चांदणे शिंपित जा
भरत नाट्य मंदिर हे केवळ एक रंगमंदिर नाही तर नाट्य चळवळीचे केंद्र आहे. अनेक जुन्या नाटकांची निर्मिती करून ते आजच्या प्रेक्षकांना बघण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत . अनेक संगीत नाटकांची पण निर्मिती केली आहे. त्यातील अप्रचलित असे शिक्का कट्यार व मृच्छकटिक ही नाटके पाहण्याचा योग्य आला. यात प्रेक्षकांना नाटके पहायला मिळतात त्या प्रमाणे अनेक कलाकारांना संधी पण मिळते. याच मालिकेत मधुसूदन कालेलकर लिखित चांदणे शिंपीत जा हे नाटक पहिले. खरं तर कालेलकरांचं नाटक सध्याच्या काळात थोडे ऑड वाटते. हसू आणि आसू यांचा मिलाफ,पल्लेदार व आकर्षक संवाद हे त्यांचे बलस्थान. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पटकथा लेखक म्हणून झाली आणि त्या मुळे त्यांची नाटके पण त्या काळात खूप गाजली. त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी आणि सामाजिक अनेक विषय हाताळले.
उद्याचे जग हे त्यांचे पहिले नाटक. एकूण तीसच्या वर त्यांची नाटके रंगमंचावर आली. अपराध मीच
केला(नानावटी खून खटला) ज्यावर नुकताच एक चित्रपट पण येऊन गेला, दिवा जळू दे सारी रात, आसावरी, ही वाट दूर जाते, अबोल झालीस का, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शिंपीत जा, या घर आपलंच आहे , नाथ हा माझा, डार्लिंग डार्लिंग, हे फूल चंदनाचे, अमृतवेल, शिकार आणि माधव राव पेशवे यांच्या जीवनावरील ही श्रींची इच्छा ही काही नावे.
एका अर्थाने कालेलकर म्हणजे हुकमी यश देणारे नाटककार असा त्यांचा लौकिक होता.सहज भाषा व पकड घेणारे संवाद या मुळे ही नाटके गाजली. त्यांनी सुमारे ७५ वर चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या.१७ डिसेंबर १९८५ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर ते युग संपले असे वाटत होते पण अजून ३५ वर्षांनंतर कुणाला तरी त्यांची नाटके करावीशी वाटतात हे ही नसे थोडके.
नाटकाबद्दल काही लिहिण्या पूर्वी या नाटकाचे सुरेल असे शीर्षक गीत इहे देतो.
शीर्षक गीत
हे चांदणे फुलांनी
शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली
तारे निळे नभात
हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा
फुलत्या नव्या कळीस
ओठातल्या स्वरांना
का जाग आज आली
धरती प्रकाश वेडी
धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली
तो स्पर्श चंदनाचा
की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला
स्वप्नातल्या स्वरांचा
ती रात्र धुंद होती
स्वप्नात दंगलेली
धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली
मूळ तीन अंकी असलेले चांदणे शिंपीत जा हे नाटक दोन अंकी आटोपशीर करण्यासाठी दिग्दर्शक संजय डोळे यांनी खूप काटछाट केली. अर्थात तसेच्या तसे नाटक आता करणे सयुक्तिक होणार नाही . सर्व कलाकारांनी एक टीम म्हणून चोख कामे केली व प्रयोग चांगला केला. वीणा फडके, ज्ञानदा पानसे मोघे, अभिजित पोतनीस, गौरी पेंडसे, वृंदा पांगारकर,यशवंत कुलकर्णी, विशाल मार्कंडेय, दिलीप जोगळेकर ,शंतनू खुर्जेकर, आणि आनंद पानसे हे कलाकार होते. त्यात दिलीप जोगळेकर विमा एजंट च्या छोट्या भूमिकेत भाव खाऊन गेले तर दीनानाथ लाड ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा आनंद पानसे यांनी समर्थपणे साकारली. त्यांचा रंगमंचावरचा वावर, संवाद फेक या मागची त्यांची तपश्चर्या जाणवत होती. एकूण एका जुन्या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग सुखावून गेला.
अनिल जोशी
०३.०२.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी)

आनंद पानसे : मनःपूर्वक धन्यवाद अनीलजी!
ReplyDelete