मी लिहू का?
साधारण पणे कॉलेज मध्ये गेल्यावर सुरवंटाचे फुलपाखरू व्हायला सुरुवात होते. मग हळूच कुणी मनातले व्यक्त करायला कविता लिहू लागतो तर कुणी आपला अनुभव दुसर्याचा म्हणून कथेतून मांडतो. ही लिखाणाची प्राथमिक अवस्था झाली. पुढे ते तसेच चालू राहिले तर प्रगल्भता येते. ही परिस्थिती कॉलेज मधील प्राध्यापकांना ठावूक असते आणि या विद्यार्थ्यांच्या लिखाणाल दिशा मिळावी म्हणून त्यांचा प्रयत्न पण असतो. मी जेव्हा कॉलेज मध्ये आलो ते १९७१ साल आणि आमचे तत्कालीन एम ई एस कॉमर्स कॉलेज हे अशा उपक्रमांनी बहरले होते. वक्तृत्वाला उत्तेजन मिळावे म्हणून वाद सभा, नाट्य मंडळ,संगीताच्या साधकांना रसिक मंडळ तर साहित्यासाठी दोन मंच होते. एक निनाद हस्त लिखित जे दर पंधरा दिवसांनी नोटीस बोर्ड वर झळकायचे . यात लेखकांबरोबर चित्रकारांना पण आपली चित्रकला चित्रकला दाखवायची संधी असायची . तर दुसरे मध्यम म्हणजे साहित्य चर्चा मंडळ. यात विद्यार्थ्यांनी आपले साहित्य द्यायचे व त्यावर विद्यार्थीच सांगोपांग चर्चा करीत. या वेळी आमचे मराठीचे प्राध्यापक ग स शुक्ल आवर्जून उपस्थित असायचे . त्यांच्या बद्दल एक महत्वाची बाब म्हणजे गहन व्याकरण , कठीण शब्दार्थ यात अडकून पडलेल्या मराठी ला यातून बाहेर काढून मराठी चा रसिक म्हणून आस्वादक करण्याचे कम केले व मराठी विषयाची भीती घालवून प्रीती निर्माण केली. या मंडळाचे प्रमुख सुप्रसिद्ध लेखक द मा मिरासदार हे पण आवर्जून उपस्थित असायचे व बहुमोल मार्गदर्शन करायचे.

यात विद्यार्थी सहसा आपले साहित्य देण्यास उत्सुक नसत कारण प्रत्येक जण आपल्या लिखाणाबद्दल भावूक असायचा व त्याला/तिला फक्त कौतुकाचीच अपेक्षा असायची. मी मात्र माझी पहिली (बाळबोध) कथा मंडळात चर्चेला दिली आणि त्या मुळे पुढची कथा साधारण तीन चार वर्षांनी लिहिली. सर्म्यान १९७३ -७४ या शैक्षणिक वर्षात मंडळाचा सचिव म्हणून कम करत असताना समृद्ध होत गेलो. जे मिळेल ते समजले नाही तरी साठवत गेलो आणि आता लक्षात येतंय की ते फार बहुमोल संचित त्या काळात जमा केल होत. याचा उल्लेख मी जेव्ह्या मला साहित्य गौरव पुरस्कार मिळाला तेव्हा केला कारण ज्यांनी हा पुष्कर दिला ते डॉ मधुसूदन घाणेकर पण याच यात्रेचे वारकरी होते. आणखी एक म्हणजे आमचे प्राचार्य शरच्चंद्र चिरमुले हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असले तरी मोजकेच लिहिणारे एक कथा लेखक होते. त्यांच्या कोलेजच्या दिवसात फर्ग्युसन महाविद्यालयात प्रा. रा.श्री. जोग हे साहित्य सहकार या संस्थे मार्फत साहित्य चळवळ चालवत असत हीच संकल्पना प्राचार्य चिरमुले यांनी आमच्या महाविद्यालयात आणली .विद्यार्थ्यांच्या साहित्या सोबत मान्यवर साहित्यिकांच्या साहित्यावर त्यांच्या उपस्थितीत चर्चा होत असे. मी कॉलेज मध्ये आल्यावर असा पहिला कार्यक्रम दि बा मोकाशी यांच्या चापलूस या कथेवर चर्चा झाली होती. त्यावर त्यांनी फारच मिश्किलपणे उत्तरे दिली होती. त्या नंतर पण पुढे त्यांच्या भेटी झाल्या. मी सचिव असताना एका कथेचा प्रवास सांगायला डॉ विद्याधर पुंडलिक आले होते. चित्रपट कथांच्या टिप्स द्यायला शंकर पाटील आले होते तर शिकार कथा बाबत गमती सांगायला व्यंकटेश माडगुळकर आले होते. त्यावेळी आनंद यादव यांची गोतावळा ही कादंबरी गाजत होती. त्यांच्या उपस्थितीत त्यावर आमच्या वकुबाप्रमाणे चर्चा झाली पण त्यांनी या कादंबरीच्या निमित्ताने जे मनोगत व्यक्त केले होते ते बहुमोल होते. नंतर्व्ह्या वर्षी साहित्यिकांची अंधार यात्रा यावर प्राचार्य चिरमुले जे बोलले ते तर साहित्यिक भाषणाचा मौलिक वस्तुपाठ होते. ते म्हणत प्रत्येक वेळेला लिहितांना हे मी लिहिलेच पाहिजे का? असा स्वत:शी प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आले तरच लिहा. हा त्यांचा मंत्र कायम लक्षात रहिल. या लेखाचा समारोप करताना एक कविता देण्याचा मोह आवरत नाही.

मध्यरात्रीच्या काळ्याशार गर्भात
पहाटवेळेची तांबूस किनार दिसत होती
निद्रादेवी रूसलेल्या पापण्याना
उद्याच्या स्वप्नांची आस होती
हुरहूर,काहूर, अस्वस्थता
सगळंच निसटून गेलेलं,हरवलेलं
डोळ्यांच्या पापण्या पेंगुळता पेंगुळता,
पहाटस्वप्नांची चाहूल लागली
निळ्या निळ्या वादळांनी
पिवळी पिवळी झाडे
बेफाम नाचतच राहिली
ढगांमागे भेदरून उभ्या जलपर्या
यक्ष किन्नरांच्या भयाण सावल्या
पहात पहात
झोप आणि जागृतीच्या
सीमेवर
अदृष्य झाल्या
धूसर धूसर आस्तित्वहीन.
अनिल जोशी
२२.०२.२०२०
कृपया आपल्या प्रतिक्रिया आपल्या नावांनिशी द्याव्यात.
Comments
Post a Comment