रंग रंगीली और सुरीली मनभावन होली

Holi WallpaperPictures of holi with Radha Krishna

होळी म्हणजे मराठीत शिमगा. लाकूड फाटा व गोवर्या जमवून त्या पेटवून अग्नी निर्माण करायचा, त्याची पूजा करायची , नैवेद्य दाखवायचा व मनातील सगळ्या अप प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी बोंब मारायची, आपल्या पारंपारिक पुरण पोळीचा नैवेद्य हा ठरलेला.
हा सण उत्तरेत वेगळ्या प्रकारे साजरा होते. त्याला जोड दिली आहे  ती रंगांची.  त्या मुळे हा रंगोत्सव झाला . मनातील भाव भावनांना व्यक्त करायला हे फार सुंदर माध्यम आहे. होळीच्या दुसर्या दिवशी हा  सण साजरा केला जातो. याला धुळवड वा धुलीवंदन म्हटले जाते. आणि फाल्गुन वद्य पंचमीला आपण वेगळी रंगपंचमी खेळतो पण रंग आणि होळी यांचे मात्र अतूट नाते आहे.
पण या सणाचे छान स्वरूप संगीतात फार लोभस वाणे दिसते. ठुमरी सारखा होरी हा एक उपशास्त्रीय संगीताचा प्रकार आहे.
ग्रामीण आणि आदिवासीनी या सगळ्या सणाला लोककला आणि लोकसंगीताचे मध्यम दिले. फक्त होळी ऐवजी होरी असे त्याचे नामकरण झाले. या खेळला वापरली ती पारंपारिक राधा कृष्णाच्या प्रीतीची पार्श्वभूमी . तरुण सावळ्या कृष्णाला राधेच्या गौर रंगाचा हेवा वाटत असे. हा प्रकार शास्त्रीय व उपशास्त्रीय अशा दोन्ही संगीत प्रकारात प्रचलित आहे. या साठी धमार हा   प्रकार वापरला जातो.हा १४ मात्रांचा आहे. धृपद गायकांनी याचा पुरेपूर वापर केला व त्याला शुद्ध शास्त्रीय रूप पण दिले.धृपद गायक आपल्या गायनाची सांगता होरी ने करायचे. धमार जेव्ह्या सुगम अशा तालात गायले जायचे तेव्हा त्याला होरी असे म्हटले जायचे. हा गायन प्रकार हा संध्याकाळच्या तिसर्या प्रहरात गायला जातो. आरोह आणि अवरोह यात सगळे सात स्वर लावले जातात. गांधार आणि निषाद कोमल तर बाकी सगळे शुद्ध स्वर. होरी खेळत नंदलाल ही पारंपारिक रचना कृष्णाच्या लोककथा सांगतात. आणि काफी रागात तिचे सुंदर वर्णन करते.
काफी आपल्या भावनानी उद्दीपित होवून राज्वाद्याच्च्या सौदावर आपल्या प्रियकराच्या अंकावर त्याला बिलगून बसली आहे. निळ्या वस्त्रात ती सजली आहे तर रत्ना माणकांच्या अलंकारांनी सजली आहे. प्रियकराच्या हृदय कमळात तिची प्रतिमा साकारली आहे. लक्ष्मी पेक्षा लोभस असे हे तिचे रूप आहे. काफी खेरीज मिश्र काफी , खमाज ,शहाणा कानडा, सारंग, पिलू आणि अनेक मिश्र रागात ती गायली जाते. सामान्यत: १४ मात्रांच्या दीपचंदी तालात जरी ती गायली जात असली तरी त्रिताल,रूपक,झपताल, एकताल या तालांमध्ये पण गायली जाते. होरी मै खेलुंगी  उनसंग डटके जो पिया आये ब्रिजसे पलट के ही शोभा गुर्टू यांनी ठुमरी अंगाने गायलेली होरी केहेर्वा तालात आहे. नंतरच्या काळात तबल्यावर लग्गी लावून तिची रंगत वाढवली जाते.
राधा कृष्णाच्या प्रीती शिवाय वेगळ्या विषयांवर पण होरी अपवादाने आहेत. जसे की रम सिया फाग मचावत, मोके  डर देगी सारे रंगकी गगरिया, अब कौन गुणन सो मनावू होरी आली , पिया तो मानत नाही.
धृपद आणि धमार्चे जनकत्व ग्वाल्हेर चे महाराज मानसिंग तोमर (१४८६-१५१६) यांच्याकडे जाते. यातील भाव बावन व्यक्त करण्यासाठी अनेक चित्रे काढली गेली.
अशी ही रंग रंगीली आण सुरीली होळी . होळीच्या रंगांना स्वरांनी भिजवणारी.


Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती