सुटीचा दिवस i
सुटीचा दिवससगळ्यांनाच हवा हवासा वाटतो. नेहेमीच्या चक्रातून ती एक सुटका असते. शाळेत साप्ताहिक सुटी रविवारी असायची . आणि तिची चाहूल शनिवारीच लागायची. कारण शनिवारी शाळा सकाळची असायची आणि ती पण अर्धा दिवस. त्यामुळे शनिवार पण खास असायचा. यात एक अडचण असायची ती म्हणजे गृहपाठ कधी करायचा याची . काही हुशार व अभ्यासू मुले तो शनिवारीच उरकून टाकायची . पण शनिवारी जरा कुठे सुटीचा माहोल तयार होत असताना अभ्यास कुठे? आणि रविवारी तर प्रश्नच नाही . तेव्हा सोमवार उजाडला की गृहपाठ करायचा पोटात गोळा यायचा आणि घरून त्याबद्दल असं शेवटच्या वेळेपर्यंत ताणल्या बद्दल बोलणी पण खावी लागायची. पण गेली ती शाळेची व अभ्यासाची वर्षे. कॉलेज मध्ये रविवारी सकाळी NCC असायची . शिवाय होस्टेल वर राहत असल्याने कपडे धुवून त्यांना इस्त्री करणे, सायकलची मरम्मत . शिवाय मग एखादा चित्रपट पाहणे, फिरायला जाणे वगैरे. पण कॉलेज मध्ये गृहपाठ नसे. पण कॉलेज मुळात थोडा वेळ असल्याने इतर दिवशी पण मजा करता येत असे. शिवाय दिवाळी, नाताळ, उन्हाळी अशा मोठ्या सुट्या पण असायच्या. पण पुढे विद्यार्थी परिषद , साहित्य चर्चा मंडळ यात सहभाग वाढल्याने कॉलेज मधील दिवस मंतरलेले होते. पण ते फार काळ नाही टिकलं. कॉलेज सुरु असतानांच टेल्को सारख्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आणि एकदम पूर्ण दिवस कामाचे आयुष्य सुरु झाले. त्यात रोज ११-१२ तसं जायचे. सुट्या कमी त्यामुळे हक्काची अशी साप्ताहिक सुटी गुरुवारची. त्या सुटीचा पुरेपूर वापर व्हावा म्हणून बुधवार पासून नियोजन असायचं. एक म्हणजे सिनेमा पाहण असायचच. कधी बुधवारी रात्री, कधी गुरुवारी दुपारी वा संध्याकाळी . सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मेन स्ट्रीट वगैरे ठिकाणी भटकणे. वेगवेगळ्या ठिकाणी जेवणे असे चालायचे. शिवाय मित्रांच्या भेटीगाठी , साप्ताहिक कामे यात गुरुवार कधी निघून जायचा ते कळायचेच नाही. पुढे संसाराला लागल्यावर कामे, भेटीगाठी, अनोरंजन व जमल्यास विश्रांती असा सगळा लोड गुरुवारवर यायचा. करिअर ची ३३ वर्षे सुटी गुरुवार चीच.पण मजा होती. त्यात एक तोटा असा होता कि अनेक पारिवारिक कार्यक्रमाना जे रविवारी असायचे त्यांना जाता येत नसे. आणि रजा व इतर सुट्या कमी असल्याने सुटी ही गुरुवार चीच. एखाद्या रविवारी रजा घेतलीच तर निवांत रविवार पुरवणी वाचणे, दूरदर्शन चे विशेष कार्यक्रम पाहणे , भेटीगाठी असा कार्यक्रम असे. रविवारी सिनेमा नाही कारण खूप गर्दी असायची. मोठी रजा हि कारणानेच घेतली जात असल्याने त्याची गोष्ट वेगळी.
आता मात्र पाच दिवसाचा आठवडा असल्याने शनिवार रविवार जोडून सुटी. पण जस वय वाढत तसं adventure कमी होत आणि जास्त आराम किंवा निष्क्रियता यामुळे साप्ताहिक सुटी च thrill किंवा glamour नाहीसं झालं. तरी पण मानसिकता म्हणून रविवारी संध्याकाळी सुटी संपल्याची हुरहूर लागतेच आणि शुक्रवारी सकाळी सुटीच्या चाहुलीने मन हुरळून जातेच.
आता कधी कधी वाटत जेव्हा नोकरी संपेल तेव्हा रोजच सुटी मग सगळेच वर सारखे. पण त्या कल्पनेने आनंद होत नाही. कारण आठवडाभर काम केल्यानंतर सुटीची मजा. जसं रणरणत्या उन्हातून जाताना एखादा वृक्ष दिसला तर त्याच्या सावलीत विसावायचा आनंद असतो .पण उन नसेल तर सावलीची किंमत कशी कळणार? तसं आहे सुटीच.
अनिल जोशी
२५.०१.२०२०
(आपल्या प्रतिक्रिया कृपया नावासह द्याव्यात)

Your write up took me to the Past. Great days
ReplyDeleteGood I like it