..........मग लिहायला सुरुवात होते
..........मग लिहायला सुरुवात होते
शहरात राहणार्यांना नेहेमीच आपल्या गावाबद्दल एक आस्था, ओढ असते. वडिलांच्या सरकारी नोकरीनिमित्ताने अनेक ठिकाणी वास्तव्य झाल्याने आत कुठेतरी मूळ गावाबद्दल विशेष भावनामनात असावी. कारण माझा ना तिथला जन्म , बालपण वा शिक्षण झालेले.
पण बरीच गवे शहरे पाहून फिरून झाल्यानंतर आपलं गाव हे वेगळंच आहे याची कुठेतरी नोंद मनात होत होती.गावी घर असल्याने
जाणे होत असे. पण एक जाणीव अशी होती की गावी जाणं हे कष्टप्रद होतं. लहान पणी प्रवास कसा होईल वगैरे गोष्टींची काळजी वडील करत असत. म्हणजे आदल्यादिवशी मुंबईत येणे, मग सकाळी बोटीत बसणे, रात्री कधीतरी बोट रत्नागिरीला पोचल्यावर स्पेशल अशा सारवट (बंदिस्त) बैलगाडीतून खाडीपर्यंत प्रवास, मग होडीतून खाडी पार केल्यानंतरपुन्हा बैलगाडीतून घरापर्यंत पोचायला मध्यरात्र
व्हायची. पण तो प्रवास अद्भुत वाटत असे. पुढे बोट बंद झाली पण खाडी पार करणे होतेच. १९८१ मध्ये खाडीवर पूल झाला आणि गावी पोचणे सुसह्य झाले.
गावी जाण्याचा आणखी एक घटक म्हणजे अनेक आप्तेष्टांचा सहवास व भेटी गाठी. त्यातून गणपती उत्सव असेल तर मग पर्वणीच. हे सगळं मनात खूप भरून आल्यानंतर १९८५ च्यादिवाळी अंकात पितामह म्हणून कथा लिहिली. घराशेजारचा जुना पिपळवृक्ष हा त्या कथेचा नायक होता. पुढे १५-२० वर्षे उलटली. बरेच बदल घडले पण ते गाव, घर व तो उत्सव स्वस्थ बसूदेत नव्हता. मग २००६ मध्ये प्रथमच कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि पुनरागमनायच ची निर्मिती झाली. तिच्या २ आवृत्या निघाल्या. आणि ज्यांनी
ज्यांनी ती वाचली त्यांना ती खूपआवडली.
मनात एखादी भावना, एखादा विषय, घटना जेव्हा घर करते तेव्हा तिचा निचरा करता करता लिहायला सुरुवात होते
.
अनिल जोशी
०६.०१.२०१२०
(कृपया प्रतिकृया नावासह द्यावी.)
अगदी खरय, अनिल.
ReplyDeleteजेव्हां एखादी भावना, घटना, विचार अथवा विषय मनात (खऱ्या अर्थाने) घर करतो तेव्हा ती व्यक्ती लिहित नसते तर ती भावना / विचार / विषय च त्या व्यक्तीकडून स्वतःचं प्रकटीकरण करून घेत असते. ही गोष्ट अनेक लेखक,कवी ह्यांनी सांगीतली आहे. संगीताच्या बाबतीतही हे खरे आहे. OP नैय्यर ह्यांच्याकडून मी एका मुलाखतीदरम्यान असं ऐकलं की या गाण्यांच्या चाली, संगीत इ. मी नाही दिलं तर कोणत्या तरी दैवी शक्तीने हे माझ्याकडून करून घेतलं आहे. ही गाणी कशी झाली ह्याचं मलाच आश्चर्य वाटत आलं आहे.
पण मूळात विचार, विषय, भावना रूजणं, तिनं मनात घर करणं महत्वाचं आणि आवश्यकही. - अवी
अगदी खरं आहे.
ReplyDeleteआपले लिखाण नेहमी प्रमाणे ..सहज. .त्यामुळे ओघवते..
धनश्री जोशी