ट ची गमत
मराठीत ट हे अक्षर फार गमती करते. ट म्हटले की आठवते टाळी . ती दोन हातांनी वाजते. दोन्ही हात तुमचे असतील तर टाळी वाजली पण एक हात आपला व एक समोरच्याचा असेल तर ती दिली असे म्हणतात. ळ चा इकार काढला की होतो टाळ. हे वाद्य आहे ते दोन्ही हातांनीच वाजते. वास्तविक याचा संबंध भक्तीरसाशी आहे पण उपहासाने याला कुटणे असेही म्हणतात . म्हणूनच असेल कदाचित त्याला जवळचा शब्द निर्माण होतो तो टवाळकी . आणि टवाळकी करणारे ते टोळभैरव म्हणजे रिकामटेकडे.आता जर ळ ऐवजी ल वापरला तर होतो टोल. हा आपला प्रवास जिकिरीचा करतो. पैसे व वेळ दोन्ही जातात.यापासूनच बहुधा टोलवणे हे क्रियापद झाले असावे. यात टाळण्यातली नकारात्मकता जाऊन खिलाडू वृत्ती येते. एखादे प्रकरण निकालात काढायचे नसेल तर ते इकडून तिकडे टोलवले जाते. याला टोलवाटोलवी म्हटले जाते. हल्ली एक
वाक्प्रचार जास्त वापरला जाऊ लागला आहे तो म्हणजे टोला लागवणे. कुणी दुसऱ्या बद्दल साधे विधान केले तरी त्याला टोला लगावला म्हंटले जाते. असे म्हटले की उगीचच मारल्याचा फील येतो. हे टोले लागवणे राजकारणात फार वापरले जतात. ह्याने त्याला टोला लगावला किंवा त्याने ह्याला टोला लगावला असे वृत्त दिले की पत्रकारांना दोघांमध्ये मारामारी लावून दिल्याचा आनंद मिळतो. वास्तविक ते एक विधान असते पण पत्रकार त्या विधानाचा टोला करतात.सतारीची तार छेडली की होतो तो टणत्कार . पण टण हे विशेषण ध्वनी संदर्भात घंटेच्या टोल्याचा जो आवाज निघतो त्याला पण वापरतात .तसेच ते गतिविषयक विशेषण पण आहे. म्हणजे टणाटण उड्या मारणे किंवा म्हातारी आणि भोपळा यांच्या गोष्टीतील भोपळा टुणूक टुणूक चालतो. गती विषयक शब्दांमध्ये टांगा हा एक सध्या दुर्मिळ झालेल्या वाहनाचे नाव आहे. आणि हे माणसाच्या पायांसाठी पण वापरले जाते. एका स्थूल अभिनेत्रीने आपले नाव टुणटुण असे ठेवले होते. वास्तविक ती उमादेवी या नावाने गायिका म्हणून प्रसिद्ध होती. पण तिच्या स्थूल पणाचा वापर सिनेमा वाल्यांनी विनोद निर्मिती साठी केला. असाच वापर मनोरामा नावाच्या अभिनेत्रीच्या स्थूलपणाचा पण केला. पण
म्हातारी आणि भोपळ्याच्या गोष्टीतला टुणूक टुणूक हा नाद छान वाटायचा.आणखी ध्वनी संदर्भातील विशेषण
म्हणजे टिमकी. ती सतत वाजवावी लागते. आणखी विशेषण म्हणजे टिव टिव. ही टिव टिव टिटवी करते. फार कुणी बाता मारू लागले की म्हणतात सारथी टिव टिव करू नकोस. टांगा टाकणे म्हणजे चालणे तार टांग मारणे म्हणजे फसवणे. टांग मारणे या सारखे टोमणे मारणे पण प्रसिद्ध आहे.
गणितात असतात ते टक्के आणि व्यवहारात जाणवतात ते टोणपे . पण टक्के आणि टोणपे हे दोन्ही शब्द बऱ्याच वेळेला जोड शब्दासारखे जोडीने वावरतात. सर्वमान्य शिरस्त्राण म्हणजे टोपी. पण या टोपीला वाक्प्रचारात आणले की संबंध फसवणुकीशी जोडला जातो. टोपी घालणे , याची टोपी त्याला घालणे वगैरे. पण टोपी उडवण्याचा संबंध रसिकतेशी जोडला जातो.
टाकणे हे आणखी एक विशेषण. ते अर्थाने फेकण्याचा जवळचे आहे ते अनेक अर्थाने वापरले जाते. म्हणजे दोन पेग मारूया याला समानार्थी दोन पेग टाकूया पण होते. शिवाय सध्या वापरात नसलेला एक लेखनसाहित्याचा प्रकार म्हणजे टाक.ट आणि क ही दोन अक्षरे वापरली की आणखी एक विशेषण तयार होते ते म्हणजे टकाटक. घड्याळाची होते ती टिक टिक .आणि एखादी गोष्ट टिकावी म्हणून केलेली ती टीका. यात टुकार गोष्टी जास्त असतात. तोंडाची सतत चालू असते ती टकळी. याच टकळीचा वापर पूर्वी कापसापासून सूत काढायचाय केला जायचा. याच अर्थाला जवळचे विशेषण म्हणजे टवळी. ट आणि क ने तयार होणारा शब्द म्हणजे टोक. यातून टोकदार, टोकाची अशी विशेषणे तयार होतात. लहानपणी ट टरबुजातला असं शिकवलं गेलं . ते टरबूज हल्ली फारसं दिसत नाही. पण ट चा टोमॅटो मात्र आपले स्थान टिकवून आहे . स्वयंपाकात होणारा त्याचा विविध प्रकारे होणारा उपयोग वादातीत आहे. टाकणे याच्या बरोबर जोडीने येणारे विशेषण म्हणजे टिकणे व शब्द टिकाऊ तर टिकली म्हणजे सध्याची स्टार आहे.
एवढ्या ट च्या गमती पाहिल्यानंतर निरोप घेण्यासाठी म्हणायचे टाटा . पण टाटा हे नाव भारतीय उद्योग जगात अग्रणी आहे. या नावाने मोठे औद्योगिक साम्राज्य उभे आहे. ज्यांनी आपल्या देशावर १५० वर्षे राज्य केले त्या ब्रिटन मध्ये सर्वात जास्त नोकऱ्या टाटा उद्योग समूहाने दिल्या आहेत. नुसता उद्योग नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये टाटांनी भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे टाटा म्हणजे निरोपाचा अच्छा आणि आदराने नतमस्तक व्हावे टाटांचे असे नाव.
अनिल जोशी
०४.०४.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.)

Takatak
ReplyDelete