झुक झुक झुक अगीनगाडी
लहानपणापासूनच आगगाडीतून प्रवासाचे मला अप्रूप होतेच. तसे ते सर्वांनाच असते. माझ्या कळत्या वयात आम्ही विरार ला राहत होतो आणि तिथून अनेक वेळा मुंबईला लोकलने प्रवास होत असे. शिवाय घराच्या मागच्या अंगणात उभे राहिले की दूरवर रेल्वे रुळांवरून गाड्या जाताना दिसत . त्यात जोरात जाणाऱ्या म्हणजे फ्लायिंग राणी ही मुंबई ते सुरत जायची. तर पिवळे डबे असलेली डिलक्स गाडी दिल्लीला जात असे. अर्थात हे ऐकीव ज्ञान होते. लोकल व्यतिरिक्त मोठ्या म्हणजे इंजिन असलेल्या गाडीत पुण्याला जाताना बसायला मिळायचे. त्यात मोठा प्रवास व घाटातील बोगदे यांचे खूप आकर्षण असायचे. असे असताना वडिलांची बदली नागपूर येथे झाली . तेव्हा खूप वेळ गाडीत बसायला मिळणार याचा आनंद होता पण रात्री गाडीत झोपायचे कसे हा पण प्रश्न होता. पण पहिला ओव्हर नाईट रेल्वे प्रवास तेव्हा झाला. पुढे तिथून मग हैदराबाद, पुणे असे प्रवास होत राहिले आणि एका अर्थाने रेल्वे प्रवासाला आम्ही निर्ढावलो.
रेल्वे बद्दल काही गोष्टी सहज समजत गेल्या. अमळनेर येथे शाळेत जायला रेल्वे रुळांवरून शॉर्ट कट होता. सुमारे १किमी अंतर चालताना दोन रुळांमधील सांधे कसे असतात, ते बदलताना नेमके काय होते की ज्यामुळे गाडी योग्य रुळांवरून जाते, त्या मार्गावर दिवसातून भुसावळ कडे जाणाऱ्या ३ व सुरत कडे जाणाऱ्या ३ अशा पॅसेन्जर गाड्याच्या फेऱ्या असायच्या व क्वचित एखादी मालगाडी. मला फक्त ट्रॉलीज पाहायला मिळत असत. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर चेंबूर ते दादर असा शाळेसाठी गाडी बदलून प्रवास होत असे. त्या वेळी सिग्नल वरून गाडी कोणत्या प्लॅटफॉर्म वर जाणार हे कसे ओळखायचे याचे ज्ञान झाले. शिवाय फर्स्ट क्लास, लेडीज डबे कुठे येतात ते ओळखायला शिकायला मिळाले. गर्दीत गाडीत कसे शिरायचे व आपल्या स्टेशनवर कसे उतरायचे याचे पण ज्ञान झाले. ७व्या इयत्तेत असताना एकट्याने पहिला रेल्वे प्रवास पुणे-मुंबई असा केला होता तर ८वीत असताना व्हीटी ला जाऊन फॉर्म भरून वडिलांचे रिझर्व्हशन करणे वगैरे करायला लागलो होतो.
पण खऱ्या अर्थाने रेल्वेच्या सेवेचा आवाका लक्षात आला तो जेव्हा पुणे ते जम्मू असा प्रवास केला तेव्हा. किती जंक्शन ,त किती स्टेशन्स , किती प्रवासी व किती उलाढाल असू शकते याच्या भव्यतेचा अंदाज आला. त्या नंतर असाच मोठा प्रवास कन्याकुमारी ते पुणे केला तेव्हा रेलेच्या दक्षिणोत्तर नेट वर्क चा अंदाज आला. आणि तेव्हा जो पांढऱ्या कपात चहा मिळायचा तो कन्याकुमारी पासून जम्मू पर्यंत तितकाच बेचव असायचा. मात्र जेवणात गाडी जिथून जात असेल तिथल्या पदार्थांचा समावेश असायचा. जम्मू होऊन मुंबईला जाताना संध्याकाळी एक जेवण पठाणकोट ला आले ते पंजाबी छोले वगैरे असलेले होते तर दुसरे जेवण कोटा राजस्थान येथे आले त्या भाजीला राजस्थानी चव होती. तिसरेजेवण सुरतला गुजरात मध्ये आले ते गुजराथी पद्धतीचे होते. या सगळ्या प्रवासामुळे दूरदर्शन वर रेल्वेची एक मालिका दाखवली होती . एका भागात कन्याकुमारी ते जम्मू असा प्रवास होता तर दुसरीत जेसलमेर ते गुवाहाटी असा होता ती फार आवडली होती.
रेल्वे प्रवासात आणखी येणार अनुभव म्हणजे सहप्रवासी. यातून मेरा भारत महान चे दर्शन घडते. आम्ही पुण्याहून कोलकत्ता येथे जायला गाडीत बसलो तर आजूबाजूला बरेच ईशान्य भारतातील मुले दिसत होती. तेथून एवढी मुले शिकायला पुण्यात असतील याचा अंदाज नव्हता. विशिष्ट चेहेरेपट्टीमुळे ती पटकन ओळखू येतात. आमच्या जवळ त्यातील एक विद्यार्थी होता तो मणिपूरच्या होता व इथे मेडिकल ला (AFMC ) मध्ये शिकत होता. तो म्हणाला तेथील अस्थिर परिस्थिती मुले तेथील मध्यमवर्गीय आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवतात. आणि पुणे हा शिक्षणासाठी पहिला पर्याय आहे हे तर निश्चित.
हीच गाडी जेव्हा टाटानगर येथे पोचली तेव्हा रात्रीचे १० वाजले होते आणि पहाटे ४ वाजता कोलकत्ता येणार होते. जसे टाटानगर आले तसे गाडीतील वांग बांधव प्रोत्साहित होऊन जोरजोरात बोलू लागले. आपला देश जवळ आला याचा आनंद ओसंडून वाहत होता यात आमच्या झोपेचे खोबरे झाले होते ते वेगळेच.
कोलकत्ता येथे फिरतांना तेथील भुयारी मेट्रोचे आकर्षण होतेच. त्यातून प्रवास करण्याचा सुखद अनुभव घेतला. अतिशय स्वच्छ स्टेशन्स , जिने इतके स्वच्छ की गाडी येई पर्यंत लोक पायऱ्यांवर बसून गाडीचे वाट पाहत. आणि हे शक्य होते.केवळ तिकीट धारकांनाच प्रवेश असल्यामुळे. या उलट परिस्थिती हावडा स्टेशन वर . कारण स्टेशन वर मुक्त प्रवेश पर्यायाने घाण करायचा परवाना.२०१५ मध्ये अंधेरी ते घाटकोपर प्रवास मेट्रोने केला आणि आता प्रतीक्षा आहे पुण्यातील मेट्रोने प्रवास कधी करायला मिळतो याची.
अनिल जोशी
(कृपया आपली प्रतिकृया / अभिप्राय नावासह द्यावे)

Chhan lihile ahes Anil
ReplyDeleteKhup chan,
ReplyDeleteManohar Deshpanden
Khoop chhan. Mala pan rail way che khhop ajarshan hote ani ahe.
ReplyDelete