कट्टा

कट्टा

आज माझे स्नेही किस्त्रीम चे संपादक विजय लेले यांचा फोन आला . बर्याच दिवसात भेट झाली नाही म्हणून भेटू असे म्हणाले . पुढे सहाजिकच पश्न आला ते कुठे भेटायचे? अशा भेटी साठी एखादा अड्डा लगतो. जिथे मनसोक्त गप्पा मारायची सोय असते , मधून मधून चहा मिळावा आणि शक्यतो ते जागा बंदिस्त नसावी. 
पुण्यात आल्यावर असा पहिला अड्डा होता तो बालगंधर्व परिसरातील कॅफे टेरिया . तिथे छान गप्पाष्टके रंगायची. पुढे पुढे तेथील गर्दी वाढल्याने मग आम्हाला शोध लागला तो  डीलाईट चा. फर्गुसन कॉलेज रस्त्याच्या सुरुवातीलाच उजव्या बाजूला आतल्या बाजूला हे कॅफे होते. याची कॅफेची जागा छोटी पण बाहेर मोकळी जागा भरपूर. तिथे अनेक ग्रुपचे अड्डे जमायचे. सळसळत्या तरुणाईचा अविष्कार तिथे पाहायला मिळे .नाटकांचे, राजकीय ,पत्रकार असे अनेक लोक तिथे वेळात वेळ काढून येत व फ्रेश होवून जात. आमची साप्ताहिक सुटी गुरुवारची असल्याने आम्ही बुधवारी संध्याकाळी तिथे जमून वीकेंड चा श्रीगणेशा करत असू. आम्ही त्याला आनंदमठ असे नाव दिले होते. त्यावर एक कविता पण केली होती.
आनंदमठ 
नवकाव्य
रात्री निघायचं
इन्कम टेक्स
येतो बर का
मी आहेच की
पंप्या
फाडली की
तरी वाटलंच
चहा घे
मधे ठेव ना
पडली?
दोन इकडे दोन तिकडे
त्याचं हेड ऑफिस इथे आहे
तुमचे ते हे ......
लव्ह स्टोरी
तू सुपारी दिली?
मला वाटत
बेडरूम मध्ये चार
ए भडव्या हल
किती जवळ घेतलं बघ
फ sssटाsss क
मार मला मार 
मला शिकवू नये
ताप नाही 
एक विषय सुटला की खल्लास
प्यार मांगा है तुम्हीसे
(यातील एकही शब्द माझा नाही तर विविध टेबल वरून आलेले हे शब्द आहेत)ही १९७८ मधील घटना आहे.

पुढे पुढे तिथे येणारी मानली गप्पाष्टके इथे जमवत पण चहा शेजारी रूपालीत जावून पीत. परिणाम व्हायचा तोच झाला . कॅफे दिवाळखोरीत जावून बंद पडले.
त्यानंतर आमचा अड्डा अलका टोकीज समोरील दरबार मध्ये जमू लागला कारणाकारणाने. तिथेच विख्यात चित्रकार चंद्रमोहन शी परिचय झाला. काही काळ मी व लेले तिथे भेटत असू. ते ही बंद पडले. मग शेजारील रिगल मध्ये अड्डा हलवला. आता इमारतीच्या दुरुस्तीसाठी ते पण बंद आहे.
एकदा आमच्या संगीतप्रेमी ग्रुप ने IMDR कॅन्टीन दाखवले. काय जागा आहे ही. गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेच्या शेजारी. पत्र्याच्या शेड सारखे बांधकाम पण सभोवती मोठा परिसर, वाहन उभे करायला मुबलक जागा. चांगले खाद्यपदार्थ माफक दरात व किती पण वेळ बसा. अड्डा यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करणारे हे ठिकाण. लेले तर कधी कधी सकाळी एका कोपर्यात बसून गरम उप्पीट खात लिखाण करत असत. आज पण तिथेच गप्पा झाल्या. एकाच इच्छा या ठिकाणाला कुणाची नजर लागू नये व हा अड्डा असाच राहावा. आतला उत्साह व उर्जा इथे असते की आपण ईथे आल्यानंतर आपले वय २०-२५ वर्षांनी कमी झाल्याचा अनुभव सर्वांना येतो.

अनिल जोशी 
०४.०१.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी) 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती