विकृत मानसिकता
हिंगणघाट घटनेतील पीडित युवतीने आज आखेरचा श्र्वास घेतला. मन सुन्न करणारी ही घटना. सामान्य प्रतिक्रिया म्हणजे त्या नराधमाने जसे हाल करुन मारले व जाळले तशी शिक्षा त्या नराधमाला मिळावी अशीच होती. पण प्रचलित कायद्यातील तरतुदी षंढ म्हणाव्यात अशा आहेत. निर्भया प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा देऊन सुद्धा तिच्या अंमलबजावणी बाबत कायद्याचा कीस काढून ती शिक्षा लांबवणारे वकील या देशात आहेत.मग हैदराबाद घटनेतील आरोपींचा एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी जनतेला सिंघम वाटतात.
हे नक्की लक्षात आहे की कितीही आदळापट केली तरी निष्क्रियांचे रुदन आहे. माझी एक फेसबुक मैत्रिण निवेदा फडणीस हिने आपल्या भावना अचूक शब्दात वर्णन केल्या आहेत व वाचकाना सुन्न करणारा अनुभव दिला आहे.तिच्या परवानगीने ती खाली उद्धृत करतो.
तुझी ईच्छा असो नसो
अापलं तुझ्यावर 'लव' हाय..
तुझ्या मनाशी हमको लेन देन नाय
अपुनकी हाव बस तुझं दिसणं हाय...
तुझ्या होकाराची पर्वा करतंय कोण
ते तर गृहीतच धरलं हाय..
तू नाय म्हणून तर बघ
शस्त्र म्या हातातच ठेवलं हाय..
तुझी स्वप्न,तुझी अावड
समदं समदं घाल चूलीत..
अपुनकी अायटम तूच हाय
हेच माझ्यातल्या रावणाचं गुपित..
तुला असतील नाती गोती
अावडत असेल एखादा राजकुमार..
अपुनका नाता तो सिर्फ तुझसे
खड्ड्यात गेले मंग मायबापाचे संस्कार..
अात्मा-मन-ह्रदय हे असलं
थोतांड काय बी अापल्याला कळत नाय..
मी जाळलंय ते तुझं सुंदर थोबाड
ज्याचा नकार अापल्याला झेपला नाय..
अाता होईना का अपुनको कधी बी फाशी
जेलमें तो 'अारामसे' गिने मैने तेरे अाँखरी सांस..
मस्त झुंजवला तुझा रोम रोम मृत्युशी
अाता बसेना का माझ्या गळ्याला कवा बी फास..
माझी स्वप्नं अपूर्ण ठेवणार्या तुला
असा जिता सोडला असता काय?..
असंही अापण घाबरतो कोणाला
रस्त्यावर अाणून फोडायला,
अाता शिवबाचं राज्य थोडीच हाय...
-निवा
हे जरी सामान्यांचे रुदन असले तरी ही आग मनामनात धुमसतच राहील. आणि मग एन्काउंटर पोलिस नाही तर जनता करेल.
अनिल जोशी
Khare ahe.
ReplyDelete