तृषार्त मन माझे

तृषार्त मन माझे
कसली ही मृगतृष्णा
सदा धावे मृगजळामागे
धाव ही संपेना
तृषा काही शमेना
असंच होत आपल्या मनाच. वेड मन अप्राप्य गोष्टींमागे धावत सुटत रक्त बंबाळ होईपर्यंत . थकल्यावर विसावत कुठेतरी , मग पुन्हा तीच जीवघेणी धाव. मनाला विसावा देणाऱ्या अनेक गोष्टी सभोवताली असताना सुद्धा तिकडे दुर्लक्ष करून हा प्रवास सुरूच राहतो.
मनाचे हे अश्व चौखूर उधळले की त्यांचे लगाम हातात असले तरी त्यावर नियंत्रण राहत नाही. अनेक संतांनी पण या मनाच्या अवखळतेबद्दल लिहिले आहे, उपदेश केला आहे. रामदास स्वामी तर मनाच्या श्लोकांतून अवखळ मनाला वारंवार बजावत असतात.
पण शांताबाई मात्र या मनाचे कौतुकच करतात. त्या आकाशातील मेघालाच बोलावतात आणि म्हणतात
ये रे घना, ये रे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना, ये रे घना
ये रे घना, ये रे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना, ये रे घना
फुले माझी अळुमाळू,
वारा बघे चुरगळू
फुले माझी अळुमाळू,
वारा बघे चुरगळू
नको-नको म्हणताना,
नको-नको म्हणताना गंध
गेला राना-वना
ये रे घना, ये रे घना, ये
रे घना, न्हाऊ घाल
माझ्या मना
ये रे घना, ये रे घना
टाकुनिया घरदार नाचणार,
नाचणार
टाकुनिया घरदार नाचणार,
नाचणार
नको-नको म्हणताना,
नको-नको म्हणताना मनमोर
भर राना
ये रे घना, ये रे घना, ये
रे घना, न्हाऊ घाल
माझ्या मना
ये रे घना, ये रे घना
नको-नको किती म्हणू,
वाजणार दूर वेणू
नको-नको किती म्हणू,
वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा
वारा मला रसपाना, वारा
मला रसपाना
ये रे घना, ये रे घना, ये
रे घना, न्हाऊ घाल
माझ्या मना
ये रे घना, ये रे घना, ये
रे घना, ये रे घना
ये रे घना, ये रे घना, ये
रे घना, ये रे घना
खरच अध्यात्मातील अवघड अशा गोष्टी कवी आणि साहित्यिक खूप सोप्या करून टाकतात.
अनिल जोशी@
२८.०२.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
Comments
Post a Comment