राम नाम रस भीनी


Image result for chadariya jhini re jhini anup jalota lyrics
(सौजन्य यु ट्यूब )

भजन हा एक संगीत प्रकार असला तरी त्यात अध्यात्माची सुरेख सांगड घातलेली असते. त्या अर्थपूर्ण व बह्व्पूर्ण शब्दांना त्यातील भाव नेमके ओळखून जेव्हा स्वर साज चढवला जातो तेव्हा श्रोते देहभान विसरतात व पार लौकिकाचा अनुभव घेतात. जेव्हा एखादे प्रवचन असते तेव्ह्या श्रोत्यांच्या मनाची तयारी व्हावी यासाठी एखादे भजन म्हटले जाते. माझा एक मित्र कै अरुण आपटे याने एकदा असे सांगितले होते की माताजीच्या प्रवचना आधी तो भजन गात असे व माताजी म्हणत आपके भजन से सुनने वालोंकी कुंडलिनी जागृत होती है.. हा अनुभव काही घेतलेला नाही पण भजनाने मिळणारा आनंद मात्र वेगळंच असतो. जेव्हा रचना संतांची असते तेव्हा संगीतकार हा नेहेमीचा राहत नाही व गायक पण. सगळे मिळून दैवी अनुभूती देतात. मग संत वाणी ने भीमसेन जोशी यांचे गाणे वेगळ्या उंचीवर नेले. त्यांची आधीची ध्वनिमुद्रणे ऐकली की त्यात एक मस्ती असायची. ते गाणे म्हणजे वादळ असायचे. अर्थात ते अप्रतिम असेच होते. पण अभंग वाणी मध्ये ते गाणे धीर गंभीर झालेले दिसते. अगदी पाश्चात्य संगीत देणारे आर डी बर्मन सुद्धा मीरेच्या रचनांना संगीत देताना वेगळ्या सुरावटी छेडतात. नौशाद व मोहमद रफी यांनी चित्रपटातून अनेक अजरामर भजने दिली आहेत. 
गजल गायक अनुप जलोटा यांनी जेव्हा भजन संध्या सादर करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली . संतांच्या रचना ते आपल्या शैलीत खूप परिणामकारक रित्या सदर करतात. तशा सगळ्याच रचना मस्त आहेत पण त्यातल्या त्यात मला -
चदरिया झीनी रे झीनी ही कबीर यांची रचना विशेष भावते. जेव्हा व्यक्ती संतपदाला पोचते तेव्हा तिला आपल्या दैनंदिन रुक्ष व्यवहारात सुद्धा अध्यात्म दिसू लागते. त्यामुळे विणकर असलेल्या कबीराने चादर वीणण्याच्या कृतीतून सुद्धा जीवनाचे मोठे सार सांगितले आहे. मध्ये मध्ये ते काही ओळींचा अर्थ सांगत भजन जिवंत करतात.देस रागातील अवीट गोडीचे हे भजन गात असताना त्यातील विविध रागांच्या छटा पण उलगडून सांगतात. त्यात देस मधून ते केदार, मालकंस, वसंत,काफी मधून होरी,भैरवी व पुन्हा देस असा जो काही विलक्षण प्रवास घडवतात तो ऐकतच राहावे असे वाटते.

कबीरा जब हम पैदा हुए,
जग हँसे,हम रोये ।
ऐसी करनी कर चलो,
हम हँसे,जग रोये ॥

चदरिया झीनी रे झीनी
राम नाम रस भीनी
चदरिया झीनी रे झीनी

अष्ट-कमल का चरखा बनाया,
पांच तत्व की पूनी ।
नौ-दस मास बुनन को लागे,
मूरख मैली किन्ही ॥
चदरिया झीनी रे झीनी...

जब मोरी चादर बन घर आई,
रंगरेज को दीन्हि ।
ऐसा रंग रंगा रंगरे ने,
के लालो लाल कर दीन्हि ॥
चदरिया झीनी रे झीनी...

चादर ओढ़ शंका मत करियो,
ये दो दिन तुमको दीन्हि ।
मूरख लोग भेद नहीं जाने,
दिन-दिन मैली कीन्हि ॥
चदरिया झीनी रे झीनी...

ध्रुव-प्रह्लाद सुदामा ने ओढ़ी चदरिया,
शुकदे में निर्मल कीन्हि ।
दास कबीर ने ऐसी ओढ़ी,
ज्यूँ की त्यूं धर दीन्हि ॥
के राम नाम रस भीनी,
चदरिया झीनी रे झीनी
कबीर.

अनिल जोशी 
१५.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती