जाहिरातींचे युग
सध्या हे युग जाहिरातीचं युग आहे असं म्हटलं जातं आणि ते खरं पण आहे. आज आपण पाहतो की जाहिराती या किती चकाचक असतात. लहानपणी जाहिराती या होर्डिंग्स, वर्तमान पत्रे, मासिके व रेडिओ सिलोन वर आणि चित्रपट गृहात सिनेमाच्या आधी असायच्या. १९६८-६९ च्या सुमारास विविध भारतीने जाहिरात विभाग सुरु केला. या शिवाय जाहिराती या काही कार्यक्रमांच्या निमित्ताने निघणाऱ्या स्मरणिकेत असायच्या, यात साधारण ९० % जाहिराती व १०% मजकूर असायचा .
या संदर्भात एक आठवण आहे. वडिलांच्या संस्थेच्या मदती साठी पु ल देशपांडे यांच्या असा मी असा मी चा प्रयोग होता. ही गोष्ट १९६६ मधील आहे. त्यासाठी तिकिटे खपवणे वगैरे चालू होते. एके दिवशी मला वडील टॅक्सी ने घेऊन गेले . नाटकाचे दोन बोर्ड पोचवायचे होते व महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रयोगाची जाहिरात द्यायची होती. त्या नंतर त्यांच्या बोलण्यात कधीतरी परत जाहिरातीचा विषय आला. कुणीतरी जाहिराती बद्दल बोलत होतं. त्यांना वडील म्हणाले ताबडतोब जा, पाहिजे तर टॅक्सी करून जा. तेव्हा मी विचारले जाहिरात आपण देऊन आलो की.तेव्हा ते म्हणाले ही जाहिरात वेगळी. म्हणजे स्मरणिकेसाठी होती. प्रत्यक्ष ती स्मरणिका छपून आल्यानंतर त्यातील जाहिराती पहिल्या पण त्यातून त्यावेळी फारसा बोध झाला नाही. त्या मागे अर्थ कारण असत हे पण तेव्हा कळण्याचं वय नव्हतं .पुढे विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने स्मरणिका काढणार होतो तेव्हा आम्हाला जाहिराती आणायला सांगितले होते. तेव्हा असं सांगण्यात आलं की आपण जाहिरात छापणार आहोत तेव्हा ती देणगी नव्हे.याचा अर्थ जाहिरात मिळवणे देणगी मिळवण्यापेक्षा सोपे आहे. पुढे तो पण भ्रम दूर झाला. कॉर्पोरेट विश्वात दोन प्रकार असतात. एक व्यवसायाशी निगडित तर दुसऱ्या धर्मादाय म्हणजे मदतीसाठी. त्याची बजेट वेगळी असतात.तेव्हा जाहिरात मिळवणे हे देणगी मिळवण्यापेक्षा सोपे वगैरे नसते.
आपल्या उत्पादनाची जाहिरात देण्याची प्रथा साधारण कधी सुरु झाली याचा विचार करताना एक गोष्ट आठवली . ती साधारण पाने ९०-९५ वर्षांपूर्वीची आहे. बेडेकर मसालेवाले चे संस्थापक वसंतराव बेडेकर यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे की किर्लोस्कर मासिकात ६ आणे देऊन (साधारण ३७ पैसे) जाहिरात दिली होती. किर्लोस्कर हे घरोघरी जाणारे मासिक असल्याने तेथे जाहिरात देणे फायद्याचे असे.२००१ मध्ये किर्लोस्कर मासिकाचा संपादक म्हणून काम करताना दर महिन्याला इतर कुणाची नसली तरी बेडेकरांची जाहिरात नेहमी असायची. टीव्ही येण्यापूर्वी किर्लोस्कर मासिकाला भरपूर जाहिराती मिळत असत.या बाबत आणखी एक आठवण अशी की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल च्या उदघाटनाप्रीत्यर्थ अपूर्व स्वरदान हा अंक
काढला होता .त्यात संगीत विषयक लेख होतेच पण जाहिराती महत्वाच्या. त्यामुळे आम्ही हॉस्पिटल बांधताना ज्या व्यावसायिकांना व्यवसाय मिळाला होता त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यात बऱ्याच जणांनी जाहिरात दिली. पण ज्यांनी हॉस्पिटलचे बांधकाम केले होते त्या शापूरजी पालोनजी यांनी थेट त्याच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन पण दाद दिली नाही. तर एका विद्युत काँट्रॅक्टरने सांगितले कि आम्ही हॉस्पिटलचे काम मोफत करून दिले आहे तर आता जाहिरात कुठून देणार ?यात असाही एक अनुभव आला की एका कॉम्पुटर हार्ड वेअर च्या दुकानदाराने जाहिरात दिली पण आमच्या दरापेक्षा खूप कमी दारात. त्यावर त्याच एकच म्हणणं होतं की ही जाहिरात वाचून एक जरी चौकशीचा फोन आला तर मी दुप्पट पैसे देईन.
जाहिराती हा एक मोठा व्यवसाय आहे. म्हणजे ज्यांना जाहिरात द्यायची ते एजन्सी मार्फत जाहिरात देतात. एजन्सी ठरवते कि जाहिरात कुठे द्यायची ते आणि त्यासाठी त्यांना चांगले कमिशन मिळते.शिवाय जाहिराती तयार जाणाऱ्या पण एजन्सी असतात . म्हणजे आर्ट वर्क करणे. रेकॉर्डिंग करणे. शूटिंग करणे. शिवाय जाहिरातीचा मसुदा ( याला कॉपी रायटिंग म्हणतात) करणे . या मध्ये निर्मितीला ( creativity ) वाव असतो. हे खूप मोठं जग आहे याला ग्लॅमर पण खूप आहे. या क्षेत्रात मॉडेल म्हणून सुरवात करून नंतर चित्रपट सृष्टीत गेलेल्यांची संख्या पण खूप आहे.
उत्पादनांच्या माध्यमात जाहिराती इतकेच हे विश्व मर्यादित नाही. या पलीकडे सेमिनार, फॅशन शो , प्रदर्शने या सारख्या माध्यमांचा पण उपयोग केला जातो. सौंदर्य प्रसाधनांना भारत ही मोठी बाजारपेठ आहे के लक्षात आल्यावर इथल्या अनेक तरुणीनं विश्व सुंदरी किताब मिळाले. जाहिरात ही उत्पादनांची नुसती माहिती देण्यापुरती नसते तर आपल्या उत्पादनांची गरज निर्माण करणाऱ्या जाहिराती पण असतात.
एकूण या जाहिरातबाजीला परिणाम न होऊ देणे हे स्थितप्रज्ञतेचे लक्षण आहे. कारण सतत होणारा जाहिरातीचा मारा हा परिणाम घडवतोच. अगदी दूरदर्शन वरील कार्यक्रम चक्क ब्रेक च्या नावाखाली जाहिराती साठी थांबवला जातो तर क्रिकेट मध्ये प्रत्येक ओव्हर संपल्यावर व विकेट पडल्यावर जाहिराती येऊन आदळतातच.
आपल्या उत्पादनाची नकारात्मक जाहिरात पण केली जाते जसे की एखाद्या मांसाहारी हॉटेलची जाहिरात फक्त चतुर्थीला प्रकाशित होते . -आज चतुर्थी. हॉटेल बंद अशी.
म्हणूनच हे युग म्हणजे सर्वार्थाने जाहिरात युग आहे म्हणतात ते खरं आहे.
अनिल जोशी
२८.०१.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी )

Comments
Post a Comment