हा खेळ आकड्यांचा

आज संसदेत सन २०२०-२१ चा अर्थ संकल्प सादर झाला. केंद्रीय वित्त मंत्री यांनी सादर केलेला तसा दुसरा पण पूर्ण आर्थिक वर्षासाठीचा पहिला आर संकल्प . नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जुलै महिन्यात त्यांनी उर्वरित आर्थिक वर्षासाठी पहिला अर्थ संकल्प सादर केला होता. सुमारे पावणे तीन तास त्यांचे भाषण सुरु होते व सुटी असल्याने ते पाहता आले. ज्या चौकटीत त्यांनी हा अर्थ संकल्प मांडला त्या चौकटीचे त्यांनी पूर्ण विश्लेषण केले. व ते करतांना विविध क्षेत्रांसाठी काय काय तरतुदी सांगितल्या. नंतर यात काय काय सुचवले आहे ते विषद केले. ( Budget Proposals) .त्यांचे पूर्ण भाषण हे अभ्यासपूर्ण होते व सर्व सदस्य ते मन लवून ऐकत होते (तुरळक अपवाद वगळता) असे दिले. परंत सगळे अप्रत्यक्ष कर हे GST ने नियंत्रित होत असल्याने त्यांचा अर्थसंकल्पात समावेश नसतो. त्याच प्रमाणे पेट्रोल व तत्सम पदार्थांचे दर रोजच बदलतात. त्यामुळे  हा अर्थ संकल्प  प्रामुख्याने निधी वितरण करणारा असतो. आणि प्रत्यक्ष करात वरचे वर बदल होत नसतात. त्या मुळे अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू महाग होणार कोणत्या वस्तू स्वस्त होणार हे ठरत नाही. पण एकूण किती तूट अपेक्षित आहे यावरून अंदाज लागतो. कारण जर तूट जास्त असेल तर महागाई वाढते .
त्या मुळे या निमित्ताने एक आठवण येते. प्रत्येक अर्थ संकल्पावर बोलताना कै.मधु दंडवते नेहेमी म्हणत -
हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोनार आहे.
त्यामुळे बव्हंशी प्रतिक्रिया ह्या राजकीय भूमिकेनुसार असतात. अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया या कमी असतात.
या अर्थसंकल्पात विविध तरतुदी सोबत आयकरात १५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणार्या करदात्यांसाठी दारात कपात सुचवली आहे.शिवाय परकीय गुंतवणूक दारांना मिळणाऱ्या व्याज दरात सूट सुचवली आहे.
त्यांनी असे म्हटले आहे की आर्थिक वृद्धी दर हर GDP च्या १०% राहील असा अंदाज आहे.या व अशा काही बाबतीत विरोधकांनी नापसंती दाखवली.
पण शेवटी हा एक घटनात्मक उपचार आहे. कारण नंतर पुरवणी मागण्या येतात व प्रत्यक्ष उत्पन्न व खर्च यात तफावत येतेच. तरीपण सरकारचे धोरण व योजना यांचे प्रतिबिंब यात परावर्तीत होत असल्याने का जरी आकड्यांचा खेळ असला तरी महत्वाचा असतो.

अनिल जोशी 
०१.०२.२०२०.
(कृपया आपली प्रतिक्रिया स्वत:च्या नावानिशी द्यावी)


Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती