शिंदे शाही


शिंदे हे तसे अनभिषिक्त सम्राट. महादजी शिंदे यांनी पेशवाईशी निष्ठा ठेवत आपले राजेपण जपले. दिल्लीचे तखत फोडण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. ग्वाल्हेर-गुना हा सगळा मुलुख त्यांनी राखलाच पण संपूर्ण मध्य प्रदेशात या घराण्याला एक इभ्रत व प्रतिष्ठा आहे. हे घराणे राजकारणात नेहेमी सक्रिय राहिलेले आहे. काँग्रेस बरोबर राजकारणात राहून त्यांनी समाजकारण पण केले. अपवाद म्हणजे विजयाराजे शिंदे यांचा. त्या जनसंघात व नंतर भारतीय जनता पक्षात कार्यरत राहिल्या. आणि त्यांच्या सहकार्यामुळे व सहभागामुळे जनसंघ व भाजप याना मध्यप्रदेशात सुपीक जमीन मिळाली. माधवराव शिंदे पण १९७१ मध्ये अपक्ष पण जनसंघाच्या पाठिंब्यावर लोकसभेत निवडून आले होते पण नंतर ते काँग्रेस मध्ये गेले. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे यांनी वडिलांचा वारसा चालवला. 
स्वतंत्र भारतात सिंधिया घराण्याचे काँग्रेस आणि भाजप दोघांशीही राजकीय संबंध राहिले आहेत. राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी जनसंघाकडून निवडणूकही लढवली होती. 1950च्या दशकात ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेचं चांगलंच प्रस्थ होतं. हिंदू महासभेला महाराजा जिवाजीराव यांनीदेखील संरक्षण दिलं होतं.
याच कारणामुळे इथे काँग्रेस पक्ष कमकुवत होता. काँग्रेस ग्वाल्हेर राजघराण्याविरोधात कडक पावलं उचलू शकतं, असंही त्याकाळी म्हटलं जायचं.
याच दरम्यान राजमाता सिंधिया यांची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतरच राजमाता विजयाराजे सिंधिया काँग्रेसकडून निवडणूक लढवायला तयार झाल्या होत्या.
विजयाराजे सिंधिया यांनी 1957 साली गुणामधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि हिंदू महासभेच्या उमेदवरावर मात केली. मात्र काँग्रेसशी त्यांचे सूर जुळले नाहीत.
1967 साली मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी पंचमढीमध्ये युवक काँग्रेसचं राष्ट्रीय संमेलन भरलं होतं. या संमेलनाचं उद्घाटन इंदिरा गांधी यांनी केलं होतं. राजमाता विजयाराजे सिंधिया याही या संमेलनात मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्रा यांना भेटायला गेल्या होत्या.
मध्य प्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार विजयधर श्रीदत्त म्हणतात, "राजमाता या भेटीत निवडणूक आणि तिकीटवाटपासंबंधी चर्चा करायला आल्या होत्या. द्वारका प्रसाद मिश्रा यांनी त्यांना दहा ते पंधरा मिनिटं वाट बघायला लावली आणि हेच त्यांना जड गेलं. मिश्रा यांनी महाराणीला त्यांची लायकी दाखवली, असा अर्थ विजयाराजेंनी घेतला. विजयाराजेंसाठी हा धक्काच होता.
"या भेटीदरम्यान विजयाराजे यांनी ग्वाल्हेरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा मुद्दा मांडला. यानंतर त्यांनी ग्वाल्हेरच्या एसपींना काढून टाकण्यासाठी मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी विजयाराजेंचं म्हणणं ऐकलं नाही."


