बंद ,बंद आणि बंद

Image result for पुणे बंद चित्रे

आज सकाळी वर्तमानपत्रात प्रमुख बातमी होती की करोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये ,सिनेमा व नाट्यगृहे, पोहण्याचे तलाव ,व्यायाम शाळा हे सगळे दोन आठवडे बंद . नागरिकांनी खरेदीसाठी मॉल मध्ये पण शक्यतो  टाळावे. थोडक्यात सामुहिक जनसंपर्क टाळावा . हा कोणताही राजकीय बंद नाही तर हे खबरदारीचे उपाय आहेत. कंपनी ने पण जास्तीत जास्त लोकांना घरून काम करायला द्यावे. आणि हे बंद म्हणजे तशी शिक्षा असते.
१९६५ मध्ये आम्ही मुंबईत राहायला आलो तो जमाना होता जॉर्ज फर्नांडीस यांचा दबदबा असलेला .त्यांनी हाक दिली की मुंबई बंद होत असे. मुंबईची बस वाहतूक करणारी बेस्ट व taxi  यांच्या युनियन त्यांच्या वर्चस्वाखाली होत्या. त्या बंद मध्ये सगळी मुंबई पक्षाघात झाल्यासारखी असायची. आम्हाला शाळेला सुटी मिळाल्याचा आनंद व्हायचा.
पूर्वी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांचे निधन झाले तर सर्वत्र सुटी असायची. पंडित नेहरू मे महिन्यात गेले तेव्ह्या शाळांना सुटीच होती. पण लाल बहादूर शास्त्री जानेवारीत गेले त्यामुळे अचानक सुटी मिळाली होती. तसेच १९६९ मध्ये शिवसेना पुरस्कृत जी दंगल झाली होती त्यावेळी ४ दिवस शाळा बंद होत्या.
पुढे १९७३-७४ मध्ये राजकीय असंतोष वाढला होता तेव्हा असे बंद हो असत. पुढे आणीबाणी आली आणि मग हे सर्वत्र बंद खूप कमी झाले . फारसे दैनंदिन जीवनावर परिणाम न करणारे. १९७३ मध्ये पुण्यात एक दंगल झाली होती व त्यावेळी सर्वत्र संचार बंदी होती. पण बंदोबास्तासाठी पुरेसे पोलीस नसल्याने पश्चिम भागातल्या पोलीस चौक्यांना कुलुपे लावून सगळे पोलीस पूर्व भागात गेले होते. तेव्हा लोक बाहेर पडून फिरत व म्हणत जरा संचारबंदी पाहत आहोत. हा हास्यास्पद प्रकार नंतर पश्चिम भागातील संचार बंदी उठवण्यात आली.पुढे नोकरीवर लागल्यावर काही बंद झाले पण त्याचा परिणाम नाही जाणवला. कारण बंद जाहीर झाला की दक्षता म्हणून शाळा बंद ठेवत . ही नेतेमंडळी आरामात दहाच्या सुमारास रस्त्यावर येत. आम्ही सकाळी ७ वाजताच कंपनीत जात असू. थोडा आरडा ओरडा , दमबाजी केली की लक्ष्मी रोड बंद होत असे . मग पाच नंतर बंद मागे घेतला जात असे
इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा आम्ही कन्याकुमारी इथे होतो. तिथे आम्ही तणावपूर्ण शांतता अनुभवली पण आमचे नातलग त्यावेळी दिल्लीत होते त्यांनी जो भीषण अनुभव घेतला तो भयानक होता.
असं कुणी गेल्यावर जी सुटी दिली जाते त्याचा अतिशय विदारक अनुभव घेतला . सुमंत मूळगावकर यांचे दुख्खद निधन झाले . आम्ही सकाळी कंपनीत पोचलो तेव्हा सुटी जाहीर केली गेली व बसेस परत येईपर्यंत शांततेत थांबायला सांगितले होते. पण तसे थांबण्यापेक्षा आम्ही बाहेर आलो तर पुणे स्टेशन ला जाणारी डबल डेकर बस उभी होती. आम्ही त्यात बसलो .कंपनी मधील अनेक जण होते. त्यांची चर्चा सुरु झाली की आता काय करायचे? त्यांचा प्लान झाला. आपापल्या बायकांना राजा घ्यायला सांगायची व ११.३० वाजता दांडेकर पुलाशी भटू व सिंहगडावर जाऊ. काय प्रसंग होता, काय घडले होते आणि यांची ट्रीप ठरली. या मुळे कुणी गेल्यानंतर सुटी ही मला अनावश्यक वाटू लागली .आणि या प्रसंगात कंपनीत साधी सामुहिक श्रद्धांजली पण वाहिली गेली नाही. त्यामुळे जे आर डी टाटा गेले तेव्हा विभागवार श्रद्धांजली वाहून कामकाज सुरु राहिले. आणी मला हे योग्य वाटले . विरोधाभास म्हणजे शासनाने सुटी दिली पण कंपनी चालू राहिली.
१९८२ मधील प्रसंग आठवतोय. नोव्हेंबर महिना होता. मी माझा हात मोडलेला असल्याने रजेवर होतो. एका शुक्रवारी सकाळी कंपनीने कंपनीने सर्व कामकाज बंद केल्याची नोटीस बजावली होती. हे एकदम अचानक घडले होते . लोक कंपनीत जायला निघालेले आणि एकदम सुटी. काय करावे काही सुचत नव्हते . मग मला भेटायला अनेक जण घरी आले.
आता उद्या १५ मार्च. याच दिवशी १९८९ मध्ये कंपनी गेट वर बसमधून उतरवून अनेक कर्मचार्यांना मारहाण करण्यात आली होती. राजन नायर आंदोलनात दहशत बसवण्याचा तो निर्णायक क्षण होता.
पण ह्या सगळ्या अथ्वानीन्पेक्षा सध्याची परीशिती भयंकर आहे. आता १५ दिवस कमीत कमी संपर्क करायचा आहे  व आपल्या कोशात गुरफटून घ्यायचे आहे. हे अतिशय अवघड आहे . फक्त एकच दिलासा म्हणजे कम करता येणार असल्याने हे कंटाळवाणे होणार नाही. यामुळे करोनाचा प्रसार आटोक्यात यावा हीच इच्छा.

अनिल जोशी
१४.०३.२०२०.
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती