दिल्ली निकालाचा अन्वयार्थ
पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा आम आदमी पक्षाने प्रचंड बहुमताने जिंगली त्या बद्दल त्यांचे अभिनंदन.लोकशाहीत लोकभावना ही महत्वाची.या मुळे भाजप समर्थक नाराज होणे व भाजप विरोधक आनंदी होणे स्वाभाविक आहे. सगळ्यांचे म्हणजे एक्झिट पोल,भाजप,ज्योतिषी,सट्टाबाजार सर्वांचेच अंदाज चुकले. अगदी आपला सुद्धा एवढा विजय मिळेल असे वाटले नव्हते. काल कॊंग्रेस नेत्यांनी मान्य केले की भाजपला बाहेर ठेवण्यासाठी आयत्या वेळी त्यांचा ५% मतांचा वाटा आप कडे वळवला आणि राजकारण म्हणून ते योग्य पाऊल होते.
काही दिवसांपूर्वी प्रकाश जावडेकर यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेव्हा त्यांनी सांगितले होते की आपला ४८% व भाजपला ४०% मते मिळतील असा अंदाज आहे. आणि भाजपला तेवढी मते मिळाली पण कॊंग्रेसने मते फिरवून आपला दणदणीत विजय मिळवून दिला. त्याच प्रमाणे नेहमी प्रमाणे बहुजन समाज पार्टीने सगळीकडे उमेदवार उभे करुन प्रभाव पाडलेला दिसत नाही. त्या मुळे भाजपला मतांचा टक्का वाढवून ५०% पर्यंत नेणे हाच एकमेव उपाय आहे.
या निमित्ताने एक मत असेही बोलले जाते की केंद्रात व राज्यात वेगळी सरकारे असली तर काय बिघडले. देशाचा संघीय ढाचा लक्षात घेता त्यात चूक काही नाही पण सद्यस्थितीत वेगळी सरकारे ऊठसूट केंद्रसरकारच्या निर्णयाना आव्हान देऊ लागली (पक्षीय राजकारण म्हणून) तर भविष्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो.त्यामुळे केंद्रात भक्कम सरकार हवे (ज्या बद्दल देशभर एकमत आहे) तसे त्या विचारांना समांतर जाणारी राज्यसरकारे हवीत. आणि प्रादेशिक पक्षांची तशीच धारणा असते. देशातील जनता या बाबतीत सजग आहे त्या मुळे फार काही काळजीचे कारण नाही.
Congress ne mate kashi फिरवली? नक्की काय केले? भाजपा ५० टक्के वर कशी पोहोचणार?
ReplyDeleteदेश भारत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे पक्ष उरले की निवडणूक सोपी होईल भाजप साठी. दुसरा पर्याय असंख्य निष्पक्ष उमेदवारांनी उभे राहायचे.
बरोबर बोललात....पक्षांना १००%जागा लढवायची सक्ती व मतदान सक्ती केली पाहीजे.
DeleteAAP has given some promises regarding free utilities, which the Delhi voter has accepted.
ReplyDeleteThese promises are unreal and can not be fulfilled based on the funds at Delhi government's disposal.
So the promises will not be fulfilled.
I wonder when the voter would stop believing in reckless promises made by politicians only to gain votes.
This comment has been removed by the author.
ReplyDelete