वर्ष सरले
वर्ष सरले
आज ३१ डिसेंबर म्हणजे वर्षाखेर म्हणजे रुक्ष भाषेत भिंतीवरील कॅलेंडर बदलाचा दिवस. पण हा बदल नवीन वर्षाचे स्वागत म्हणून उत्साहात साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे सगळ्यांना नेहेमीच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा हवा असतो आणि म्हणून असे सण, उत्सव साजरे केले जातात . याला पौराणिक संदर्भ पण आहे. रामायण काळात सीता त्यागानंतर रामराज्य सुरळीत सुरु होते.पण तेच तेच पण आणि जीवनातील रुक्षपण यामुळे प्रजा उदास होती असा रामाला अहवाल मिळाला . व राजसभेत यावर असे ठरले की रामाने राजसूय यज्ञ करावा म्हणजे प्रजाजन हा उत्सव साजरा करतांना आनंदित होतील. तसेच सौभद्र नाटकात पण नारद लग्नाला जातो मी या गाण्यात म्हणतो - न मिळे अशी मौज पहावया पुन्हा . असर हे सण व उत्सवाचे महात्म्य.
या निमित्ताने नवीन वर्षात संकल्प केले जातात.मी सहसा असे काही ठरवत नाही पण यंदा या ब्लॉगच्या निमित्ताने दिसामाजी काही लिहित जावे असा मानस आहे. म्हणजे सक्ती नाही .एखाद्या दिवशी काही सुचले नाही तर नाही लिहायचे . पण अशी शक्यता कमी कारण लिहायला उद्युक्त करणारी घटना दिवसात घडली नाही असे सहसा होत नाही .आणि तसे न झाल्यास सरलेल्या ६५ वर्षांचे संचित आहे ते पण भरपूर आहे.
या नाव वर्षाचे वैशिष्ठ्य म्हणजे गुलाबी थंडीचा मौसम. आपल्या उष्ण कटिबंधातील लोकांना थंडीचे तसे अप्रूपच. धुके पडले की आपल्याला अतीव आनंद होतो. कारण धुके ही थंडीची चाहूल देत असते. आज सकाळी बाहेर पडलो तेव्हा हवेत थोडा जास्तच गारवा होता बस जेव्हा हिंजवडीला पोचली तेव्हा ब्लू रिज मधील टोलेजंग इमारती दाट धुक्याने वेढलेल्या होत्या. शिवाय आज वर्षाखेर व उद्या नवीन वर्षाची सुटी असा दुहेरी आनंद वाफाळलेली कॉफी घेताना लुटला.
त्यामुळे आपण मोकळ्या मनाने स्वागत स्वागत करुया आणि सर्वांना नवीन वर्ष हे सुखासमाधानाचे , भरभराटीचे आणि निरामय आरोग्याचे जावो हीच इच्छा.
अनिल जोशी
(टीप : या लेकांवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत पण त्या देणार्यांची नावे येत नाहीत तरी प्रतिक्रिये नंतर आपले नाव लिहिल्यास प्रतिक्रिया कुणाची हे समजेल.)
३१.१२.२०१९.
अनिल आणि ब्लॉग वाचणाऱ्या समस्त वाचक वर्गाचे नूतनवर्षाभिनंदन व अनंत शुभेच्छा.
ReplyDeleteगेले वर्ष बरे असे म्हणायची वेळ न येवो ही ईशचरणी प्रार्थना. - अवी
टीप - तुझ्या निवेदनाबद्दलच्या पोस्टवर मी प्रतिक्रिया दिली आहे.