नवीन काय ?

नवीन काय ?

सकाळी सकाळी कुणीतरी मला साखरझोपेतून जाग करत होत . अरे उठ , उठ लवकर. आज सुटी त्यामुळे कसलीच घाई नव्हती म्हणून किंचित त्रासून पाहत होतो की कोण मला उठवतय ते. पण दिसत मात्र कुणीच नव्हत. नेहेमी प्रमाणे चहा वैरे घेउन पेपर चाळत्त होतो तर कानात परत कुजबुज - मी आलोय .दिसत तर कुणीच नव्हत पण कुजबुज सुरूच होती. मग सगळी आन्हिके आवरून बाहेर पडलो तर पुन्हा कानात कुजबुज सुरु. कुणी दिसत तर नव्हत आणि कुजबुज थांबत नव्हती . 
जानेवारीचा अंक तयार झाला असेल म्हणून उत्तम कथाच्या संपादक वैजयंती काळे यांच्या कडे गेलो. जानेवारीचा अंक घेतला. फेब्रुवारीच्या अंकात काय लिहायचे या संबंधी चर्चा पण झाली. पण कानात कुजबुज सुरूच. निघताना त्या म्हणाल्या तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तेव्हा कानात हुश्श असा आवाज आला. पण काही काळात नव्हत. मग घरी येवून भोजन आणि छान झोप. तर पुन्हा कुजबुज सुरूच. मग बाहेर फिरून आलो. टीव्ही पहिला. आलेल्या पाहुण्यांशी गप्पा झाल्या. डॉक्टरांकडे चेक अप ला जावून आलो. 
आज प्रसिद्ध झालेल्या अंकातील माझा लेख वाचत होतो.
गाण्यांची सुरेल सांगत 
कधी गाणं सहज कानावर पडतं , कधी आपण ते मन लावून ऐकतो आणि श्रवणानुभव घेतो. मग त्यातील स्वर, शब्द,भाव याचा मनावर एकत्रित परिणाम होतो. कुठेतरी आपली भाव समाधी लागते .त्या गाण्याची मग एक मूर्ती मनात साकारते. त्यात मग आठवणीचे रंग भरले जातात आणि मग ते फक्त गाणं न उरता ते मनातलं स्वर शिल्प किंवा स्वरचित्र होतं. त्याही पलीकडे जाऊन काही गाणी आपल्याला भेटतात . त्या भेटी आणि त्यांच्या कथा या अधिक सुरस असतात . हे थोडंसं धूसर किंवा अमूर्त असत पण प्रयत्न केला तर ते शब्दात उतरू शकतं.

पुढे वाचत गेलो पण कानात कुजबुज सुरूच होती. अखेर मी वैतागून म्हटल - नुसत मी आलोय मी आलोय काय चालू आहे? कोण आहेस तू? 
त्यावर आवाज आला अरे आजूबाजूला बघ . मी आलोय कस स्वागत चालू आहे माझं? मला तर कुठे काही दिसत नव्हत. त्यावर आवाज आला काल रात्री काय जास्त घेतली होती का? माझ्या येण्याच्या सेलेब्रेशन साठी? मी तर रात्री काहीच सेलेब्रेशन केले नव्हते. सकाळी किंवा दिवसभर पण काही जाणवलं नव्हत .

मग पुन्हा आवाज आला फोनवर whatsapp किंवा facebook बघ.. ते पाहिलं तेव्हा लक्षात आलं. तिथे फक्त नवीन वर्षाचे स्वागत आणि शुभेच्छा दिसत होत्या. मग आवाज आला - आता समजलं मी काय सांगत होतो ते? मी आलोय , माझ स्वागत कर. 
पण दिवसभर मी विचार करत होतो , नवीन वर्ष आलं . पण नवीन कुठेच काही दिसत नव्हत , जाणवत नव्हत. 
पण मग विचार केला असूदे , आलंय नवीन वर्ष तर करुया स्वागत त्याच. मग जेव्हा मी म्हटले 
नवीन वर्षाचे स्वागत असो . मग ती कुजबुज थांबली.

अनिल जोशी
०१.०१.२०२० .

(आपली प्रतिक्रिया नावासह आल्यास बरे होईल.)

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती