लडिवाळ बट

परवा मेहदी हसन साहेबांची एक गजल ऐकली  काही केल्या ती मनातून जात नव्हती.. गजल अशी होती -

जन उस जुल्फ की बात चली
ढलते ढलते रात ढली

उन आन्खोने रुठके भी
अपने उपर बात ना ली

शाम्मओका अंजान ना पूछ
परवानोंके  वो साथ जाले

अबके भी वो दूर रहे 
अबके भी बरसात चली 

या गजल मधली उस जुल्फ मला लडिवाळ बट दिसू लागली. मग ती अशी साकारली.

जेव्हा त्या लडिवाळ बटेची गोष्ट निघाली
तेव्हा ती ढळता ढळता रात्र सरली 
त्या डोळ्यांनी रुसून पण 
न रुसल्याचा भाव दिला
ज्योतीचा तो वेडेपणा पण
फिदा झालेल्या पतंगा सोबत जळत राहिली
जरी ती आता दूर गेली 
तरी इथे बरसत राहिली.

हे अस शब्दाशी खेळण मनाला आनंद देवून जात.१९७-७६ चा काळ असेल , रोज काही लिहावं वाटायचं आणि मी लिहायचो. पण तेव्हा ते कविता स्वरुपात असायचं. त्याची काही झलक आणि पूर्व स्मृतींना त्या निमित्ताने उजाळा द्यायचा प्रयत्न.

एका गावाबाहेरच्या
डोहाकाठ्च्या संध्याकाळी
स्वत:चा श्वासोश्वास सुद्धा
स्पष्ट ऐकू येण्या इतपत शांततेत
डोहाच्या पाण्यात दगड टाकल्यानंतर
निर्माण होणर्या वर्तुळांच्या अंतापर्यंत
डोळे लावून
स्वत:मध्ये हरवताना --
(१३.०३.१९७६)
एका तृप्त मालकंसाच्या संध्याकाळी
प्रादेशिक बातtम्यांची रटाळ बडबड
आणि रसिल्या रागदारीच्या वातावरणातून
वीस कलमी कार्यक्रम (अनीबनीतला ), किमान वेतन
आर्थिक प्रकल्प, नाव भारताची उभारणी इ.इ.
वाटलं
उगाच आधी मालकंस लागला
निदान हुरहूर तरी लागली नसती.
((१४.०३.१९७६)
तुझ्यापासन दूर
सात समुद्रापलिकडे सुद्धा
आठवणीनी तुझ्या अगदी जवळ असतो
पण तुझ्या सहवासात मात्र
तुझ्या दिठीतल्या आसवांचा महासागर मात्र
अनेक योजन अंतरावर
नेवून ठेवतो.
हा सागर पर करायला
आसवांची नाव लागते
हे बर्याच उशीरा , पण लक्षात येत
मग प्रस्था ठेवायला
मुहूर्त लागत नाही.
(२५.०४.१९७८)

अशाच काही कविता पुन्हा कधीतरी.

अनिल जोशी 
०९.०१.२०२०

(कृपया आपल्या प्रतिक्रिया नावानिशी द्यावी)





Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती