पार्टीतले संवाद

"अरे कधी भेटायचं ? बसूया एकदा."
"विचार सगळ्यांना . नाहीतर ग्रुपवर टाक मेसेज."
"मित्रहो, सगळ्यांच्या खास आग्रहास्तव विशेष बैठक नेहेमीच्या ठिकाणी व नेहेमीच्या वेळी आयोजित केली आहे. सर्वांनी अनमान न करता वेळेवर उपस्थित राहून तृष्णा व क्षुधा यांचे स्वखर्चाने शमन करावे ही विनंती.
का मेसेज फक्त ग्रुपवर गोपनीयतेसाठी टाकला आहे. "
"अरे या या , सगळे अगदी वेळेवर म्हणजे सगळेच तहानलेले दिसताहेत. आपले नेहेमीचे दोन न पिणारे  मेम्बर नंतर फक जेवायला येणार असतील . "
"असूदे , चला आपण सुरुवात करूया. वेळ वाया नको जायला. "
" हो ना , सूरज डूब गाय ही अब हाथमे जाम होना ही चाहिये "
" अहो महाराज , घशाखाली उतरायच्या आधीच राष्ट्रभाषेत पोचलात की."
" छे छे , घशाखाली घोट उतरला की मग डायरेक्ट साहेबाच्या भाषेत हा , "
" ठीक आहे कोणी कोणती पण भाषा वापरू दे , आधी सुरुवात तर करूया."
"काय घेणार?"
" मी बिअर."
"अरे थंडी केवढी पडली आहे . आणि बिअर कसली घेतो?"
" नाही , गेली कित्येक वर्षे मी बिअरच घेतोय."
"ओके ओके. तू घे बिअर. बाकीचे काय? रम ओढायची का?"
"नकोरे , आताचा सिझन म्हणजे व्हिस्की चा."
"अरे तू अमेरिकेतून येताना आणली की नाही एखादी ?"
"नाही रे, फार घाई झाली. "
"असूदे , मागच्या वेळी अन्लील्या ब्लेक लेबलची अजून आयवान येते."
" आज आपली अरसी च बरी. बोलाव त्या वेटरला."
" एक नीप आरसी. अरे सोडा कुणाला? ओके. एक सोडा आणि बर्फ पण आण. आणि मंचींग ला काय देणार?
शेंगदाणे बोईल दे. फरसाण देणार का नुसती शेव? नाहेतर अस कर, दोन बोईल एग पण आण. "
" अरे त्याला विचार भजी आहेत का? "
"तो म्हणतो पालक पकोडे आहेत "
"नको पिताना भजी म्हणजे कांदा भजीच हवीत. "
"काय असेल ते आणू दे."
"खूप दिवसांनी बसतोय नाही "
" अरे गेल्या महिन्यातच बसलो होतो की."
" अरे तो हा भेटला होता. पार डाऊन आहे."
"काय होणार, आयुष्यात फक्त पीत राहिला .आता कोण विचारत नाही. त्यातून त्याचा तो बेवडा दोस्त गचकला तेव्हा पासून एकटा पडलाय."
"जावू दे यार, एक बर मिलती है ये जिंदगी. तुम जी लो और पी लो . वरना मरते वक्त पछताओगे "
" वा बा , बहोत खूब , बढिया कहा गालिब."

"ए सगळे ग्लास सारखे भर. मापात पाप नको"
"निदान सुरुवातीला तरी."
"चिअर्स"
" ए, सगळ रिपीट कर."
"चिअर्स, सगळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी"
"चिअर्स"
"चिअर्स"
"चिअर्स"
"चिअर्स"
"अरे ते बघ दोघे आले. अरे काय बरोबरच आलात का "
" नाही, इथेच बाहेर भेटलो."
"गुड इविनिंग.एवरीबडी.गुड इविनिंग.एवरीबडी"
"गुड इविनिंग. गुड इविनिंग . गुड इविनिंग"
"अरे कस काय चाललाय? "
"गुड गोईंग"
"बोला काय घेणार?"
"आम्ही नाही पिणार."
"अरे ते नाही. माझा, तुझा काही? की सूप घेणार."
" सूपच घेवू . मग तोवर जेवायची वेळ होईल."
"ओके ओके"
अरे जेवणाची ऑर्डर आताच देवू . नाहीतरी यायला वेळ लागेलच."
" ठीक आहे . पण जास्त नका मागवू. संपत नाही."
"अरे तुम्ही यातलं काही खा तोवर."
"नको त्यांना आग्रह नको. ते दीक्षित वाले आहेत."
"अरे तसं नाही. आपला आवडता सिद्धांत आहे. दारू वाईट नसते. वाईट असतो तो चकणा. त्यामुळे दारूबरोबर खायचेच तर चीज किंवा फार तर बोईल्ड एग. हे फरसाण ,शेंगदाणे एकदम बेकार."
"होय गुरुदेव. आपण प्याल तेव्हा लक्षात ठेवू. आम्ही सामान्य जन या चकन्यावरच खुश आहोत"
"ओके ओके"
"अरे वा , जेवण आले की. "
" अजून एक नीप ओढूया का जेवता जेवता?"
" सगळे म्हणतील तसं..तुला बिअर पण मागवायची का अजून?"
"नको. जेवताना नको."
" वा वा , मजा आया."
" पण तोडी गम्मत करूया. "
" ए वेटर, तेरे साब को बुलाव."
" क्या हुंआ साब?
" ये टेस्ट उतना अच्छा नही था. लास्ट मे हम आयेथे तो बढिया था. और आते आते ठंडा भी हो गया "
"सोर्री सर. अगली बर ऐसा नाही होगा."
"अरे अगली बार आयेगा कौन?"
" ऐसा मत करो सर, बिल मे कम करते है?"
"बिल का सवाल नही. सर्विस अच्छी चाहिये."
"ओके सर ओके सर"

"च्यायला त्या वेटरशी कसला भांडत होतास ? वाटलं याला जास्त झाली की काय?"
"मला काहीच प्रोब्लेम नव्हता. तुम्ही सगळे म्हणालात म्हणून आवाज चढवला जरा."
"अरे पण किती? सगळे पाहत होते ना?"
" अरे इथे सगळेच बेवडे , कुणाला काही वाटत नाही."
"ओके ओके पण मजा आली. आता एकदा ओव्हर नाईट बाहेर जाऊ. म्हणजे भरपूर पिउन तर्राट व्हायचं. घरी जायचं टेन्शन नाही"
" चालेल, पुढच्या वेळी इथेच बसू आणि बाहेर जायचं ठरवू.:
"ओके ओके."
"गुड नाईट एवरीबडी."
"गुड नाईट . फिर मिलेंगे"

अनिल जोशी 
१८.०१.२०२०.
(आपल्या प्रतिक्रिया नावासह द्याव्यात) 













Comments

  1. वा! आबा अगदी मस्त! बारीक बारीक संभाषण नोंदले आहे. फार छान!

    ReplyDelete
  2. हि तर आपलिच पार्टी...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती