डोंगर वाटा
आपण जेव्हा दुक्खात असतो तेव्ह्या मागच्या रम्य आठवणी आठवाव्यात म्हणजे दुक्खाचा बहर ओसरतो तसेच जेव्हा आपली प्रकृती ठीक नसेल तेव्हा पूर्वायुष्यात केलेले प्रवास , काही साहसे (aventures) आठवून जरा दुखण्याच्या विचारातून बाहेर पडायचा विचार आहे. स्थूल प्रकृती व शरीलाला फारशी कष्टाची सवय नाही अशा वेळी अगदी गिर्या रोहण नाही पण डोंगर वाटांनी , झाडा झुडूपांतून केलेली भटकंती आठवली तरी मन शहारून उठते.
तसा खंडाळ्याचा घाट ओढ्याच्या काठाने भिजत भिजत उरण्याचा थरार अनुभवला होता. पुण्यात आल्यावर कधी मधी पर्वती चढून जाणे इतपत साहस करत असे. पण १९७७ मध्ये आमच्या कंपनी मधील लोकांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर चढू जायचे ठरवले. आमचे संयोजक होते कै अशोक चितळे . त्यांचा उत्साह व fitness तरुणांना लाजवेल असा. प्रत्यकाच्या मनात शिखर चढून जायचे होते पण नाहीच जमले तर वाटेत बसून राहायचे असे मनात ठरवले होते. आजही त्यातील काही नवे आठवतात. अशोक चितळे, दादा बिडकर, जयंत गोखले, अरविंद पोळ , हेमंत बेरी, माधव क्षीरसागर, दिलीप निकम, मुकुंद वनारसे, मी स्वत: ,अनिल इनामदार, सुरेश रेणुसे . आज १५ मधील ११ नवे आठवली. (बहुतेक हरिहरन होता नक्की आठवत नाही.) याची कुठे नोंद नाही पण कुणी उरलेली ४ नावे सांगितली तर खूप आनंद होईल हे निश्चित. सगळे जन बुधवारी ३.३० वाजता गाडीची पूजा करून निघालो. पेट्रोलचा खर्च देतो या बोलीवर आम्ही कंपनी कडे बस मागितली होती. पण लांब अतरावर बस पाठवण्याचा धोका पत्करून कंपनीने गोड शब्दात नकार दिला. वाटेत संगमनेर येथे नाश्ता करून भंडारदरा येथील विश्राम गृहात पोचलो. संपूर्ण प्रवास भर गप्पा, विनोद व गाणी अशी धमाल. सकाळी उठलो व बाहेर पहिले तर धरणाचा विस्तीर्ण जलाशय मन मोहून टाकत होता. थोडे खावून आम्ही पायथ्याशी आलो तर तिथे चितळे यांच्या ओळखीचे काळोबा आडार भेटले. ते वाटाड्याचे कम करतात. रमत गमत तीन तासांनी आम्ही शिखराच्या कळसावर पोचलो. आपण खरच वर पर्यंत आलो यावर विश्वास बसत नव्हता पण सगळेच तो आनंदी क्षण जगत होते.बरोबर आणलेल्या विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला. मग दुपारी खाली येवून विश्राम गृहाच्या वरांड्यात पंगत मांडली व जेवण केले.अशा तऱ्हेने एक साप्ताहिक सुटी संस्मरणीय करून परतीचा प्रवास सुरु केला व मध्यरात्री घरी आलो.
नंतर माझा खास मित्र अनिल परांजपे याच्या आग्रहावरून सिह्गडावर जायचा बेत केला . ३० जून ची तारीख आणि त्यांच्या रजेच्या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने त्याने रजा टाकली होती . अम्हे सकाळी बस ने कात्रज घाटाच्या पायथ्याशी आलो. आणि पायवाटेने घाट चढत कात्रज बोगद्याच्या (जुन्या) डोक्यावर आलो. सभोवताली छान हिरवळ, आकाशात तसे ढग असल्याने उन्हाचा त्रास होत नव्हता. आता इथून सिह्गडावरचा दूरदर्शन मनोरा पहात सुमारे २६-२७ डोगर चढायचे व उतरायचे असतात. इथे शारीरिक क्षमतेचा कस लागतो.
पावसाळी दिवस असल्याने मध्ये मनोरा दिसेनासा झाला आणि आम्ही एक रांग चुकलो व कल्याण गावात आलो आणि कल्याण दरवाजातून गड सर केला. माझी अशा प्रकारच्या साहसाची काही तयारी नव्हती व पायात पावसाळी sandal होते ते वाटेत तुटले मग तसाच ट्रेक (bare footed) केला. नंतर पुन्हा एकदा उन्हाळ्यात रात्री हाच ट्रेक केला पण यावेळी मनोर्यावरचे दिवे दिसत असल्याने रात्री रस्ता चुकला नाही. हा ट्रेक जरी शारीरिक क्षमता पाहत असला पण ट्रीप म्हणून आनंद अजिबात नाही. थोड्या वेळाने फक्त दोन घोट पाणी घेवून वा लिमलेटच्या गोळ्या खात घसा ओला करायचा इतकेच.
असेच जानेवारी १९८० मध्ये सोसायटी मधील काही लोक राजगडावर गेलो. संध्या काळी पायथ्याशी उतरून बरोबरची पिठलं भाकरी खाल्ली व गड चढायला सुरुवात केली. प्रचंड दमछाक होवून रात्री १२ च्या सुमारास गडावर पोचलो तिथे माझा भाऊ अजित व त्याचे काही मित्र आधीच पोचले होते. सोबत कै. विकास भागवत,गोपाळ अरगडे,अप्पासाहेब कुलकर्णी, सुहास गोंधळेकर व शशिकांत जोशी असे होतो. गडावर थंडी मी म्हणत होती. काही लोकांनी पांघरुणे आणली नव्हती त्यांनी त्या देवळात शेकोटी पेटवली आणि त्या धुराचा त्रास सर्वांनाच होत होता. सकाळ झाली व चूळ भरायला हात पाण्यात घातले तर पाणी बर्फाच्या पाण्यापेक्षा थंड. तोंड धुणे रद्द केले. उन्हे वर आल्यावर लाकडे जमा करून चूल पेटवली व स्वयपाक केला . जेवणे झाली मग गड उतरून वेल्हे येथे आलो व बसने पुण्याला परत.
माझे शेवटचे साहस म्हणजे २००४ साली केलेली वैष्णो देवीची यात्रा. संध्याकाळी ६ ला सुरुवात करून रात्री दीड वाजता वर (१४ किमी) पोचलो. दर्शन घेतले आणि लगेच उतरायला सुरुवात केली कारण बसलो असतो तर उतरणे कठीण गेले असते. वातावरण इतके छान असते की रात्र ,मध्य रात्र काही जाणवत नाही सकाळ उहाद्ल्यावर जाणवत पण रात्रीचा उल्हास, जल्लोष कुठेच दिसत नाही. दिवस अगदी मरगळलेला असतो.
या आठवणी लिहितांना मी चांगलाच चार्ज झालो. तुम्ही पण नक्की चार्ज व्हाल.
अनिल जोशी
१२.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
Comments
Post a Comment