आमच्या रेडिओची गोष्ट
आज माझे मित्र मकरंद करंदीकर यांनी Transistor चा जमाना ही पोस्टकेली. ती वाचून मला आमच्या Transistor ची आठवण झाली. त्यांनी म्हटले आहे की १९८० नंतर सहज कुठे ही नेता येईल असा हा रेडिओचा प्रकार जास्त प्रचलित झाला. ते बरोबर आहे कारण तेव्हा Transistorचा सर्रास वापर सुरु झाला. किमती पण खूप कमी झाल्या . पण माझी गोष्ट त्या आधीची आहे. १९६१-६२ च्या सुमारास आमचा Transistor आला. तेव्हा आम्ही विरार इथे राहत होतो . विरत हे पश्चिम रेल्वे च्या लोकल चे शेवटचे स्थानक होते. तेव्हा मुंबई हून दर तासाला लोकल सायची पण अगदी छोटे खेडे होते व तिथे वीज नव्हती. त्यामुळे रेडिओ घ्यायचा तर तो ब्याटरी वर चालणारा असयचा. तसा तो आणायला माझे वडिल मुंबईत खार येथील प्रसिद्ध वर्तक रेडीओ मध्ये गेले . तेव्हा त्यांनी GEC कंपनीचा Transistor घ्या असे सुचवले आणि आमच्या घरी या रेडिओचे आमच्या घरी आगमन झाले . त्या काळात सुद्धा तसा तो महागच होता म्हणजे रु.४०० इतकी किंमत होती. आणि हे नक्कीच सोयीचे होते .कारण वडिलांची बदलीची नोकरी असल्याने तो कुठे ही पटकन नेता येत होता. त्याच प्रमाणे पूर्वीचे रेडिओ हे सुरु केल्यानंतर वेळ लागत असे पण हा Transistor बटन दाबताच सुरु होत असे.
ही केवळ एक वस्तू नव्हती तर एक वेगळ विश्व घरात आल. रात्री आठच्या बातम्या, संगीत,श्रुतिका, कीर्तने , अशा अनेक गोष्टी घरात आल्या.
ह्याने आमची अनेक वर्षे साथ केली. पुढे एकदा एका विवाह प्रसंगी वर्तक रेडिओचे अनंतराव वर्तक भेटले तेव्हा यांना जेव्हा सांगितलं की तुम्ही दिलेला Transistor इतकी वर्षे छान चालू आहे.त्यावर ते म्हणाले की खर आहे आता अशा दर्जाचे उत्पादन होत नाही.
जेव्हा घरात टीव्ही चे प्रस्थ वाढले (१९८१) तेव्हा हा अडगळीत गेला.
त्यानंतर दोन वर्षांपूर्वी मी एक फिलिप्स या नामांकित कंपनीचा Transistorआणला पण त्याने ६ महिन्यातच राम म्हटला.

Comments
Post a Comment