यानंतरच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि जनसंघाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. सोबतच अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीसाठीही त्या उभ्या राहिल्या आणि दोन्ही निवडणुकीत जिंकल्या. 1967 पर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र व्हायच्या.
विजयाराजे सिंधिया यांच्या जनसंघात जाण्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली होती.
1971मध्ये इंदिरा गांधींच्या लाटेतही विजयाराजे सिंधिया ग्वाल्हेर क्षेत्रात लोकसभेच्या तीन जागा जिंकण्यात यशस्वी ठरल्या.
भिंडमधून त्या स्वतः विजयी झाल्या. गुणामधून माधवराव सिंधिया आणि ग्वाल्हेरमधून अटल बिहारी वाजपेयी. मात्र माधवराव सिंधिया हे नंतर जनसंघातून बाहेर पडले.
ज्या पद्धतीने जवाहरलाल नेहरू विजयाराजेंना समजवण्यात यशस्वी झाले आणि विजयाराजे काँग्रेसमध्ये गेल्या, त्याच प्रमाणे इंदिरा गांधी माधवराव शिंदेंना समजवण्यात यशस्वी झाल्या आणि माधवराव काँग्रेसमध्ये गेले, असं म्हटलं जातं.
आणीबाणीमध्ये विजयाराजेसुद्धा तुरुंगात गेल्या होत्या म्हणून इंदिरा गांधींविषयी असणारा त्यांच्या मनातला राग कधीच कमी झाला नाही. याचाच परिणाम म्हणून त्यांनी इंदिरा गांधींविरोधात रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
विजयाराजे सिंधिया भाजपमध्येही होत्या आणि भाजपमधूनच त्या 1989 साली गुणाची निवडणूक जिंकल्या.
यानंतर 1991, 1996 आणि 1998मध्येही त्या सलग विजयी झाल्या. रामजन्मभूमी आंदोलनातही त्या सहभागी होत्या.
अमाप संपत्ती, अफाट लोकप्रियता, प्रतिष्ठित घराणे आणि राजकीय वारसा अशा वैशिष्ट्यांमुळे शिंदे परिवाराला मध्यप्रदेशात विशेष मान आहे. जुन्या पिढीने राजकीय नावलौकिक सिद्ध केल्यानंतर नवे शिलेदार म्हणून ज्योतिराादित्य शिंदे यांच्याकडून अपेक्षा आहेत. राहुल गांधी यांना नैतिक पाठिंबा देण्याच्या शर्यतीत त्यांनीही काँग्रेस सरचिटणीसपद सोडले. दहा दिवसांपूर्वी राजीनामा दिल्याचा त्यांचा दावा आहे. राजीनामा सत्राचे मूळ घराणेशाहीच्या आरोपांत आहे. राहुलप्रमाणेच ज्योतिरादित्य यांच्यावरही हा आरोप वारंवार होतो. एकेकाळी ग्वाल्हेरचे राजे असलेल्या शिंदे घराण्याची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली आहे. स्वत: ज्योतिरादित्य मराठी बोलतात. युवकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या संपत्तीविषयीच्या चर्चा देशभर गाजत असतात. त्यांच्या ग्वाल्हेरमधील ‘जयविलास पॅलेस’मध्ये भोजनाच्या टेबलवर चांदीची ट्रेन आहे. दिल्लीतील २५ एकर परिसरातील सिंधिया महालही बातम्यांमध्ये असतो. अनेक शहरांमधील मंदिरांची मालकी वारशाने त्यांच्याकडे आली आहे. हे वलय बाजूला सारून त्यांनी हेलिकॉप्टर नाकारले आणि मध्यप्रदेशात रस्त्यावर उतरून प्रचार केला. सर्वोच्च राजकीय सत्तापदाने मात्र शिंद्यांना नेहमीच हुलकावणी दिली आहे. काँग्रेसने आधी दिवंगत माधवरावांऐवजी अर्जुनसिंग, मोतीलाल व्होरा आणि दिग्विजयसिंग यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. ज्योतिरादित्य मनमोहनसिंग सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेस नेतृत्वाच्या लढाईत त्यांचे नाव येत असते. आमच्याकडे कमलनाथ यांच्या रूपाने अनुभव आहे तर ज्योतिरादित्य यांच्या रुपाने भविष्य असा उल्लेख राहुल प्रचारसभेत करत. पण ज्योतिरादित्य यांच्याकडे जबाबदारी सोपविलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसचे पानिपत झाले. मध्यप्रदेशचा पक्षकौल कमलनाथांना गेला. राहुल यांनी संसेदत डोळा मिचकावला आणि ज्योतिरादित्य यांच्याशी असणारे त्यांचे दिलखुलास मैत्र जगजाहीर झाले. 
२०१२ मध्ये विधानसभेत कांग्रेस च पराभव झाला व् पुढे लोकसभेत पण।  २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस्सने रण नीति बदलली अणि मध्य्प्रदेशात ज्योतिरादित्य व् राजस्थान मधे सचिन पायलट यांना पुढे आणले अणि त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला। दोन्ही ठिकाणी कांग्रेस ची सरकारे आली। 
पण नंतर मुख़्यमंत्रिपदी मात्र कमलनाथ व् अशोक गेहलोत या बुजुर्ग नेत्यांनाच   बसवले. आज काठावर बहुमत असलेले सरकार कोसळण्याच्या बेतात आहे कारण ज्योतिरादित्य व् त्यांच्या समर्थक आमदार व् मत्र्यांनी राजीनामे दिले  आहेत. वास्तविक ज्योतिरादित्याना मुख्यमंत्री केले असते तर हा प्रसंग ओढवलाच नसता. शिंदे हे कांग्रेस सही एकनिष्ठ होते व् त्यांनी कारभार पण चांगला करूँ मध्यप्रदेशात कांग्रेस ला अच्छे दिन आणले असते. 
आणि कांग्रेस नेतृत्वाच्या विचार करण्याच्या पद्धतीत हीच गोम आहे. तसे झाले असते तर कॉंग्रेस्सला नवीन युवा नेतृत्व मिळाले असते. तीच गोष्ट सचिन पायलट यांची. हे दोघे जनाधार असलेले नेते आहेत आणि हे जर यशस्वी ठरले तर कांग्रेस मधील नेतृत्वाची पोकळी भरून निघाली अस्ती. पण सध्या कांग्रेस श्रेष्ठी म्हणून जे आहेत त्यांना असले ? म्हणून त्यांचे पंख कापले गेले. आज ज्योतिरादित्यांनी बंड केले. कदाचित उद्या पायलट पण करू शकतील.  तेव्हा भाजपने पैसे दिले वगैरे अरोपांना कही अर्थ नाही।  तरुण व् कर्तबगार नेत्यांना पुढे आणायची संधी कॉंग्रेस्सने घालवली हे मात्र खरे. 
अनिल जोशी 
११.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.


Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती