स्वप्ने वेचताना
शीर्षक थोडे गोंधळात टाकणारे आहे पण खरंच आपली स्वप्ने वेचावी लागतात. कारण स्वप्ने आपण निद्रेत असताना पडतात आणि जागे झाल्यानंतर विस्मरणात गेलेली असतात. काही वेळा टी आठवतात सगळी किंवा तुटक तुटक. या तुटक तुटक स्वप्नांच्या साखळीचे दुवे जोडणे म्हणजे स्वप्ने वेचणे असे मी म्हणतो. सकाळी एखाद स्वप्न आठवलं तरी आपण त्याचा फारसा विचार करत नाही कारण ते स्वप्न होत आणि आपण वास्तवात आहोत याच आपल्याला भान आलेलं असतं. पण ते फार विचित्र किंवा भयावह असेल तर आपण ते विसरू शकत नाही,त्याची आपण कुठेतरी संगती लावायचा प्रयत्न करतो. किंवा ते कुणाला तरी सांगून आपल्या मनावरचा ताण कमी करायचा प्रयत्न करतो. एखादे स्वप्न चालू असतानाच एकदम जाग येते आणि ते स्वप्न जर भयावह असेल तर आपण हुश्श ते स्वप्न होते तर असे म्हणून सुस्कारा सोडतो.जर जागे व्हायची वेळ पहाटेची किंवा सकाळची असेल तर अशी स्वप्ने खरी होतात असे मानले जाते.
स्वप्ने हा कवी लोकांचा वीक पॉईंट असतो. कारण कवितेचं जग हे वास्तवाच्या पलीकडचं , भासरूप असत आणि त्यामुळे कदाचित ते स्वप्नांना जवळचं असतं.त्यामुळे कवींच्या अनेक उपमा वा उपमाने ही स्वप्ने असतात. आता चंद्र हा ओबड धोबड असा पृथ्वीचा उपग्रह आहे . पण कवींना त्याच्या शीतल प्रकाशामुळे व रात्रीचा त्याच्या आल्हाद दायक दर्शनाने तो काव्याचा विषय होतो अणि कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज लिहितात - हे शशांका स्वप्नांच्या सौदागरा. म्हणजे शिरवाडकरांना चंद्र हा स्वप्नांचा सौदागर वाटला. ही अधुरी स्वप्ने कवींना खूप आवडतात . एखादा कवी लिहून जातो -स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा. म्हणजे स्वप्नांचे अपूर्णत्व हे काव्य आहे आणि स्वप्नाची समाप्ती ही जागृती म्हणजे वास्तवता आहे.
झोप आणि स्वप्न यांचा निकटचा सम्बन्ध असल्याने त्यांचा परीघ रात्रीपुरता सीमित असतो. कारण दिवसा कुणी स्वप्न पाहिलं तर त्याला दिवास्वप्न म्हणतात. म्हणजे स्वप्न हे भास मय पण दिवास्वप्न हे त्यापलिकडचं म्हणजे जवळ जवळ खोटं मानलं जातं. कुणी काहींच्या काही बोलू लागले तर लगेच म्हटले जाते- उगाच दिवास्वप्न पाहू नकोस. म्हणजे रात्रीचे ते स्वप्न म्हणजे मखमली , हळुवार असं काही तरी आणि दिवा स्वप्न म्हणजे मूर्खांचे नंदनवन मानले जाते. स्वप्ने जशी रात्री पडतात तशी दिवसा झोप लागली तरी पडतात. स्वप्न या विषयावरची गाणी आठवून बघा. अगदी -वाट इथे स्वप्नातील संपली जणू, स्वप्नात पहिले ते राहू देत स्वप्नी, सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का, स्वप्न नगरीच्या राजकुमारा, अशी मराठी तर हिंदीत मेरे सपनोंकी राणी कब आयेगी तू, मेरे ख्वाबोंमे जो आए, नींद हमारी ख्वाब तुम्हारे, सपनोंका सौदागर आया, एक ही ख्वाब देखा मैने, अशी अनेक गाणी आठवतात.पण अशी अनेक स्वप्न असतात की ती अगदी तर्कहीन असतात. ती आठवली की मनात येतं हे असं स्वप्न का पडावं?
म्हणजे लहानपणी राहत असलेल्या घरात आता नसलेली माणसे आताच्या संदर्भात दिसणे . जसं की लहानपणी ज्या गावी राहत होतो तिथे आता हयात नसलेले आई, वडील व सध्याचे कुटुंब दिसणे व त्यात मला ऑफिस ला जायची गडबड दिसणे आणि त्या सेट अप मध्ये मला माझ्या काहीच वस्तू सापडत नाहीत, बस ची वेळ टळून जाते. मी अस्वस्थ अन मग जग येते. हुश्श , आहे मी घरातच , सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणि निघायला बराच वेळ आहे. हे निरुपद्रवी स्वप्न. आपण प्रवासाला निघालोय आणि गाडी चुकली वगैरे. पण एखाद्या स्वकीयांचा मृत्यू दिसणे फार भयावह असते. हे आपण कुणाला सांगू पण शकत नाही.
असे म्हणतात की काही स्वप्ने पाहायची असतात व ती पूर्ण व्हावी म्हणून प्रयत्न करायचे असतात. म्हणजे आपल्या ध्येयाचे मूर्त रूप स्वप्नात पाहायचे व त्याच्या पूर्ततेसाठी झटायचे. सध्याच्या युगात आरेखने (designs ) ही एक प्रकारची मूर्त रूप दिलेली स्वप्नेच असतात. हवं तर त्याला शास्त्रीय स्वप्ने म्हणूया. मन मनातील कल्पना वास्तवात आणण्यासाठी ही वाट धरावी लागते. शात्रज्ञांचे संशोधन हा स्वप्नांच्या वाटेवरचा प्रवास असतो. त्यांनी पाहिलेली स्वप्ने व त्या साठी घेतलेले परिश्रम या मुळे आज सामान्य माणसाला विमानातून गगनभरारी घेता येते. जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात चालू असलेली मॅच आपण घरबसल्या पाहू शकतो.एकूण मानवी प्रगती हा एक स्वप्नांचा प्रवास आहे. स्वप्ने पडणे आणि स्वप्ने पाहणे यातील फरक जाणून घेतला पाहिजे.स्वप्ने पडतात व विरून जातात पण स्वप्ने पाहून ती पूर्ण केली तर आपण प्रगतीची एक पायरी पार केलेली असते.
अशी स्वप्ने वेचत वेचत माणसाची वाटचाल चालू असते.
अनिल जोशी
( कृपया आपल्या प्रतिक्रिया नावानिशी द्याव्यात )

Comments
Post a Comment