एके दिवशी अचानक
असाच उजाडतो एक दिवस
तसाच नेहेमी सारखा
गजर होऊन जागे होण्याचा
गजर बंद करुन
पुन्हा झोपण्याचा मोह टाळून
उठून चुपचाप आवरण्याचा
असाच उजाडतो एक दिवस
गडबडीत ऒफिसला निघण्याचा
बसमधे बहारदार तोडी ऐकण्याचा
द्रुत संपून तराणा सुरु होताच
तो बंद करुन लॆपटॊप उघडण्याचा
एकामागोमाग एक कामे उरकत
मधेच कॊफीचे घुटके घेत
मोबाइलवर मेसेजेस चेक करत
पुन्हा कामात बुडून जाण्याचा
नेहेमीच्या रुटीनमधे
दिवस संपता संपता
एखादा हवासा फोन घेताना
तो दिवस वेगळाच होतो
नेहेमीसारखा उजाडला तरी
आलेला नुसता फोन नसतो
असतात अनेक आठवणींचे
धूळ खात पडलेले अाल्बम
त्या काही रंग उडालेल्या आठवणी
काही काळाचा परिणाम
न झालेल्या आठवणी
फोनवर झालेली शब्दंची देवघेव
केवळ औपचारिक, निमित्तमात्र
आठणींना का कुठे वय असतं
वयाने जर्जर होतं ते शरीर
मन कधी म्हातारं होतं का
वय विसरायला लावणाऱ्या
असंख्य आठवणींचा मेवा
की मुरलेला मुरांबा
काहीही झालं तरी
असाच उगवलेला एक दिवस
अगदी स्पेशल बनून मावळतो
भले तो Valentine's Day असो
अनिल जोशी
१४.०२.२०२०
Nice.nice to see our group.
ReplyDelete