नाचू कीर्तनाचे रंगी.
आज सकाळी प्रवासात बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन ऐकत होतो. दर चातुर्मासात पुण्यात त्यांची प्रवचने होतात पण त्यात एकादशीला ते कीर्तन करतात. त्यांचे कीर्तन हे वारकरी संप्रदायाचे असते. त्याचा एक वेगळा थाट असतो . बाजूला ४०-५० टाळकरी , मृदूंग, तबला , पेटी अशी साथ . रसाळ निरूपण व संगीत यांची मेजवानी असते.एकूण वातावरण भारून गेलेले असते. हा अनुभव मी घेतला आहे.
वास्तविक वारकरी संप्रदायाचे कीर्तन आम्हाला नवे. हरदासी नारदीय परंपरेतील कीर्तने लहानपणापासून ऐकलेली.कोकणात गणपती उत्सवात पूर्वी रोज कीर्तन होत असे . जेव्हा वाहतुकीची साधने नव्हती तेव्हा कीर्तनकार बुवा संपूर्ण उत्सव आमच्याकडे मुक्कामाला असत. लहानपणी आधीचे निरूपण काही काळात नसे पण दृष्टांत म्हणून सांगितलेली कथा मात्र ऐकायला मजा येत असे.या कीर्तनात अभंग, भजने, साकी, दिंडी, आर्या, असे विविध प्रकार ऐकायला मिळत. या सगळ्या प्रकारांचा ते निरूपण आणि कथानक पुढे नेण्यासाठी वापर करत. पूर्वी काही कीर्तनकार पायात चाळ बांधून चक्क नाचत पण असत ऐकले
आहे. म्हणून असे म्हणायची परंपरा आहे नाचू कीर्तनाचे रंगी.
अनेक कीर्तनकारांची कीर्तने ऐकली पण प्रत्यक्ष प्रभावी असे कीर्तन बेळगावला १९७१ मध्ये निजपपुरकर बुवांचे ऐकले. त्यांचे निरूपण हे महत्वाचे असे . त्यामानाने मग पुढील कथेला फार महत्वाचा नसे. त्यांच्या कीर्तनात दोन मृदूंग असत व त्यांच्यात जुगलबंदी होत असे.मध्यंतरी यु ट्यूबवर चारुदत्त आफळे यांची महाभारतातील अनेक चरित्रांवरची कीर्तने ऐकली . ही फक्त कीर्तनाच्या पेहरावात होती म्हणून कीर्तने पण त्यात चरित्रांचे निरूपण महत्वाचे. त्यांचे वडील गोविंदस्वामी आफळे हे राष्ट्रीय व राजकीय कीर्तनकार होते. त्यांचे कीर्तन ऐकायचा कधी योग्य नाही आला.
गणपती उत्सवाच्या निमित्ताने आमच्या आईने व वाहिनेने कीर्तन केले होते.आमच्या परिचितांपैकी एक मुलगी कोकणातून शिकायला पुण्यात आली होती. वास्तविक तिच्या गावी कॉमर्स कॉलेज होते व तिचे वडील त्या कॉलेज मध्ये प्राध्यापक होते. तरी मग शिकायला पुण्यात का असा मी तिला प्रश्न केला तेव्हा ती
म्हणाली होती की मला कीर्तन शिकायचे आहे व ती सोय फक्त पुण्यातच आहे. म्हणजे तरुणांना सुद्धा या माध्यमाचे आकर्षण आहे. एक तरुण बहुतेक बडवे आडनाव होते व एक मुलगी दोघे कीर्तनाच्या जुगलबंदीने कार्यक्रम करत असत.वचनात प्रवचन कार एखाद्या विषयाचे निरूपण करतो. श्रोते ते ऐकतात. पण कीर्तन ही सामुहिक साधना आहे. यात श्रोत्यांचा अधून मधून का होईना नामाचा गजर करण्याच्या निमित्ताने सहभाग असतो. नाम संकीर्तन , भजन करता करता दृष्टांत देत बुवा कठीण अध्यात्म भक्तिमार्गाच्या माध्यमातून सोपे करून मांडतात.या हरदासी परंपरेतील संगीत प्रकारचा वापर संगीत नाटकांमधून केला गेला. किंबहुना हे संगीत हा आपल्या संगीत नाटकांचा पाया होता. पण पूर्ण नाटक कीर्तनाच्या माध्यमातून सतीश आळेकर यांनी महानिर्वाण नाटक सादर केले. तर अवघा रंग एक झाला हे एका कीर्तनकाराच्या जीवनावरील नाटक असल्याने त्यांच्या मुलाने आधुनिक कीर्तन आपल्या पिढीचे म्हणून त्यात सादर केले.
कीर्तन ही कला आहे आणि परंपरा पण. आकाशवाणीवर दार रविवारी संध्याकाळी कीर्तन होत असते. नरक चतुर्दशी ला पहाटे. रेडिओवर नरकासुराच्या आख्यानावरील कीर्तन ऐकल्याशिवाय दिवाळी आहे असे वाटत नसे. प्रत्यक्ष नाही तरी यु ट्यूब सारख्या माध्यमातून या परंपरेचे अस्तित्व जाणवते हे ही नसे थोडके.
अनिल जोशी
२२.०१.२०२०
(आपल्या प्रतिक्रिया कृपया नावासह द्याव्यात )

Comments
Post a Comment