्यांची पगारपत्रके यांच्या नोंदी. ढोबळ मानाने एखाद्या उद्योगाचे हे असे चक्र असते आणि या चक्राला जोडणारी एखादी यंत्रणा असते त्यात सुसूत्रता आणण्यासाठी एखादी संगणकीय प्रणाली असते. यात सामान्यपणे पुढील विभागांचा सहभाग असतो. उत्पादन (production) ,
वित्त (Finance), माल (material) , विक्री (sales). आणि यामध्ये सुसूत्रता आणण्या साठी प्रभावी यंत्रणा लागते.अशा यंत्रणा सतत विकसित होत असतात आणि त्यामुळे उत्पादनात सुसूत्रता येते व अनावश्यक तोटे टाळले जातात. यासाठी त्या सर्व यंत्रणा प्रगत (upgrade) होत असतात. आणि त्यांमध्ये सुसूत्रता आणणाऱ्या यंत्रणेची अधून मधून देखभाल (maintenance) आवश्यक असते.
आपल्या आयुष्यात पण सगळ असंच असत.यात आयुष्यात घडलेल्या अनेक घटना , आयुष्यात आलेल्या व्यक्ती व त्यांचे संबंध, जुळलेली नाती, त्यांच्यातील ताण तणाव याबरोबरच एक आपले कुटुंब, त्याच्याशी संलग्न काही कुटुंबे म्हणजे जवळचे नातेवाईक, मग दूरचे नातेवाईक, शेजारी, परिचित, नात्याची नसलेली पण जवळची मित्रमंडळी, या सगळ्या वेगवेगळ्या घटकांतून आयुष्याची वाटचाल होत असते. आणि या सगळ्या घटकांना जोडणारी यंत्रणा म्हणजे प्रेम आणि विश्वास. या गोष्टींवर सगळा डोलारा उभा असतो. आणि यात सुसूत्रता आणण्यासाठी महत्वाची भूमिका असते ती संवादाची, भाषेची आणि शब्दांची. त्यात काही अधिक उणे झाले तर सगळा डोलारा कोसळू शकतो. आणि त्यासाठी या नात्याचे, संबंधांची देखभाल म्हणजे म्हणजे परस्परांच्या होणार्या भेटी. या भेटी सगळ्या घटकांमध्ये सुसूत्रता आणू शकतात . म्हणजेच या भेटीगाठी आनंद दायी झाल्या तर आय्स्याच्या नेटवर्क ची देखभाल (maintenance) होते.
अनिल जोशी
२०.०१.२०२०.
(कृपया आपल्या प्रतिक्रिया नावासह द्याव्यात.)

Comments
Post a Comment