काल ,आज आणि उद्या
स्वप्नरंजन हा एक चांगला विरंगुळा आहे. गतस्मृतींच्या क्षणांमध्ये आपण हरवून जातो.जसजसा काळ उलटून जातो तसे ते आठवणींचे रंग गहिरे होत जातात. आठवणी जितक्या जुन्या तितक्या त्या स्पष्टपणे आठवतात.
सन२०१३ मध्ये १९७१ मध्ये एस एस सी झालेले आम्ही ४२ वर्षांनी डोंबिवली येथे भेटलो. १९७१ मधेच मी पुण्याला आल्याने अगदी थोड्या मित्रांशी संपर्क होता पण असे सगळे भेटणार याचे अप्रूप होतेच. ती आठवण एका ग्रुप फोटोत बंदिस्त केली.त्यानंतर पुढे ५ वर्षे दार वर्षी गेट टुगेदर च्या निमित्ताने आम्ही भेटत गेलो. पैकी ३ वेळा डोंबिवली ला , एकदा पुण्याला तर एकदा खोपोली जवळ. पहिल्या गेट टुगेदर नंतर व्हाट्सअप ग्रुप झाला. संपर्क वाढला. पुण्यात आम्ही १२-१३ जण ठराविक काळाने भेटत गेलो. प्रत्येकाच्या घरी जाणे झाले. पहिल्या वेळी तर शाळेच्या मांडल्या सुटीत पुन्हा गेल्याचा फील आला होता.पण आताच्या भेटीत गत काळाचा उल्लेख कमी वेळा होतो. आता हा ग्रुप गत काळाच्या शिदोरीवर वर्तमानाचे भान जपतो आहे.
दुसरी आठवण आहे सन २०१२ मधील. सन २००० मध्ये टाटा मोटर्स मधून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर तेथील संपर्क कमी होत गेला. या कंपनी मधील एक हळवा कोपरा म्हणजे कलासागर. कंपनीने करिअर दिले तर कलासागरने सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध केले. त्या मुळे तेथील कार्यक्रम व कलाकार यांना मनात एक महत्वाचे स्थान आहे. कधीतरी भेट व्हायची पण या वर्षी संस्थेच्या स्थापनेला ४० वर्षे झाली म्हणून एक मोठा महोत्सव केला होता आणि त्या निमित्ताने सगळ्यांना भेटण्याचा योग्य आला. तसाच योग पुढे २०१७ मध्ये संस्थेला ४५ वर्षे झाली म्हणून छोट्या प्रमाणावर झालेल्या कार्यक्रमात आला. त्या कार्यक्रमाहून श्री विनायक पटवर्धन सोबत येत जुन्या आठवणीत हरवलो असताना पटवर्धन म्हणाला - मला नाही जुन्या आठवणीत रमायला आवडत. या मूड मध्ये हे थोडे विसंगत होते,
मी या वाक्याचा अनेक वेळा विचार करत होतो की असं जुन्या आठवणीत रमण बरोबर की चुकीचं?
हे खरे आहे कि उलटून गेलेला दिवस पुन्हा येत नाही. पण दिवस उलटणे म्हणजे फक्त तारीख बदलणे नव्हे. या दिवसात आपण फक्त श्वासोश्वास करत नाही किंवा फक्त अन्न पाणी घेत नाही. या दिवसाच्या अनेक क्षणांमध्ये डोळे अनेक गोष्टी पाहत असतात, कान अनेक ध्वनी ऐकत असतात. अनेक शब्दांची देवाण घेवाण होत
असते . शब्दांच्या माध्यमातून अनेक भावभावना व्यक्त-अव्यक्त होत असतात. शब्दांपलीकडे
शब्दांपलीकडच्या गोष्टी घडत असतात. काही जखमा असतात. त्यावर मीठ पण चोळले जाते तर त्यावर फुंकर पण घातलेली असते. या सगळ्या गोष्टी जसा दिवस मावळतो तसा आठवणींच्या रूपात मनाच्या कपाटात कुलूपबंद होतात.हे कुलूप जर निग्रहाने उघडले नाही तर आपण केवळ वर्तमानात जगू शकतो . पण बंद कुलुपाचे कुतूहल काय फक्त चोरांना असते? कधीतरी ते उघडले जाते आणि त्या आठवणी वेग वेगळ्या रूपात समोर येतात. मग हलकल्लोळ होतो.कधी आपण सुखावतो तर कधी दुखावतो. हे सगळे आपण त्या कपाटात वेळोवेळी काय जमा केले यावर अवलंबून असते.आजचा दिवस जगताना आधीच्या दिवसांचे जे संचित आहे त्याचा प्रभाव असतोच पण येणाऱ्या उद्याचे पण भान असावे लागते. आतापर्यंतचे दिवस गेले तसेच आज उगवलेला दिवस पण मावळणार असून उद्या नवीन दिवस उगवणार आहे हे माहित असते. उद्याची स्वप्ने सुद्धा डोळ्यांच्या पापण्यांवर असतात.आणि रात्री डोळे मिटले की पापण्यांवरची स्वप्ने गतकाळातील स्मृतींना रोखून धरतात. हे असे झाले कि छान झोप लागते. आजच्या घटना आणि सगळे घटित
आठवणींच्या कप्प्यात बंद होते आणि उरतात ती फक स्वप्ने. नवीन उगवणाऱ्या दिवसाची.
अनिल जोशी
०५.०२.२०२०
(कृपया आपल्या प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.)

Comments
Post a Comment