शेवटचा दिस गोड व्हावा
ऑफिसमधील एका सहकार्याचा निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ होता. नेहमी प्रमाणे स्तुतीपर भाषणे झाली . शुभेच्छा देऊन झाल्या . निवृत्ती नंतर च्या आयुष्याबद्दल त्याला खूप कुतूहल होतं. आता ऑफिस नाही त्या मुळे अनेक वर्षे मनात असलेल्या गोष्टी पूर्ण करता येणार होत्या, अनेक ठिकाणी प्रवास करायचा होता. सामान्यपणे बरीच वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्त होताना हीच भावना असते. तो म्हणाला होता तुम्ही सारे जण माझ्या समोर आहेत हे चित्र मी मनात जपून ठेवीन. ही आठवण मला ऊर्जा देईल. आणि शेवट करताना म्हणाला संतांनी म्हणूनच ठेवलंय-
याच साठी केला होता अट्टाहास
शेवटचा दिस गोड व्हावा
तसा आजचा माझा इथला शेवटचा दिवस गोड झाला.
पण संतांना अभिप्रेत असलेला शेवटचा दिवस हा मृत्यूचा होता. हा संतश्रेष्ष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे.
याच साठी केला होता अट्टाहास
शेवटचा दिस गोड व्हावा.
आता निश्चितेने पावलो विसावा
खुंटलिया धांवा तृष्णेचिया.
कवतुक वाटे जालिया वेचावे
नाव मंगळाचे तेणे गुणे .
तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी
आता दिवस चारी खेळीमेळी .
या अभंगात नेहमी प्रमाणे तुकाराम महाराजांनी जीवनाचे सार सांगितले आहे. समोर आलेल्या जीवनाला आनंदाने सामोरे जावे व जीवन सार्थकी लावावे. पण शब्दश: अर्थ घेतला तर मृत्यूचा दिवस गोड व्हावा असा निघतो. पण असा शेवटचा दिवस खरंच गोड होऊ शकतो का?
कारण बहुतेक वेळा मृत्यू हा वेदनादायी असतो.त्याच प्रमाणे जवळच्या नातलगांना व परिचितांना तो दु:खदायी असतो तर मग हा दिवस गोड कसा व्हावा?मृत्यू कधी कुणाला आणि कुठे येईल हे कुणीच सांगू शकत नाही. काही अपवादात्मक व्यक्तीना इच्छा मरण किंवा सहज मरण लाभते. एखाद्या आजारासाठी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे आणि तब्बेत ढासळत जावी. अशावेळी हॉस्पिटल मध्ये उपचाराच्या नावाखाली मरण यातना भोगाव्या लागतात हे जिवंत मरण . मग खरे मरण नंतर येते.
दुसरे जिवंत मरण म्हणजे हवा असून मृत्यू न येणे. आजार, परावलंबित्व व मरण येत नाही म्हणून मरणाची वाट पाहत जगणे हे पण जिवंत मरणच.अशा अवस्थेत जर कुणी पाहणारं असेल तर ते जगणं सुसह्य होत. आणि कुणालाच नकोसं होणं , किंवा घरात ठेवून घेणं शक्य नसल्याने वृद्धाश्रमात राहावे लागणे हे फार यातनामय आहे. कधी वृद्धाश्रमात गेलो तर मरणाची वाट पाहणारे असहाय रुग्ण म्हणजे जिवंत प्रेते वाटतात आणि हे पाहणं खूप कठीण असत. असच एका घरातील व्यक्तीला वृद्धाश्रमात ठेवायची वेळ आली तेव्हा सगळेच भाव विभोर झाले होते तेव्हा एक जण म्हणाले होते कि आपण जस याना इथे आणून
ठेवलं तसाच आपल्यला पण असंच आणून ठेवलं जाईल तेव्हा आपल्या मनाची ही तयारी पाहिजे.घरात करणारे असले तरी तब्बेत ढासळत जाते आणि उपचार निष्प्रभ ठरतात तेव्हा क्षणा क्षणाला मरत जगावे लागते. आपल्या विवाह संस्थेमुळे सोबत जोडीदार असेल तर हे सुसह्य होते अन्यथा वृद्धपकाळात गात्रे थकल्यावर आणि प्रकृती ढासळत असताना एकाकीपण आणखी क्लेशदायी असते. आपले आयुष्य किती हे आपण ठरवू शकत नाही त्यामुळे जे आयुष्य आहे ते जागावेच लागते. पूर्वी नशिबाने दीर्घायुष्य लाभत असे पण आधुनिक वैद्यक शास्त्रातील प्रगतीमुळे आयुर्मान वाढले आहे. पण हे वाढलेले आयुष्य निरामय नसते. त्यामुळे ठराविक वयानंतर आहारात औषधी गोळ्यांचा समावेश होतो.
दीर्घायुष्याचा एक शाप आहे म्हणजे अनेक प्रिय व्यक्तींचे मृत्यू पहावे लागतात.
त्यामुळे तुकोबा जरी म्हणाले तरी हा माणसाच्या जीवनातील शेवटचा दिवस गोड होणे खूप अवघड आहे. यातून मार्ग प्रत्येकाला आपापलाच शोधावा लागेल. ठराविक असे सूत्र नाही सांगता येणार. कदाचित प्रबळ इच्छा शक्ती आणि सकारात्मकता यातून मिळणारी ऊर्जा सहाय्यभूत होऊ शकेल.
अनिल जोशी
०६.०२.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी)

Anil shewti je tu lihle ahes prabal ichchashakti n sakaratmkta tech 100%khare ahe.ase mhantat jaisa sochoge waisa bnoge.hyacha anubhaw mi khuup ghetla ahe.so positive wicharch kela pahije.udas negative wicharani nirash hou naye.ase maze wichar,mla he jast patte.
ReplyDelete