लग्न -एक खुशीने केलेला आतबट्ट्याचा व्यवहार
मागच्या आठवड्यात एक चर्चा सोशल मिडीयावर सुरु होती की लग्न कशाला करायचे?
त्यावर बरीच चर्चा उलट सुलट सुरु होती. एक मुद्दा त्यात असा होता की मुले जन्माला घालणे म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता आहे का? या सगळ्या चर्चेत लग्न संस्था ही आपल्या व्यक्तीमत्वाचा, अभिव्यक्तीचा संकोच करते असा सूर होता. एकूण विवाहसंस्थेची बंधने जाचक वाटत आहेत असे जाणवले. यात एक गोष्ट नक्की आहे की मुलींची नोकरी, करिअर ,संसार , मुलांचे संगोपन ,शिक्षण या सगळ्यात प्रचंड दमछाक होते आहे. सद्याच्या स्पर्धात्मक जगात नोकरी ही सोपी राहिली नाही. ती अधिक वेळ मागते , त्यात तणाव वाढले आहेत. कमचे तास किती यावर बंधने नाहीत आणि घरी गेल्यावर पण कॉल असू शकतात.
गेल्या जानेवारीतच शेवटच्या दिवशी एक ओर्डर फायनल करायची होती. वाटाघाटी सुरु होत्या. रात्री साधारण १० नंतर फायनल झाल्यावर ऑर्डर प्रोसेस करायला घेतल्यावर संगणकीय समस्या उभी राहिली. पावणे अकरा वाजता संबंधित मुलीच्या घरी फोन करून तिला उठवले , तिचा लेप टोप उघडायला लावला व ती समस्या निराकरण करून घेतली तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते.हा सगळा प्रकार जरा अमानुष वाटणारा होता. जरी दुसर्या दिवशी याबद्दल सर्वांचे कौतुक झाले तरी पण नवीन तंत्रज्ञानामुळे व्यक्तिगत आयुष्यावर मोठे आक्रमण झाले आहे हे भीषण वास्तव आहे. त्यामुळे मुलींना लग्न,कुटुंब,मुले या समस्या वाटू लागल्या आहेत. त्यातून असे प्रश्न विचारले जातात लग्न कशासाठी? मुले कशाला हवीत? कुणी तरी आपलं जीवाभावाच असाव असं वाटत तर सध्या मोकळ्या समाज व्यवस्थेत मित्र जास्त जवळचे असतात, मग नवरा कशाला? त्यामुळे घरून दबाव आला की किंवा अन्य कारणाने मुली लग्नाला तयार होतात तेव्हा त्या तिशीला आलेल्या असतात आणि मुलाचा विचार लगेच नको असे म्हणत मुल होई पर्यंत पस्तीशी येते.आणि तोवर आई वडिल किंवा सासू सासरे यांची मदत होईल तर त्यांची वये वाढलेली असतात.
हा सगळा तोल साधायचा तर चांगला जोडीदार, विश्वासू मोलकरीण व स्वयंपाकी बाई, चांगले पाळणा घर किंवा सासूसासरे /आईवडील यांचा भक्कम आधार या गोष्टी अपरिहार्य झाल्या आहेत . अर्थात या सगळ्यांचा मेळ घालणे सोपे नाही.
या सगळ्या गोष्टींचा विचार करता विवाह संस्थेचे महत्व काय तर आज बाजारात सर्व पदार्थ बाहेर विकत मिळत असताना आपण स्वयंपाक करून जेवतो आणि बदल म्हणून हॉटेल मध्ये जातो.
तसेच लग्न कशाला तर मी एकदा एक मुद्दा मांडला होता की जर राहायला घर हवे आणि त्याचे भाडे जर गृह कर्जाच्या हप्त्यापेक्षा कमी असेल तर स्वत:चे घर घेण्या ऐवजी भाड्याच्या घरात राहावे. त्यावर कुणी म्हणाले पण हप्ते संपले की घर आपलेच होते. तरी पण आपल्या गुंतवणुकीवर जे व्याज मिळू शकले असते ते न मुल्ण्याचा तोटा ( Notional Loss ) असतोच. तरीपण भरपूर हप्ते भरून आपण घर घेतोच बहुतेक लग्न संथेचे तसेच असावे. कागदावर तोटे खूप दिसले तरी असे काही तरी असते की त्या तोत्यांकडे दुर्लक्ष करून हा आतबट्ट्याचा व्यवहार केला जातो.
अनिल जोशी
१९.०१.२०२०
(आपल्या प्रतिक्रिया कृपया नावासह द्याव्यात )

प्रत्येक वेळेस हा आतबट्ट्याचा व्यवहार असेलच असे नाही.
ReplyDeleteअडचणींवर एकत्रित मात करण्याची तयारी असेल तर बरेच प्रश्न सुटतात.
निवृत्तीनंतरचे सहजीवन हा आणखी एक मुद्दा आहे.
हेमंत
लग्न हा कुटुंब संस्थेचा पाया आहे..सगळ्या गोष्टींची किंमत फक्त आनंद आणि पैसा यात नाही होऊ शकत.
ReplyDeleteलग्नाने दोन कुटुंब जोडली जातात..काका , काकू , मामा मामी , दिर वहिनी ,सासू सून सासरा जावई अशी बरीच नाती नव्याने जोडली जातात.समाजात आपली वेगळी ओळख निर्माण होते..
समाजमन , समाजमान्यता , कुणीतरी आपल्याला आपले म्हणणे , कोणासाठी तरी आपले होऊन जगणे ..ही माणसाची मानसिक गरज आहे...नोकरी हे त्यासाठीचे साधन आहे...साध्य आणि साधन याचा समतोल साधला की संसाराची कसरत कमी त्रासदायक होते..
साधनांना साध्याच्या वरचढ होऊ द्यायचे नाही..हे मात्र साधले पाहिजे..
आणि मुख्य म्हणजे सुख समाधान शांती मिळवायची असेल तर तडजोडीची सवय लाऊन घेणे ..हे महत्वाचे..
सगळ्याच गोष्टी आपल्याला कायम साध्य होतीलच असे नाही..
माझी आई नेहमी म्हणायची ," जे मिळाले ते आपले होते, नाही मिळाले ते देवाचे"
हे खूप अवघड आहे ...पण आपल्या कुटुंबासाठी..अशक्य नाही..प्रत्येक जण ही कसरत करतो..मी फक्त शब्दात मांडली..
धनश्री जोशी