शिकवता शिकवता
आपण तशी शिकायला सुरुवात जन्मापासूनच करतो. पण रुढार्थाने शिकायला सुरुवात होते ती शाळेत. पण माझ्या बाबतीत शिक्षण घरीच आईने सुरु केले. कारण आम्ही गावाबाहेर राहायचो आणि शाळा दूर होती. तेव्हा बालवर्ग किंवा शिशु शाळा नव्हती तर थेट पहिली. मला वाटत मी फक्त परीक्षेलाच शाळेत गेलो आणि पहिली पार पडली. नंतर मात्र काही कुटुंबे बदली होवून आली आणि मग शाळेत जाणारी एक टीम तयार झाली आणि सर्वांना शाळेत न्यायला आणायला शासकीय बैलगाडीची व्यवस्था झाली आणि शाळा सुरु झाली . प्राथमिक शिक्षण विरार, बसणी,नागपूर इथे झाले आणि या सर्व वर्षी वर्ग शिक्षक शिक्षिका सगळे विषय शिकवत असत. प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक हे माध्यमिक शाळेत सुरु झाले. त्यामुळे प्राथमिक शिक्षक हे बहुरूपी म्हणजे सगळ्या भूमिका वठवणारे असत तर प्रत्येक विषयाचे वेगळे शिक्षक म्हणजे आपापली भूमिका करणारे वाटत.
माझे पहिले माध्यमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हाय स्कूल. आमचे वर्गशिक्षक होते ज लु पाटील सर. हे नेहमी पांढरा खादीचा शर्ट घालत. ते मराठी शिकवायचे. ते साभिनय शिकवायचे. त्यामुळे विषय रंगतदार होत असे. हस्त कला विषयात ते सुत कताई शिकवत.कापसाचे पेळू करणे , टकळी फिरवून सुत काढणे वगैरे. अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी असल्याने त्यांच्या कार्याचा व विचारांचा पगडा होता. ते आम्हाला स्काउट ला पण शिक्षक होते. गुजराथी नावाचे शिक्षक शास्त्र व हिंदी शिकवत तर बोरकर म्हणून सर होते ते इंग्रजी शिकवत. आज ५३ -५४ वर्षांनी एवढेच आठवते. एक देवरे म्हणून शिपाई होता तो साने गुरुजींच्या सहवासात असायचा. अमळनेरला १९४२ च्या आंदोलनात त्याला गोळी लागलेली खुण दाखवायचा.
नंतर मुंबईला बदली झाली आणि त्यावेळच्या किंग जॉर्ज व आताच्या राजा शिवाजी विद्यालयात मी दाखल झालो. इथे पुरी ४ वर्षे होतो त्यात अनेक शिक्षक आठवतात. झोकून देवून मराठी शिकवणारे काणेकर सर, कडक असलेले पण छान गणित शिकवणारे कुष्टे सर, शास्त्र शिकवताना वर्गात तन्मयतेने प्रयोग करून दाखवणारे रारावीकर सर, शिवाय करंदीकर, ओक,नाईक,मोकाशी देसाई या शिक्षिका तर खटावकर धनावडे,ठक्कर,असे सर. सगळ्यात लक्षात राहिलेले सर म्हणजे हसबनीस सर. कधी ऑफ तासाला ते आले तर ते छान गोष्टी सांगत असत आणि त्यामुळे मुले ते आले की खुश असत. असेच एकदा ते आमच्या वर्गावर आले व मुलांनी गलका सुरु केला . तेव्हा ते म्हणाले आज गोष्ट नाही पण गम्मत सांगणार आहे. तेव्हा अरब इस्राएल युद्ध सुरु होते. मग त्यांनी फळ्यावर नकाशा काढून या दोन्ही देशांची भौगोलिक स्थाने , सभोवतालचे देश यांची सगळी माहिती देवून एकूण युद्ध डोळ्यांसमोर उभे केले होते.
पुढची दोन वर्षे डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिरात सगळेच शिक्षक पोट तिडीकेने शिकवणारे होते. गणित शिकवणारे विद्वांस सर, मराठीच्या केळकर बाई, झोकरे सर ,पावसकर बाई, निगुड्कर व वैद्य बाई. विशेष म्हणजे भागवत सर व बाजपेयी सर. भागवत सर शास्त्र तर उत्तम शिकवायचेच पण एकदा स्नेह्साम्मेलानाची तयारी सुरु होती आणि नव्याने आलेल्या कट्यार काळजात घुसली नाटकातील एक गाणे मित्र श्रीकांत केळकर म्हणत होता. त्यातील नै नैन और या अंतर्यात एकताल वाजवताना गडबड होत होती. तेव्हा भागवत सर म्हणाले यातील एक मात्रा गाळ. म्हणजे धिन धिन धागे त्रिक धी ना ऐवजी धिन वर जोर देवून तो थोडा वाढवायचा म्हणजे धीन धागे त्रिक धिना असे करून पहा आणि ते जमले.हे आम्ही संमेलनात सदर नाही केले पण शास्त्र शिकवणारे सर संगीतात पण मार्गदर्शन करू शकतात याचे आश्चर्य वाटले. बाजपेयी सर तर विद्यार्थी प्रिय सर. हिंदी, नागरिक शास्त्र, व्यवसाय मार्गदर्शन .एनसीसी असे विषय ते हाताळत. आम्हाला ११वीला पहिल्या सहामाहीत त्यांनी फक्त कविता शिकवल्या . एकही धडा नाही . आम्ही त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले मला त्याची काळजी आहे. आणि मग दिवाळीच्या सुटीच्या आदल्या दिवशी म्हणाले दिवाळी झाली कि दुसर्या दिवशी सर्वांनी सुटी असली तरी ११ वाजता शाळेत यायचे. एक धडा सुरु करणार आणि संपेपर्यंत थांबायचे. अशा तर्हेने रोज एक असे सगळे धडे सुटीत घेतले .कारण तास ३५ मिनिटांचा असायचा तर या पद्धतीने दोन अडीच तास सलग एक धडा शिकवून व्हायचा.
शिकवता शिकवता आम्हाला या शिक्षकांनी खूप काही दिल ते पण केवळ कर्तव्य न मानता जबाबदारी मानून. आता कॉलेज मधील शिक्षकांविषयी पुन्हा केव्हा तरी.
अनिल जोशी
२३.०१.२०२०
(आपल्या प्रतिक्रिया कृपया नावानिशी द्याव्यात )

हेच खरे शिक्षण ,👌🙏
ReplyDeleteIt is but we ignore
ReplyDelete